Prime Minister Bhartiya Jana Madari Yojana

 1. आजारांमुळे कुटुंबांवर, विशेषत: गरीब आणि मध्यम वर्गातील कुटुंबांवर मोठे आर्थिक ओझे लादले जाते, त्याचबरोबर सामाजिक-आर्थिक क्षेत्रावरही त्याचा परिणाम दिसून येतो.
 2. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला परवडण्याजोग्या आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना आणि केंद्र सरकारच्या अन्य आरोग्य सेवा देशात चालवत आहे.
 3. गरीब, निम्न मध्यम वर्ग आणि मध्यम वर्गाला परवडण्याजोग्या दरात औषधे उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यावरचे आर्थिक ओझे कमी व्हावे, या उद्देशाने 1 जुलै 2015 रोजी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी (जनौषधी) योजना सुरु करण्यात आली आहे.
 4. केंद्र सरकारने देशभरात 3600 जनौषधी केंद्रे सुरु केलेली असून, तेथे 700 पेक्षा जास्त औषधे परवडण्याजोग्या दरात उपलब्ध आहेत.
 5. जनौषधी केंद्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या किंमती बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर औषधांच्या तुलनेत 50-90% कमी आहेत.
 6. नजिकच्या काळात देशातील जनौषधी केंद्रांची संख्या 5000 पर्यंत वाढवणार असल्याचे जाहीर केले गेले.
 7. यापूर्वी नागरिकांना रक्तवाहिन्यांमधील रक्त पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वापरल्या जाणार्‍या स्टेंटची खरेदी करणे दरिद्री आणि मध्यम वर्गीय रुग्णांना परवडत नव्हती.
 8. आता त्यांच्या सोयीसाठी स्टेंटच्या दरात मोठी घट केली गेली आहे. आज स्टेंटची किंमत 2 लक्ष रुपयांवरुन 29,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
 9. अन्य आरोग्य सेवा-सुविधा:-
  1. गुडघे प्रत्यारोपणासाठी होणारा खर्चही 60-70% कमी केला गेला आहे. या शस्‍त्रक्रियेसाठी आधी 2.5 लक्ष रुपये खर्च येत असेल.
  2. आता मात्र हा खर्च 70,000 ते 80,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. देशात दरवर्षी गुडघे प्रत्यारोपणाच्या सुमारे 1-1.5 लक्ष शस्त्रक्रिया होतात.
  3. हे प्रमाण लक्षात घेऊन गुडघे प्रत्यारोपणासाठी होणारा नागरिकांचा 1500 कोटी रुपयांचा खर्च कमी झाला आहे.
  4. प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने देशातील 500 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये 2.25 लक्ष रुग्णांसाठी 22 लक्ष पेक्षा जास्त डायलिसिस सत्रे घेतली.
  5. मिशन इंद्रधनुषच्या माध्यमातून 528 जिल्ह्यांमधील 3.15 कोटी बालके आणि 80 लक्ष गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले.
  6. रुग्णांसाठी अधिक खाटा, अधिक रुग्णालये आणि अधिक डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकारने 92 वैद्यकीय महाविद्यालये सुरु केली गेली असून, MBBS अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी संख्येत 15,000 नी वाढ केली आहे.
  7. आयुषमान भारत योजनेअंतर्गत 10 कोटी कुटुंबांना 5 लक्ष रुपयांच्या आरोग्य विम्याचे कवच दिले जाणार आहे.
  8. स्वच्छ भारत अभियानामुळे देशातील 3.5 लक्ष गावे हागनदारीमुक्त झाली आहेत आणि स्वच्छतेची व्याप्ती 38% वाढली आहे.


 24 Indian Universities in QS 2019 Best Universities Rankings

 1. ब्रिटनमध्ये प्रकाशित ‘क्वॅकुएरेली सायमन्ड्स (QS) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2019’ मध्ये यावेळी तब्बल 24 भारतीय विद्यापीठांचा समावेश झाला आहे.
 2. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT-Bombay) 48.2 गुणांसह (100 पैकी) भारतात पहिल्या क्रमांकावर आहे.
 3. ते यावर्षी जगातील 1000 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या या यादीत गेल्या वर्षीच्या 179 व्या क्रमांकावरुन थेट 162 व्या स्थानावर आले आहे.
 4. अमेरिकेचे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (MIT) ने सलग सातव्या वर्षी यादीत अव्वल स्थान पटकावून इतिहास घडवला आहे.
 5. त्यानंतर अनुक्रमे स्टॅनफोर्ड विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) यांचा शीर्ष चारमध्ये क्रमांक लागतो. 
 6. आशियामध्ये, सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठ (11), नानयांग टेक्नोलॉजीकल विद्यापीठ, सिंगापूर (12) आणि त्सिंगगुआ विद्यापीठ, चीन (17) हे अव्वल ठरले आहेत.
 7. प्रथम 500 मध्ये IIT बॉम्बेसोबतच IISc बेंगळुरू (170) आणि IIT दिल्ली (172), IIT मद्रास (264), IIT कानपूर (283), IIT खरगपूर (295), IIT रुरकी (381), IIT गुवाहाटी (472) आणि दिल्ली विद्यापीठ (487) यांना स्थान मिळाले आहे.


