The MNREGA scheme has increased employment and water resources: a report

 1. भारत सरकारच्या ग्रामीण क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणारी तसेच ग्रामीण विकासात मोठा हातभार लावणारी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS / मनरेगा) ही आज वैश्विक पातळीत भारतात सुरू असेलली एक देशव्यापी योजना आहे. 
 2. या योजनेमधून रोजगारासह शाश्वत उपजीविका सुनिश्चित करण्यास प्रयत्न केले गेले आहे. मनरेगा, ज्यावर वर्ष 2015 पासून किमान 60% रक्कम खर्च केली जात आहे, त्याचे नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन घटक आणि शाश्वत उपजीविका यावर त्याच्या प्रभावाचे त्वरित आकलन आर्थिक विकास संस्था (नवी दिल्ली) याद्वारा 29 राज्यांच्या 30 जिल्ह्यांच्या 1160 कुटुंबांच्या दरम्यान केले गेले.
 3. अभ्यासातून कुटुंबाच्या उत्पन्नात जवळपास 11%, धान्य उत्पादनात 11.5% आणि भाजी-पीक उत्पादकतेमध्ये 32.3% ची वृद्धी झाल्याचे निर्देशनास आले आहे.
 4. जलस्तरात झालेल्या वाढीमुळे 78% कुटुंबांचे कल्याण झाल्याची माहिती मिळाली आहे.
 5. जलस्तरात वाढ झाल्याने मुक्तसरमध्ये 30% पासून ते विजयनगरममध्ये 95% कुटुंबांना फायदा झाला आहे.
 6. सार्वजनिक व छोट्या आणि अत्यंत छोट्या शेतकर्‍यांच्या क्षेत्रात जल संरक्षणामुळे चार्‍याच्या उपलब्धतेत वाढ झालेली असून त्यामुळे 66% कुटुंबांना फायदा पोहचलेला आहे.
 7. मनरेगाच्या वैयक्तिक लाभार्थी योजनेच्या माध्यमातून पशुधनामुळे मिळणारी मिळकत वाढली. योजनांमधून दरिद्री कुटुंबांच्या आवश्यकतेनुसार शेळीपालन, कुक्कुटपालन आणि पुश शेड उपलब्ध करून दिले गेलेत.
 8. वर्ष 2006 पासून निर्मित 2 कोटींहून अधिक संपत्तीला मागच्या दोन वर्षांत भौगोलिक रूपाने चिन्हित केले गेले आहे.
 9. 6.6 कोटीहून अधिक कामगारांचे बँक खाते आधार क्रमांकासोबत जोडले गेलेत. 97% दैनिक वेतनाची देयके इलेक्ट्रॉनीक फंड मॅनजमेंट प्रणालीमधून केले जात आहे.
 10. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनीक फंड मॅनजमेंट प्रणाली पूर्वीपासूनच 23 राज्य आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात लागू आहे.
 11. मनरेगा कार्यक्रमाच्या मागील तीन वर्षात (वर्ष 2015-16, वर्ष 2016-17, वर्ष 2017-18) सर्वाधिक खर्च केला गेला.
 12. वर्ष 2015-16 आणि वर्ष 2016-17 मध्ये 235 कोटी कामगार दिवसांचे काम केले गेले, जे की मागील 5 वर्षात सर्वाधिक आहे.
 13. सामाजिक लेखापरिक्षणासाठी अंकेक्षण मानकांची अंमलबजावणी, सामाजिक लेखापरीक्षकासाठी प्रमाणपत्र कार्यक्रमांची संरचना, सामाजिक लेखापरीक्षक म्हणून महिला बचत गटांची निवड अश्या प्रयत्नांमुळे कार्यक्रमाचा प्रभावीपणा सुधारला आहे.
 14. मनरेगा अंतर्गत ‘प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये अकुशल कामगारांना निश्चित 90/95 दिवसांच्या कामामधून ग्रामीण क्षेत्रात शौचालयांची बांधणी, घनकचरा व द्रव्यकचरा व्यवस्थापन, जैविक खताचे खड्डे, रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण, आंगणवाडी केंदांचे बांधकाम, पशुधनासाठी मदत अशी सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा होत आहे.
 15. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005 (आत्ताचे MGNREGA) हा एक भारतीय कामगार कायदा आहे आणि कामाचा अधिकार याची हमी देणारा सामाजिक सुरक्षा उपाय आहे.
 16. प्रत्येक कुटुंबाच्या प्रौढ सदस्याला अकुशल कामाकरिता दर आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांचा रोजगार प्रदान करून ग्रामीण भागात उदरनिर्वाह भागवण्यासाठी सुरक्षा प्रदान करते.
 17. 2 फेब्रुवारी 2006 रोजी 200 जिल्ह्यांत या उपक्रमाला सुरुवात झाली. 1 एप्रिल 2008 पासून या उपक्रमात भारतामधील सर्व जिल्ह्यांना आणले गेले. 
 18. या कायद्यांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून (MGNREGS) ग्रामीण क्षेत्रातील कामगारांना रोजगाराची हमी दिली जाते आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.


