जॅग्वारमध्ये आता अत्याधुनिक रडार

 1. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएल या कंपनीने जॅग्वार या लढाऊ विमानाची निर्मिती करताना त्यात प्रथमच अत्याधुनिक एईएसए रडार तंत्रज्ञान वापरले आहे.
 2. या नव्या रडारमुळे जग्वार या लढाऊ विमानांकडे दुसऱ्या रडारला अडचणी निर्माण करत लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.
 3. या रडारमुळे शत्रूच्या ठिकाणांची अचूक माहिती मिळण्यास आणि ते उद्ध्वस्त करण्यास मदत होणार आहे.
 4. एचएल कंपनीने भारतीय वायूदलासाठी ‘जॅग्वार ड्रेन थ्री’ची निर्मिती करताना इंटरलिव्ड मोड ऑफ ऑपरेशन, हाय अॅक्युरसी अँड रेझ्युलेशन अशा अनेक प्रणाली या विमानात विकसित करण्यात आल्या आहेत.
 5. एचएलने इस्त्रायलमधल्या एका फर्मच्या मदतीने हे रडार तयार केले आहे. या रडारमुळे हे लढाऊ विमान एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदू शकते.
 6. आत्तापर्यंत भारताच्या एकाही लढाऊ विमानात रडार नव्हते, या नव्या तंत्रज्ञानामुळे भारतीय वायुदलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.
 7. भविष्यात राफेल आणि बोइंगच्या नव्या लढाऊ विमानांमध्येही या रडारचा वापर करण्यात येणार आहे.


 1. केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सीबीएफसी) अध्यक्षपदी प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. याशिवाय सेन्सॉर बोर्डाच्या २३ सदस्यांच्या कार्यकारिणीत अभिनेत्री विद्या बालन हिचा समावेश करण्यात आला आहे.
 3. केंद्र सरकारने सीबीएफसीचे वादग्रस्त माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरून हटवून त्यांच्याजागी प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे.
 4. पहलाज निहलानी त्यांच्या मार्गदर्शक तत्वांसाठी कायम चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला.
 5. उडता पंजाब, इंदू सरकार, लिपस्टिक अंडर माय बुरखा तसेच बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटात त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या.
 6. या सगळ्या कारणांवरून त्यांच्याविरुद्धचा रोष सातत्याने वाढत होता. यामुळे अनेक दिग्दर्शकांनी पहलाज निहलानींना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती.

 पहलाज निहलानी:- 

 1. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माता म्हणून पहलाज निहलानी ओळखले जातात. ते सुप्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे बंधू आहेत.
 2. वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट त्यांनी वितरक म्हणून कारकीर्दीची सुरूवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली.
 3. त्यांनतर ९०च्या दशकात त्यांनी गोविंदाबरोबर ‘आँखे’, ‘शोला और शबनम’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली.
 4. पहलाज निहलानी यांची १९ जानेवारी २०१५ रोजी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
 5. पहलाज निहलानी यांनी तीन वर्ष सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या तीन वर्षातील त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली.

 प्रसून जोशी:- 

 1. निहलानींच्या जागी नियुक्ती झालेले प्रसून जोशी नामवंत गीतकार आणि पटकथा लेखक आहेत.
 2. तारें जमीन पर, भाग मिल्खा भाग, नीरजा, रंग दे बसंती या चित्रपटांसाठी त्यांनी काम केले आहे.
 3. ‘तारें जमीन पर’मधील ‘मॉं’ आणि ‘चितगाव’मधील ‘बोलो ना’ या गाण्यासाठी जोशी यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.