1. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदयशस्त्रक्रिया, किडनी, मूत्रपिंडरोपण, कर्करोग इ. गंभीर स्वरूपाच्या आजारांनी त्रस्त रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसाह्य करण्यात येते. 
 2. याशिवाय, सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियमांतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयामार्फत  गरीब व गरजू रुग्णांवर स्वस्त दरात उपचार केले जातात. 
 3. तसेच याचे पुढचे पाऊल म्हणून आता रुग्णांना मदत करण्यासाठी  मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षांतर्गत विशेष समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
 4. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी ही समिती रुग्णांच्या  अर्जांची छाननी व तपासणी करणार आहे.
 5. या समितीच्या अध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधानसचिव असतील. तर  वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्यावर समितीच्या सह-अध्यक्षपदाची जबाबदारी राहणार आहे. 
 6. या समितीत एकूण  सात सदस्य असणार आहेत. याविषयी नुकताच सार्वजनिक आरोग्य विभागाने शासननिर्णय जाहीर केला आहे.


 1. 6 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2017 या काळात चीनच्या ओर्दोस शहरात ‘यूनायटेड नेशन्स कन्व्हेंशन टु कॉम्बेट डेजर्टीफिकेशन (UNCCD)’ ची COP13 वी शिखर परिषद सुरू आहे. चीनमध्ये प्रथमच रिओ करारावर आधारित ही परिषद भरविण्यात आली आहे.
 2. परिषदेत वाढत चाललेल्या  जमिनीच्या वाळवंटीकरणासंदर्भात चिंता दर्शवली गेली आहे आणि ही समस्या हाताळण्यासाठी राष्ट्रीय वचनबद्धतेसाठी यासंबंधी वित्तपुरवठ्याच्या महत्त्वावर जोर दिला गेला आहे.
 3. याप्रसंगी, UNCCD चे कार्यकारी सचिव मोनिक बार्बट यांनी ‘ लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी (LDN)   फं ’ ची घोषणा केली. हा वाळवंट झालेल्या जमिनीच्या पुनर्वसनासाठी पुर्णपणे समर्पित असणारा पहिलाच निधी आहे. हा निधी खाजगी क्षेत्राकडून व्यवस्थापित केला जाईल.
 4. वैश्विक अन्न आणि जल सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या वाढत्या जमिनीच्या वाळवंटीकरणाच्या समस्येला हाताळण्यासाठी  12 वर्षांच्या धोरणाला सहमती देणे.  
 5. मनाविरुद्ध स्थलांतरण, वाळू व धुळीचे वादळ यांच्यापासून उद्भवणार्‍या धोक्यासंबंधित  मुद्द्यांना हाताळण्यासाठी उपाययोजना करणे आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी समुदायांना बळकट करणे.
 6. जगभरात  169 देशांमध्ये वाळवंटीकरणाची समस्या निर्माण झालेली आहे. चीनमध्ये तर सर्वाधिक लोकसंख्या असून तेथील समस्या सर्वाधिक आहे.
 7. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी होणार्‍या अनैसर्गिक कार्यांमुळे, आज जगात  2 अब्ज हेक्टरपेक्षा जास्त उत्पादक भूमी नापीक झालेली आहे आणि 1.5 अब्जहून जास्त लोक अश्या भागात वास्तव्यास आहे. तसेच दरवर्षी 12 दशलक्ष हेक्टर उत्पादक जमिनीची हानी होते.
 8. 2017 सालामधील तीव्र दुष्काळामुळे नायजेरिया, येमेन, दक्षिण सुदान, सोमालिया या चार देशांमध्ये 25 दशलक्षांपेक्षा जास्त लोक भुक आणि दुष्काळाचा सामना करीत आहे.
 9. यूनायटेड नेशन्स कन्व्हेंशन टु कॉम्बेट डेजर्टीफिकेशन (UNCCD) स्थापन करण्याची संकल्पना रिओ कराराच्या 21 व्या उद्देशातून थेट शिफारशीतून निर्माण झाली. फ्रान्सच्या पॅरिसमध्ये  17 जून 1994 रोजी रिओ करार स्वीकारण्यात आला आणि  UNCCD डिसेंबर 1996 मध्ये कार्यरत झाली. ही जमिनीच्या वाळवंटीकरणाची समस्या हाताळण्यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत एकमेव आंतरराष्ट्रीय बंधनकारक संघटना आहे याचे 196 पक्ष आहेत. कॅनडा (28 मार्च 2013 रोजी) हा UNCCD मधून माघार घेणारा पहिला देश आहे.


 1. अमेरिकेच्या स्लोआनी स्टीफन्सने प्रथमच कारकिर्दीत ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याची कामगिरी केली आहे. स्लोआनीनेयूएस ओपन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळविले. 
 2. स्लोआनीने अमेरिकेच्याच मॅडीसन कीजला 6-3, 6-0 असे सहज दोन सेटमध्ये पराभूत करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. जुलैमध्ये दुखापतीतून सावरत स्लोआनीने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले होते. 
 3. स्लोआनीला या स्पर्धेसाठी नामांकनही देण्यात आले नव्हते. नामांकन नसतानाही ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारी स्लोआमी ही पाचवी महिला खेळाडू ठरली आहे. 
 4. स्लोआनीला या स्पर्धेच्या विजेतेपदामुळे 3.7 मिलियन अमेरिकन डॉलर एवढी रक्कम मिळाली आहे. तिच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वोच्च रक्कम आहे.


 1. जम्मू आणि काश्‍मीरच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे 10 सप्टेंबर रोजी श्रीनगरमध्ये आगमन झाले. 
 2. सर्व पर्याय खुले ठेवून मी काश्‍मीरमध्ये आलो आहे. मतभेद चर्चेद्वारे सुटू शकतात यावर विश्वास असणाऱ्या सर्वांना आपण भेटणार असून, त्यांची मते जाणून घेणार असल्याचे  राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.
 3.  श्रीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर राजनाथसिंह यांनी जम्मू आणि काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. 
 4. काश्‍मीरमध्ये मागील महिन्यात उसळलेल्या हिंसाचारात  27 दहशतवादी ठार झाले होते, तर सुरक्षा दलांचे अनेक जवान हुतात्मा झाले होते. काही सर्वसामान्य नागरिकही मृत्युमुखी पडले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थिती सामान्य करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर मेहबूबा मुफ्ती आणि राजनाथसिंह यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्‍मीरसाठी 2015 मध्ये जाहीर केलेल्या  80 हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचीही माहिती घेतली. या प्रकल्पांच्या कामांचा वेग वाढवावा, कारण त्यामुळे राज्यातील रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असे राजनाथसिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले.


Top