India's 42nd member includes Wasanar arrangement

 1. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएनामध्ये झालेल्या दोन दिवसीय बैठकीमध्ये भारताला वासेनार अरेंजमेंटच्या 42 व्या सदस्याच्या रूपात सामील करण्याला सर्वांनी सहमती दिली.
 2. वासेनार अरेंजमेंटमध्ये भारताला सामील करण्यासाठी रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिका यासह अन्य देशांचे समर्थन प्राप्त झाले.
 3. यामधून भारताची शस्त्रांचा गैर-वापर टाळण्यासाठी त्यांच्या प्रसाराला अवरोधीत करण्यासाठी प्रतिबद्धता दिसून येत आहे.

वासेनार अरेंजमेंट:-

 1. पारंपारिक शस्त्रात्रे आणि दुहेरी-वापराजोग्या वस्तू आणि तंत्रज्ञान यांची निर्यात नियंत्रित करण्यासाठी ‘वासेनार अरेंजमेंट’ ही व्यवस्था उभारण्यात आलेली आहे. ही एक बहुपक्षीय निर्यात नियंत्रण व्यवस्था (MECR) आहे.
 2. शीत युद्ध-काळातील बहुपक्षीय निर्यात नियंत्रणासाठीच्या समन्वय समितीच्या जागेवर ही व्यवस्था 12 जुलै 1996 रोजी नेदरलॅंड्समधील वासेनार शहरात स्थापित केली गेली. याचे प्रशासन करण्यासाठी एक सचिवालय व्हिएना, ऑस्ट्रिया येथे स्थित आहे.
 3. वासेनार अरेंजमेंट ही एक बहुपक्षीय निर्यात नियंत्रण व्यवस्था आहे. याची स्थापना पारंपारिक शस्त्रांच्या हस्तांतरणास आणि दुहेरी-वापराजोग्या वस्तू आणि तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणात अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी दर्शवून प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय सुरक्षितता आणि स्थिरता यामध्ये योगदान देण्यासाठी करण्यात आलेली आहे.
 4. प्रत्येक सहा महिन्यांनी वासेनार अरेंजमेंटच्या सदस्य देशांना पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या 8 मोठ्या श्रेणींखाली जगभरातील वितरणासंबंधी माहितीला सदस्य नसलेल्या देशांसोबत सामायिक करावी लागते. या 8 मोठ्या श्रेणी आहेत - रणगाडे, सशस्त्र लढाऊ वाहने (AFVs), लार्ज-कॅलिबर आर्टिलरी, लढाऊ विमाने, लढाऊ हेलिकॉप्टर, युद्धनौका, क्षेपणास्त्र किंवा क्षेपणास्त्र प्रणाली तसेच छोटी शस्त्रे आणि हलकी शस्त्रे.
 5. आण्विक पुरवठादार समूह (NSG), क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्था (MTCR), ऑस्ट्रेलिया समूह, वासेनार अरेंजमेंट हे सर्व आण्विक, जैविक आणि रासायनिक शस्त्रांचा आणि तंत्रज्ञानाचा प्रसार यासंदर्भात बाबींना नियंत्रित करतात.