 River Connectivity Projects in India

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नदी जोड प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीच्या सद्यस्थिती आणि प्रगतीचा अलीकडेच आढावा घेण्यात आला.
 2. नदी जोड प्रकल्पासंदर्भात 27 फेब्रुवारी 2015 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला अनुसरून तसेच त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करतांना नदी जोड प्रकल्पाच्या अध्ययनासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेल्या निर्देशांना अनुसरून ही समिती तयार करण्यात आली आहे. 
 3. या समितीच्या अहवालात, केन-बेटवा जोड, दमणगंगा-पिंजाळ जोड, पारा-तापी-नर्मदा जोड आणि इतर हिमालयन आणि बारमाही नद्यांच्या जोडणीविषयीच्या अध्ययनाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
 4. शासनाची योजना:-
  1. जलसंपदा मंत्रालयाकडून तयार केलेल्या राष्ट्रीय दृष्टीकोन योजना (National Perspective Plan -NPP) अंतर्गत, NWDA कडून हिमालयीन नद्याअंतर्गत 14 आणि द्वीपकल्पाच्या नद्याअंतर्गत 16  नदी जोड प्रकल्पांना ओळखले गेले आहे. त्यापैकी, केन-बेटवा नदी जोड प्रकल्प हे प्रथम ठरले आहे.
  2. उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या प्रदेशाअंतर्गत येणार्‍या केन-बेटवा नदी जोड प्रकल्पाला भारत सरकारने राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले आहे.
  3. तसेच या प्रकल्पाअंतर्गत मध्यप्रदेशामधील पन्ना व्याघ्र संवर्धन प्रकल्पाला आणल्या गेले आहे. या प्रकल्पामध्ये पन्ना व्याघ्र संरक्षण क्षेत्राचा सुमारे 8,650 हेक्टर चा भूभाग समाविष्ट आहे.
  4. बेटवा ही यमुना नदीची उपनदी आहे जी, उत्तर भारताच्या प्रदेशात मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधून वाहते. तर केन नदी ही सुद्धा यमुना नदीची उपनदी आहे, जी मध्य भारताच्या बुंदेलखंड प्रदेशातली मोठी नदी आहे आणि मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश मधून वाहते.   
 5. नदी जोड (Inter-linking of Rivers):-
  1. |देशभरात अन्न-धान्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी, पूर व दुष्काळ परिस्थितीमध्ये कमतरता आणण्यासाठी आणि पाण्याची उपलब्धतेमध्ये असलेला प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी राष्ट्रीय जल विकास संस्था (NWDA) ने एक सर्वात प्रभावी मार्ग शोधून काढला आहे आणि तो म्हणजे - आंतर-नदीच्या पात्रातील पाण्याचे हस्तांतरण (inter-basin water transfer –IBWT)  किंवा नदी जोड प्रकल्प.
  2. या प्रकल्पाअंतर्गत, भारतामधील उपलब्ध नद्या, ज्या पुर्णपणे समुद्राला मिळत नाही. त्यांचे पात्र नियोजित आराखड्याने इतर नद्यांच्या पात्रांशी जोडले जाणार. ज्यामुळे देशातील अधिकाधिक क्षेत्र ओलीताखाली येण्यास मदत होईल आणि पाण्याच्या उपलब्धतेच्या बाबतीत असलेला प्रादेशिक असमतोलता कमी करता येईल.
 6. या प्रकल्पांचा देशाला फायदा:-
  1. देशातील प्रमुख नद्या एकमेकांना जोडल्या गेल्यास, एकूण अंमलबजावणीनंतर सुमारे 35 दशलक्ष हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येईल, त्यामुळे देशातील एकूण ओलीताखालील क्षेत्र 175 दशलक्ष हेक्टर इतके होईल.
  2. तसेच जलविद्युत प्रकल्पामधून 34000 मेगावॅट ऊर्जा निर्मिती होऊ शकणार. त्यासोबतच पुर परिस्थितीवर नियंत्रण, सुचालन, उत्तम पाणी पुरवठा, मत्स्यव्यवसाय, क्षार आणि प्रदूषण नियंत्रण इ. विषय प्रभावीपणे हाताळले जाऊ शकतील.
 7. यामधील अडथळे आणि दृष्टिकोन:-
  1. नद्यांची जोडणी या संदर्भात विविध पर्यावरण समस्या पाहील्या गेल्या आहेत.
  2. उदाहरणार्थ मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्प. केन आणि बेतवा नद्यांच्या जोडणीमुळे या वन्य क्षेत्रात ध्वनी प्रदूषण आणि डिझेल इंधनावर चालणार्‍या वाहनांचे दळणवळण यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे वन्य पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
  3. याखेरीज, प्रदूषित नद्या आता प्रदूषित नसलेल्या नद्यांना मिळतील आणि त्यामुळे जलसुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उभा राहणार आहे.
  4. तसेच, या प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा अर्थ म्हणजेच प्राकृतिक संरचनेमध्ये मानवी हस्तक्षेप असा होतो. यामुळे भविष्यात मानवी अर्थातच इतर घटकांना सुद्धा मोठ्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागणार आहे हे निश्चित.
  5. पण त्याचबरोबर, जर आपण भारतातील उपलब्धतेचा आणि विकासाचा अभ्यास केला, तर नद्यांची जोडणी ही काळाची गरज दिसून आली आहे.


