MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आता लवकरच देशात नागरिकांना पाण्याखाली धावणाऱ्या ट्रेनचा अनुभव घेता येणार आहे. कोलकात्यातील हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत माहिती दिली.

2. देशातील पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार असल्याचे यसांगण्यात आले. तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातील पहिला टप्पा
लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार असल्याचे यात सांगण्यात आले आहे.

3. दरम्यान, कोलकात्यातील प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. या ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच लावण्यात आले आहे.

4. तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे. नदीखालून ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे. ही ट्रेन लवकरच सुरू होणार असून हे उत्तम इंजिनिअरिंगचं प्रतिक असल्याचं पीयूष गोयल म्हणाले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. अमेरिका-दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी कवायतींचा निषेध करण्यासाठी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या केल्या.

2. तर अध्यक्ष ट्रम्प यांनीही संयुक्त लष्करी कवायतींबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी या चाचण्या केल्या.

3. तसेच दोन लघु पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे ही ईशान्येकडील हामुहंग शहरातून सोडण्यात आली. ती 400 कि.मी अंतर कापून कोरिया द्वीपकल्प व जपान यांच्या दरम्यानच्या सागरात कोसळली.

4. तर दोन आठवडय़ात क्षेपणास्त्र चाचण्यांची ही पाचवी वेळ होती. या चाचण्या म्हणजे दक्षिण कोरिया व अमेरिका यांच्या संयुक्त लष्करी कवायतींविरोधात इशारा असल्याचे किम जोंग उन यांनी म्हटले आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. नेपाळच्या हिमालय पर्वत रांगांत नवे सरोवर सापडले असून हे जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर ठरणार आहे. 4,919 मीटर उंचावर असलेले तिलिचो सरोवर हे सध्या जगातील सर्वाधिक उंचावरील सरोवर आहे. विशेष म्हणजे, तिलिचो सरोवरही नेपाळातच आहे.

2. तर काही महिन्यांपूर्वी गिर्यारोहकांच्या एका पथकाला नेपाळातील मनंग जिल्ह्यातील हिमालयाच्या पर्वत रांगात काजीन सारा सरोवर सापडले. हे सरोवर चामे ग्रामीण नगरपालिकेच्या हद्दीतील सिंगारखरका परिसरात आहे. गिर्यारोहकांनी केलेल्या नोंदीनुसार, हे सरोवर 5,200 मीटर उंचावर आहे.

3. तथापि, याची अद्याप अधिकृत पडताळणी करण्यात आलेली नाही. हे सरोवर अंदाजे 1,500 मीटर लांब आणि 600 मीटर रुंद आहे, असे चामे ग्रामीण नगरपालिकेचे प्रमुख लोकेंद्र घाले यांनी सांगितले.

4. तसेच सध्या सर्वाधिक उंचीवरील सरोवर असा किताब असलेले तिलिचो सरोवर 4,919 मीटर उंचावर असून त्याची लांबी 4 कि.मी., रुंदी 12 कि. मी., तर खोली 200 मीटर आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताच्या दोन आघाडीच्या पहेलवानांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी करत आपली लय कायम राखली.

2. बजरंग पुनिया याने तबिलिसी ग्रां.पीमध्ये आपल्या विजेतेपदाचा बचाव केला. तर विनेश फोगाट हिने मेदवेद कुस्ती स्पर्धेत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

3. जॉर्जियामध्ये खेळल्या गेलेल्या तबिलसी ग्रांपीमध्ये गेल्या वर्षी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या बंजरंग याने पुरूषांच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात इराणच्या पेइमन बिब्यानीला 2 – 0 अशी मात दिली.

4. बेलारुसच्या मिन्स्कमध्ये मेदवेद कुस्ती स्पर्धेत विनेश हिने महिलांच्या 53 किलो गटात स्थानिक पहेलवान याफ्रेमेनका हिला एकतर्फी झालेल्या सामन्यात 11-0 असे पराभूत केले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सन 1943 मध्ये सी.डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

2. दादरा व नगर हवेली हा भाग सन 1961 मध्ये भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.

3. सन 1999 बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या ‘परिमार्जन नेगी‘ याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.

4. डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे 11 ऑगस्ट 2013 मध्ये भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.


Top