Announced by the National Traction Survey Report (2014-17)

 1. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्‍याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी ‘राष्‍ट्रीय ट्रेकोमा सर्वेक्षण अहवाल (2014-17)’ जाहीर केला आहे.
 2. वर्तमान परिस्थितीत भारत ‘रोगाला जन्म देणार्‍या ट्रेकोमा’ पासून मुक्‍त झाले आहे.
 3. ट्रेकोमाच्या सक्रिय संक्रमणाची उपस्थिती 10 वर्षाहून कमी वयाच्या मुलांमध्ये 5% हून कमी असेल तेव्हा ते संपुष्टात आल्याचे मानले जाते.
 4. सर्वेक्षणानुसार, सर्वेक्षणाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये लहान मुलांमधील ट्रेकोमा संक्रमण संपुष्टात आले आहे आणि त्याची उपस्थिती केवळ 0.7% एवढी आहे, जी की स्पष्ट केलेल्या ट्रेकोमाच्या समाप्तीच्या मानकापेक्षा खूप कमी आहे.
 5. या यशामुळे WHO च्या GET 2020 कार्यक्रमांतर्गत निर्दिष्‍ट लक्ष्‍य अनुसार ट्रेकोमाचे निर्मूलन करण्याचे लक्ष्‍य साधले गेले आहे.
 6. सद्यस्थितीत राज्यांना अजूनही सक्रिय ट्रेकोमासंबंधी बाबींवर माहिती दिली जात आहे आणि त्यांना ‘ट्रेकोमेट्सस्‍ट्रीचियासिस’ च्या रूग्णांच्या समुदाय आधारित निष्‍कर्षांना प्राप्‍त करण्यासाठी एक धोरण योजना विक‍सित करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ट्रेकोमा:- 

 1. ट्रेकोमा (खुपर्‍या) हा डोळ्यांचा एक दीर्घकालिक संक्रमण रोग आहे आणि यामुळे जगभरात आंधळेपणाची प्रकरणे समोर दिसून येत आहेत.
 2. हा रोग खराब पर्यावरण आणि वैयक्तिक स्‍वच्‍छतेच्या अभावामुळे तसेच पुरेशे पाणी न मिळाल्यामुळे होतो. या रोगामुळे डोळ्याच्या पापण्याच्या खाली पडदा प्रभावित होतो. वारंवार होणार्‍या संक्रमणामुळे पापणीवर जखम तयार होते, त्यामुळे कोर्नियाला नुकसान पोहचते आणि अंधपणा येण्याचा धोका निर्माण होतो.
 3. या आजारामुळे गुजरात, राजस्‍थान, पंजाब, हरियाणा, उत्‍तरप्रदेश आणि निकोबार बेट या राज्यांमधील काही ठिकाणांचे लोक प्रभावित झाल्याचे पहिले गेले होते.
 4. ट्रेकोमा संक्रमण 1950 साली भारतामधील अंधपणाचे सर्वात प्रमुख कारण ठरले होते आणि गुजरात, राजस्‍थान, पंजाब आणि उत्‍तरप्रदेशामध्ये 50% लोकसंख्या यामुळे प्रभावित होती.
 5. कित्येक दशकांपासून केल्या जाणार्‍या प्रयत्नांमध्ये अॅंटीबायोटिक आयड्रॉपची तरतूद, वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित पेयजलाची उपलब्‍धता, पर्यावरणासंबंधी उत्तम स्‍वच्‍छता, क्रोनिक ट्रेकोमासाठी सर्जिकल सुविधांची उपलब्‍धता आणि देशामधील सामाजिक-आर्थिक स्थितीत सामान्‍य सुधारणांचा समावेश आहे.
 6. या आजारावर स्थानिक रुग्णालयांमध्ये मोफत अँट्रोपियन शस्त्रक्रिया/उपचाराची व्‍यवस्‍था करून दिली जात आहे.
 7. राष्‍ट्रीय ट्रेकोमा प्रचार सर्वेक्षण आणि ट्रेकोमा त्वरित मूल्यांकन सर्वेक्षण (TRA) डॉ. राजेंद्र प्रसाद सेंटर फॉर ऑपथेलमिक सायन्स, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्‍था नवी दिल्‍ली यांनी वर्ष 2014 ते वर्ष 2017 पर्यंत नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्‍लाइंडनेस अँड व्हिजुअल इम्‍पेयरमेंट या संस्थेच्या सहकार्याने केले.
 8. सर्वेक्षण 23 राज्‍य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वाधिक जोखिम असलेल्या 27 जिल्ह्यांमध्ये केले गेले.