 Virat Kohli gets 'Polly Umrigar Award'

 1. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला सन 2016-17 तसेच सन 2017-18 मधील पुरुष वर्गात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा 'पॉली उम्रीगर' पुरस्कार जाहीर झाला आहे.
 2. 5 लक्ष रुपये आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 3. महिला वर्गात हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांना अनुक्रमे सन 2016-17 आणि सन 2017-18 मध्ये उत्कृष्ट खेळण्यासाठी प्रथमच हा पुरस्कार दिला जाणार आहे.
 4. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) तर्फे 12 जूनला बंगळूरूमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
 5. 28 मार्च 1926 साली जन्म झालेले पाहलन रतनजी उम्रीगर 
  भारताचे फलंदाज आणि कर्णधार होते.
 6. सन 1955 ते सन 1958 या काळात त्यांनी 8 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते.
 7. भारताकडून द्विशतक लगावणारे ते पहिले फलंदाज होते. 1962 साली त्यांना पद्मश्री आणि 1998-99 साली सी. के. नायडू चषकाने सन्मानित करण्यात आले.
 8. कोहलीने याआधी सन 2011-12, सन 2014-15 आणि सन 2015-16 मध्ये तीनदा हा पुरस्कार पटकावला आहे.
 9. BCCI ने यावर्षीपासून वयोमर्यादेसंबंधी क्रिकेटसाठी एक नवीन श्रेणी जोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते BCCI चे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना समर्पित आहे.
 10. ‘जगमोहन दालमिया चषक’ हा अंडर-16 विजय मर्चंट चषक मधील आघाडीचा फलंदाज आणि गोलंदाज तसेच महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट कनिष्ठ व वरिष्ठ क्रिकेटपटू यांना सादर केला जाईल.
 11. यासोबत देण्यात येणार्‍या बक्षिसाची सुधारित रक्कम 1.5 लक्ष रुपये आहे.


 Nandan Nilekani's semi-wealth donation

 1. इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि चेअरमन नंदन नीलेकणी, त्यांच्या पत्नी रोहिणी नीलेकणी यांच्यासह तीन अनिवासी भारतीय अब्जाधीश आपली अर्धी संपत्ती धर्मादाय कारणांसाठी दान करणार आहेत.
 2. बिल आणि मेलिंडा गेट्‌स, वॉरेन बफे या प्रसिद्ध उद्योजकांनी जनहितार्थ सुरू केलेल्या ‘द गिव्हिंग प्लेज’ उपक्रमाअंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
 3. नीलेकणी यांसह अनिल व एलिसन भुसरी, शमशेर व शबीना वायलिल, बीआर शेट्टी आणि त्यांच्या पत्नी चंद्रकुमारी ही अनिवासी भारतीय दांपत्ये ही आपली संपत्ती दान करणार आहेत.
 4. गेल्यावर्षी ‘द गिव्हिंग प्लेज’ या संस्थेशी जोडल्या गेलेल्या १४ जणांमध्ये या दांपत्यांचा समावेश आहे.
 5. ‘द गिव्हिंग प्लेज’ ही संस्था जगभरातील धनाढ्य उद्योजकांना आपली अर्धी संपत्ती धर्मादाय कामांसाठी दान करण्यासाठी प्रोत्साहित करते.
 6. या संस्थेची स्थापना गेट्स दाम्पत्याने वॉरन बफे यांच्या सहकार्याने २०१०साली केली.
 7. या संस्थेचे सदस्यत्व स्वीकारणारे नीलेकणी हे चौथे भारतीय आहेत. याआधी विप्रोचे अध्यक्ष अजीम प्रेमजी, बॉयकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ आणि पी. एन. सी. मेनन यांनी या संस्थेचे सदस्यत्व घेतले आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.