1. भारतातील कोलकत्यापासून बांगलादेशातील खुलना यादरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याच्या निर्णयाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे.
 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्री शेख हसीना यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हा निर्णय घेण्यात आला.
 3. OHEPEE प्रकल्पासाठी भारत व जागतिक बॅंक यांच्यात $119 दशलक्षचा कर्ज करार झाला
 4. ओडिशा राज्यामधील निवडक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यात सुलभता यावी म्हणून भारत सरकारने जागतिक बँकेसोबत $119 दशलक्षचा कर्ज करार केला आहे.
 5. जागतिक बँक गटाच्या इंटरनॅशनल बँक फॉर  रीकंस्ट्रक्शन अँड डेवलपमेंट कडून हे कर्ज 'ओडिशा उच्च शिक्षण उत्कृष्ट व समानता कार्यक्रम (Odisha Higher Education Programme for Excellence & Equity -OHEPEE)' प्रकल्पासाठी दिले जाणार आहे.
 6. शिक्षणात गुणवत्ता आणणे आणि सर्व विद्यार्थ्यांना निवडलेल्या संस्थांमध्ये न्याय्य प्रवेश मिळवणे आणि ओडिशातील उच्च शिक्षण प्रणालीचे सुशासन विस्तारीत करणे, हे OHEPEE प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.


 1. सीरियाने हवामान बदलावरील पॅरिस करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. या निर्णयासोबतच पॅरिस करारामध्ये सहभागी नसणारा आता अमेरिका हा एकमेव देश उरलेला आहे, जो या करारामध्ये सामील झालेला नाही. अमेरिकाने जून २०१७ मध्ये पॅरिस करारामधून आपले पाऊल मागे घेतले.
 3. पॅरिस करार हा २०२० साली सुरू होणार्‍या हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, परिस्थितीशी जूळवून घेण्यासाठी आणि आर्थिक बाबी हाताळण्यासाठी युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) च्या चौकटीतील एक (पहिलाच) करार आहे.
 4. आराखडीत कराराच्या भाषेवरच्या करारामध्ये पॅरिस मध्ये UNFCCC च्या २१ व्या पक्षीय परिषदेत १९५ देशांमधील प्रतिनिधींद्वारा १२ डिसेंबर २०१५ ला एकमताने अंगिकारले गेले.
 5. पूर्व-औद्योगिक पातळीच्या वर 2°C च्या खाली जागतिक सरासरी ताप मान वाढ नियंत्रित करणे आणि पूर्व-औद्योगिक पातळीच्या वर 1.5 °C पर्यंत तापमान वाढ मर्यादित करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच अनेक कारकांच्या हेतूने हा करार आहे. 


 1. 'UNESCO रचनात्मक शहरांचे नेटवर्क' या यादीत तामिळनाडूची राजधानी चेन्नई या शहराचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नईला शहरामधील संगीताच्या समृद्ध परंपरेमधील योगदानासाठी हा सन्मान मिळाला. यापूर्वी भारताच्या जयपूर आणि वाराणशी शहरांचा समावेश या यादीत करण्यात आलेला आहे.
 2. संयुक्त राष्ट्रसंघ वैज्ञानिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने ३१ ऑक्टोबरला ४४ देशांच्या ६४ शहरांची ही यादी 'UNESCO क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क' अंतर्गत प्रसिद्ध केली.
 3. यासोबतच, सादरीकरण, संगीत, हस्तकला आणि लोककला, माध्यम कला, संरचना, चित्रपट आणि साहित्य या सात क्षेत्रांसंबंधी या नेटवर्कमध्ये एकूण ७२ देशांच्या १८० शहरांचा समावेश आहे.
 4. याशिवाय, नेटवर्कमध्ये काहिरा (इजिप्तची राजधानी), केपटाउन व डरबन (दक्षिण आफ्रिका), ब्राझीलिया (ब्राझील), कंसास (अमेरिका) आणि मिलान (इटली) या शहरांचा देखील समावेश आहे.
 5. शाश्वत विकास आणि नवीन शहरी उद्दिष्टांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०३० सालच्या ध्येयाच्या क्रियान्वयनला अनुसरून हे नेटवर्क शहरांना आपले सातत्य राखण्यास समृद्ध संस्कतीची भूमिका प्रदर्शित करण्यास मंच मिळणार.
 6. UNESCO क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) हा UNESCO चा २००४ साली सुरू करण्यात आलेला एक प्रकल्प आहे, ज्यामधून त्यांच्या शहरी विकासात एक प्रमुख घटक म्हणून रचनात्मक बाब ओळख लेल्या शहरांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन दिले जात आहे.


 1. मूळ भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी त्यांच्या वादग्रस्त इस्रायल दौर्‍यानंतर ब्रिटनच्या थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.
 2. आफ्रिका दौर्‍यावर असलेल्या प्रीती पटेल यांना पंतप्रधान थेरेसा मे यांनी परत बोलावले होते. प्रीती पटेल यांनी त्यांच्या वादग्रस्त इस्रायल दौर्‍यात पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्यासह नियमात न बसणार्‍या सुचना न देता अनेक अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या होत्या.


Top