1. अमेरिकेतील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. रिचर्ड थेलर यांना यंदाचा अर्थशास्त्राचाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्थशास्त्रातील भरीव योगदानाबद्दल थेलर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे नोबेल समितीच्यावतीने सांगण्यात आले.
  2. थेलर यांनी अर्थशास्त्राच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे जनसामान्यांच्या  वैयक्तिक निर्णयक्षमतेचे आर्थिक आणि मानशास्त्रीय दृष्टीकोनातून विश्लेषण करणे अधिक सुकर झाल्याचे मत नोबेल पुरस्कार निवड समितीने मांडले आहे.
  3.  अर्थशास्त्राचे मानसशास्त्र’ सोप्या शब्दांत मांडण्याचे कौशल्य थेलर यांच्याकडे आहे. सामान्यांची खर्च करण्याची आर्थिक क्षमता आणि खर्च करण्याची मानसिकता याविषयी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून थेलर यांनी केलेला अभ्यास महत्त्वाचा आहे. डॉ. थेलर सध्या  शिकागो युनिव्हर्सिटीत प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.


  1. अखंड अभ्यास, प्रचंड पैसा आणि आफाट मनशक्ती यांची बेगमी करीत आपल्या उच्च कौशल्यांना वाव मिळविण्यासाठी अमेरिकेला नोकरीसाठी जाणार असाल, तर तुमच्या विस्तारित कुटुंबीयांसाठी अमेरिकेची व्दारे बंद दिसतील
  2. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशाचे हीत जपण्यासाठी अतिउच्च कौशल्ये असलेल्या भारतीय कामगारांनाच स्थलांतर नियम व्यवस्था लागू केली जाईल, असे सांगत हा नियम त्यांच्या  विस्तारित कुटुंबासाठी नसेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे जोडीदार अथवा अल्पवयीन मुलांखेरीज वृद्ध माता-पिता, काका-काकी, सज्ञान मुले आणि पुतणे-पुतणी यांना अमेरिकेत नेता येणार नाही. 
  3. तसेच ट्रम्प यांनी नवीन स्थलांतर योजनेचा प्रस्ताव ट्रम्प यांनी नुकताच काँग्रेसकडे पाठवला आहे. यात  एच 1 बी व्हिसाचा उल्लेख केलेला नाही. भारतीय माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांसाठी एच 1 बी व्हिसा महत्त्वाचा मानला जातो.
  4. देशाच्या  ग्रीन कार्ड प्रणालीचा ट्रम्प यांनी फेरआढावा घेतला असून त्यात मेक्सिको सीमेवरील भिंत व देशात कुणालाही बरोबर न घेता येणाऱ्या लहान मुलांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आहे


Top