India's first fullness: electric hi-speed locomotive

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 एप्रिल 2018 रोजी बिहारच्या मधेपुरा येथील रेल इंजन कारखान्यामधून भारताचे पहिले संपूर्णताः इलेक्ट्रिक हाय-स्पीड लोकोमोटिव्ह रवाना केले आहे.
 2. 12,000 हॉर्सपॉवर (HP) क्षमतेचे हे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह (इंजन) भारताने यशस्वीरीत्या पहिल्यांदाच तयार केले आहे. या क्षमतेसह भारताचा रशिया, चीन, जर्मनी आणि स्वीडन सहित त्या देशांच्या यादीत समावेश होणार, ज्यांच्यापाशी 12,000 HP वा त्याहून अधिक क्षमतेचे इलेक्ट्रिक इंजन आहे.
 3. वर्तमानात भारतीय रेल्वे मालाच्या वाहतुकीसाठी WAG-9 इंजनचा वापर करीत आहे. हे इंजन आधी आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली इंजन मानले जात होते.
 4. फ्रांसची कंपनी एल्सटॉम यांच्याकडून झालेल्या गुंतवणूकीमधून मधेपुरा कारखानामध्ये भारताने संयुक्त उपक्रमातून हे इंजन बनविले आहे. 20,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत 11 वर्षांच्या कालावधीमध्ये एकूण 800 प्रगत हॉर्सपावर लोकोमोटिव्ह बनविण्याचे अपेक्षित आहे.

इंजनची वैशिष्ट्ये

 1. विजेच्या बचतीसाठी नव्या इंजनमध्ये LED दिवे आणि लो-वोल्टेज केबल्स लावले गेले आहेत.
 2. इंजन विजेच्या बचतीच्या दृष्टीने IGBT (इंसुलेटेड गेट बायपोलर ट्रांझीस्टर) आधारित प्रोपल्शन टेक्नॉलॉजीने सुसज्जित आहे. यामध्ये ABB ट्रांसफॉर्मर बसविण्यात आले आहे.
 3. हे इंजन 9 MW (मेगावॉट) क्षमतेचे आहे. हे इंजन ताशी 120 किलोमीटर या कमाल वेगाने धावू शकते.

 

पंतप्रधानांचा बिहार दौरा

 1. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या बिहार दौर्‍यात ‘कटिहार-दिल्ली हमसफर एक्सप्रेस’ या गाडीचा शुभारंभ केला आहे. शिवाय ‘मुजफ्फरपुर-सुगौली-वाल्मीकिनगर’ या रेल्वेरुळाच्या प्रकल्पासाठी कोणशीला ठेवली.
 2. 10 एप्रिल 2018 रोजी त्यांनी मोतीहारीमध्ये चंपारण सत्याग्रहाच्या या शतक महोत्सवी समारंभात लोकांशी संपर्क साधला. यावेळी 'सत्याग्रह ने स्वच्छाग्रह' अभियानाच्या माध्यमातून हा वर्धापन दिन साजरा केला जात आहे.
 3. शिवाय, पटना शहरासाठी 1111.56 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह चार सांडपाणी प्रकल्पांची कोणशीला ठेवली गेली आहे. यामुळे 60 MLD क्षमतेचे नवे सांडपाणी शुद्धीकरण संयंत्र (STP) याची स्थापना सुनिश्चित होणार आणि यासोबतच पटनाच्या सैदपूर व पहाडी क्षेत्रात 376.12 किलोमीटरचे जाळे तयार केले जाणार.
 4. तसेच, बिहार-झारखंड सीमेवरील चौर्डहा पासून ते बिहारच्या औरंगाबाद पर्यंत राष्ट्रीय महामार्ग-2 च्या 70 किलोमीटर पट्ट्याला सहा पदरी मार्गात रूपांतरित करण्यासाठी 882 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी कोणशीला ठेवली गेली.
 1.  


Nepal's Prime Minister visits India

 1. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आपल्या पहिल्या परदेशी दौरासाठी भारताची निवड केली आहे. ओली एका उच्च पातळीवरील शिष्टमंडळासोबत तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत.
 2. नेपाळच्या पंतप्रधान पदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान ओली यांची ही पहिलीच अधिकृत भारत भेट आहे.
 3. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी 7 एप्रिल 2018 रोजी द्विपक्षीय संबंधांवर एक बैठक केली, ज्यात संरक्षण व सुरक्षा, संपर्क आणि व्यापार यासारख्या मुख्य क्षेत्रांमध्ये संबंधांना मजबूत बनविण्याचा संकल्प केला. ज्या मुख्य मुद्द्यांवर सहमती दर्शवली गेली, त्यामध्ये नवी दिल्ली ते काठमांडू पर्यंत नव्या रेल्वे मार्गाची निर्मिती देखील सामील आहे.
 4. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांची नवी उंची गाठण्यासाठी 12 मुद्द्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
 5. दरम्यान पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान ओली यांनी नेपाळ पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइनचे उद्घाटन केले.