India has five medals in the Asian Airplane Shooting Championship

 1. आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत भारताला पाच पदके मिळाली
 2. जपानमधील वाको शहरामध्ये खेळण्यात आलेल्या 10 व्या आशियाई एयरगन नेमबाजी अजिंक्यपद 2017 स्पर्धेत भारताने एकूण पाच पदकांची कमाई केली आहे.
 3. आशियाई नेमबाजी स्पर्धा एशियन शुटिंग कॉन्फेडरेशनद्वारे संचालित केली जाते.
 4. 1967 सालापासून सुरू झालेल्या या स्पर्धांमध्ये जवळजवळ सर्व ISSF नेमबाजी प्रकारांचा समावेश असतो.
 5. ही स्पर्धा दर चार वर्षांनी खेळली जाते.

पदक विजेत्यांमध्ये

रवी कुमार (पुरुष 10 मीटर एयर रायफलमध्ये कांस्य),

अर्जुन बबुता (पुरुष जूनियर 10 मीटर एयर रायफलमध्ये रौप्य),

तीन एयर रायफल स्पर्धेत तीन सांघिक रौप्यपदक यांचा समावेश आहे.

पुरुष 10 मीटर एयर रायफलमध्ये चीनच्या सोंग बुहान याने सुवर्ण

आणि चीनच्या काओ यिफेई याने रौप्यपदक पटकावले.


The National Council on the e-Courts Project concludes

 1. नवी दिल्लीत ई-न्यायालय प्रकल्पासंदर्भात राष्ट्रीय परिषद संपन्न झाली.
 2. भारताच्या सर्वोच्च न्‍यायालयाच्या समितीने न्‍याय विभागाच्या सहकार्याने 2-3 डिसेंबर 2017 ला नवी दिल्‍लीत दोन दिवसांची ‘ई-न्यायालय' प्रकल्पासंदर्भात राष्ट्रीय परिषद भरवली गेली होती.
 3. ही परिषद ई-समितीचे (eCommittee) सदस्य, न्‍याय विभाग आणि राष्‍ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे वरिष्‍ठ अधिकारी तसेच अन्‍य वरिष्‍ठ न्‍याय अधिकारी यांच्यासह चालू असलेल्या राष्ट्रीय ई-न्यायालय प्रकल्पासोबत विविध उच्‍च न्‍यायालयांच्या सर्व केंद्रीय प्रकल्प समन्‍वयकांना जोडण्यासाठीच्या हेतूने आयोजित करण्यात आली होती.
 4. न्‍या. मदन बी. लोकुर हे ई-समितीचे न्यायाधीश अध्‍यक्ष आहेत.
 5. परिषदेत आतापर्यंतच्या प्रगतीचा, गुणवत्तापूर्ण सरावपद्धती आणि अनुभव सामायिक करणे आणि प्रकल्पांतर्गत उद्भवणार्‍या नव्या समस्यांवर मुख्‍य रूपाने चर्चा झाली.
 6. ई-न्यायालय (eCourts) मिशन मोड प्रकल्प हा देशातल्या जिल्हा आणि अधीनस्‍थ न्‍यायालयांना (जवळपास 20400) माहिती व संपर्क तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सशक्‍त करून राष्‍ट्रीय ई-प्रशासन प्रकल्पाच्या कक्षेत आणण्यासाठी युद्धपातळीवर चालवला जात असलेला प्रकल्प आहे.
 7. या प्रकल्पाचा प्रथम टप्पा वर्ष 2010-15 दरम्यान पार पडला आणि याचा दुसरा टप्पा वर्ष 2015-19 या कालावधीत सुरू आहे. प्रकल्पाचा मुख्य उद्देश्‍य म्हणजे संपूर्ण न्‍यायिक प्रणालीला माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाने समन्वयित करणे हा आहे.
 8. न्‍यायिक नियोजन आणि संनियंत्रण, प्रशासन आणि धोरण संबंधी निर्णयांसाठी विविध सांख्यिकीय अहवाल बनविण्यासारख्या कार्यांमध्ये नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड (NJDG) ची संकल्पना उपयोगात आणली जात आहे.
 9. तसेच नागरिकांना न्याय सेवेचा लाभ घेण्याकरिता विविध सुलभ तंत्रज्ञान आधारित सेवा-सुविधा दिल्या जात आहेत.


The Indian Navy's submarine division honored the 'President's Colors' with honor

 1. भारतीय नौदलाच्या पाणबुडी विभागाला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती रंग (President’s Colour)’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
 2. देशाची पहिली पाणबुडी INS कलवरीने 1967 साली 8 डिसेंबरला पाणबुडी विभागाची सुरुवात झाली होती.
 3. हे वर्ष या विभागाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून  पाणबुडी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. 
 4. 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युध्दात नौदलाच्या या पाणबुडी विभागाने महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
 5. यापूर्वी 27 मे 1951 रोजी भारतीय नौदलाला ‘राष्ट्रपती रंग’ या सन्मानाने गौरविण्यात आले होते.
 6. राष्ट्रपती मानक/रंग (presidential standard/President’s Colour) किंवा राष्ट्रपती ध्वज हा एक ध्वज आहे, जो राज्यप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष यांचे प्रतीक किंवा राजेशाही मानक म्हणून अनेक देशांमध्ये वापरला जातो.
 7. संरक्षण दलाला मिळणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.
 8. भारतात 26 जानेवारी 1950 पासून हा ध्वज भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून ध्वजांकीत केला जात आहे.
 9. या मानकावर चार (2 निळे व 2 लाल) भागामध्ये सोनेरी बाह्यरेखांनी काढलेली राष्ट्रीय प्रतीक कोरलेली आहेत

आणि ते म्हणजे –

 1. सिंह, हत्ती (5 व्या शतकाच्या अजिंठा लेणीमधील आदिमानवांची चित्रकला),
 2. तराजू (17 व्या शतकातील लाल किल्लामधील),
 3. कमळ पुष्पाची फुलदाणी.


NASA to send 'supertiger' to study global rays

 1. आपल्या सौरमालेच्या पलीकडून पृथ्वीच्या वातावरणामध्ये दररोज प्रत्येक क्षणाला प्रवेश करणार्‍या वैश्विक किरणांमधील उच्च-ऊर्जा कणांची माहिती गोळा करण्यासाठी एका फुग्याच्या सहाय्याने 'सुपरटायगर' नावाचे एक उपकरण पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जाणार आहे.
 2. अंटार्क्टिकामधून हा फुगा 10 डिसेंबरला अवकाशात पाठवला जाण्याचे अपेक्षित आहे.
 3. हा फुगा जवळजवळ 130,000 फूट (40,000 मीटर) ची उंची गाठू शकतो आणि वातावरणाच्या 99.5% च्या अधिक तरंगू शकतो.
 4. सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठातील रॉबर्ट बिन्स हे या शास्त्रीय अभ्यासाचे प्रधान अन्वेषक आहेत.

शोधाचे महत्त्व:-

 1. संशोधक याचा शोध घेत आहे की "आपण सर्वजन तार्‍यांची धूळ आहोत, परंतु ही धूळ कुठे आणि कशी तयार झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला आपली आकाशगंगा आणि त्यात आपले स्थान याची माहिती चांगल्याप्रकारे समजण्यास मदत होईल."

'सुपरटायगर':-

 1. सुपर ट्रान्स-आयर्न गॅलेक्टिक एलीमेंट रेकॉर्डर ('सुपरटायगर' / SuperTIGER).
 2. या उपकरणाची रचना दुर्मिळ उच्च भार असलेल्या अणूंचा अभ्यास करण्यासाठी तयार केले गेले आहे, ज्यामुळे वैश्विक किरण कुठे आणि कशी जवळजवळ प्रकाशाची गती प्राप्त करतात यासंबंधी सुस्पष्टता येणार आहे.
 3. सर्वात सामान्य वैश्विक किरणाचे कण मुख्यताः प्रोटॉन किंवा हायड्रोजन केंद्रक (nuclei) चे असते, ज्याचे प्रमाण जवळजवळ 90% असते.
 4. त्यानंतर त्यामध्ये हीलियम केंद्रक (8%) आणि इलेक्ट्रॉन (1%) देखील असतात.
 5. संशोधक 'सुपरटायगर' च्या सहाय्याने दुर्मिळपेक्षा दुर्मिळ ‘अल्ट्रा-हेवी वैश्विक किरण केंद्रक’ चा शोध घेणार आहेत, जे लोहच्या पुढे कोबाल्टपासून ते बेरियम पर्यंतच्या केंद्रकाच्या वजनाचे असतात.
 6. जसजसे त्यांचे वस्तुमान वाढते तसेतसे उर्वरित प्रमाणात इतर घटकांचे केंद्रके असतात.
 7. पूर्वीही 'सुपरटायगर' ने 55 दिवसांचे उड्डाण घेतले होते आणि त्याने अधिक वजनी भार वाहून नेणार्‍या शास्त्रीय फुगाची प्रदीर्घ उड्डाण यासाठी विक्रम देखील तयार केला आहे.


Top