दोन्ही देशांमध्ये तीन करारांवर स्वाक्षरी करण्यात आली

 1. काठमांडूला भारतीय सीमावर्ती शहराशी जोडणारा रेल्वे प्रकल्प
 2. अंतर्देशीय जलमार्ग संपर्क
 3. नेपाळमधील कृषी विकास

 

सहमती असलेले मुद्दे

 1. भारताच्या रक्सौलच्या माध्यमातून काठमांडू पर्यंत इलेक्ट्रिक रेल-लाइन जोडण्यावर सहमती बनली. या प्रकल्पासाठी भारत वित्तीय मदत पुरविणार.
 2. सोबतच दोन्ही देशांनी संपर्क वाढविण्यासाठी सर्व प्रकल्पांमध्ये तेजी आणण्याबाबत सहमत झालेत.
 3. दोन्ही देश संरक्षण व सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवून आपल्या खुल्या सीमेचा दुरुपयोग टाळण्यासाठी मिळून कार्य करण्यास सहमत झालेत.

 


The first flight of humans to the sun will be in July

 1. अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ने नियोजित तारखेनुसार 31 जुलै 2018 रोजी ‘पार्कर सोलर प्रोब’ मोहीम सूर्याकडे पाठविण्यासाठी शेवटची तयारी सुरू केली आहे. फ्लोरिडामधील NASA च्या केनेडी स्पेस सेंटरवरून ही मोहीम सोडली जाईल.
 2. पहिलीच अशी मोहीम असणार, जेव्हा मनुष्याने थेट सूर्याच्या वातावरणात म्हणजेच त्याच्या कोरोना क्षेत्रात, जे सूर्याच्या पृष्ठभागापासून अगदी जवळचे क्षेत्र असते, आपले एखादे यान पाठवविणार आहे.
 3. NASA ने ‘पार्कर सोलर प्रोब’ मोहीम सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी तयार केली आहे. सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आपले यान सूर्याच्या अगदी जवळ पाठविण्याचे लक्ष्य NASA ने या मोहिमेमार्फत ठेवले आहे.

‘पार्कर सोलर प्रोब’ बाबत

 1. ‘पार्कर सोलर प्रोब’ 7 वर्षांच्या कालखंडात सात वेळा सूर्याच्या कक्षेच्या जवळ जाऊन त्याची तपासणी करणार. सूर्याच्या जवळ जाण्यासाठी शुक्र ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर केला जाणार. यान सूर्याच्या वातावरण सीमेच्या 62 लक्ष किलोमीटर इतक्या जवळ जाणार. अशी मोहीम पहिल्यांदाच चालवली जाणार आहे.
 2. नियोजित सात वर्ष चालणार्‍या या मोहिमेमधील सर्वात कठिण भाग असलेल्या सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण करणाऱ्या प्रणालीला यानात बसवले जाईल. या यंत्रणेला ‘थर्मल प्रोटेक्शन सिस्टिम (TPS)’ असे नाव देण्यात आले आहे. ही यंत्रणा यानाला सुर्याच्या जवळ जाताना उष्णतेपासून बचाव करण्यास मदत करेल. हे यान सुर्यापासून 98 लक्ष किलोमीटर एवढ्या अंतरावर जाणार आहे. यानावर कार्बन-संमिश्र 4.5 इंच जाड आच्छादन असेल.
 3. मोहिमेमध्ये यान 6.3 दशलक्ष कि.मी. सूर्याच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणार. अभ्यासादरम्यान, सूर्याच्या प्रखर उष्णता आणि सौर विकिरणांच्या धोकादायक भागामध्ये वैज्ञानिक शोध चालवले जाणार. सूर्याच्या बाह्य आवरणात कोणत्या प्रकारची ऊर्जा आणि ताप प्रवाहीत होत आहे तसेच सूर्यापासून बाहेर पडणारी हवा आणि ऊर्जा यांच्या कणांची गती कशी वाढते यासंबंधी समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार.

 

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) बाबत

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ही संयुक्त राज्य अमेरिकेची (UAS) शाखा आहे, जी देशाच्या सार्वजनिक अंतराळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यास आणि उड्डाणशास्त्र व हवाई-अंतराळ संशोधनासाठी जबाबदार आहे. NASA ची स्थापना 19 जुलै 1948 रोजी नॅशनल अॅडवायजरी कमिटी फॉर एरोनॉटिक्स (NCA) च्या जागी केली गेली होती. या संस्थेने 1 ऑक्टोबर 1948 पासून कार्य करण्यास सुरुवात केली.

 


Top

Whoops, looks like something went wrong.