odisha to on pradhanmantri gramsadak yojana implementation


 

 1. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलबजावणीमध्ये ओडिशा राज्य सवौच्च स्थानावर आहे
 2. या योजनेंतर्गत ओडिशा राज्यात मार्च 2018 पर्यंत 3500 किमी अंतराची रस्तेबांधणी पूर्ण केली जाणार असल्याचे 12 जानेवारी 2018 रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या राज्यस्तरीय संमती समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
 3. त्याचबरोबर 582 किमी चे 165 नवीन रस्ते व 36 पुल बांधण्यासाठी मंजूरी देण्यात आली.


dipa karmakar won gold medal in gymnastic world cup

 1. तब्बल दोन वर्ष दुखापतीमुळे मैदानापासून बाहेर राहिलेल्या जिमनॅस्ट दिपा कर्माकरने धडाक्यात सुरुवात केली आहे. तुर्कीच्या मेरसिन शहरात सुरु असलेल्या आर्टिस्टीक जिमनॅस्टीक विश्वचषकात दिपाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 2. 24 वर्षीय दिपा कर्माकरचे रिओ ऑलिम्पीकमध्ये अवघ्या काही गुणांच्या फरकाने सुवर्णपदक हुकले होते. त्यानंतर दिपा दुखापतीमुळे काहीकाळ जिमनॅस्ट फिल्डच्या बाहेर होती, मात्र महत्वाच्या स्पर्धेआधी दिपाने जोरदार तयारी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 3. दिपाचे विश्वचषकातले हे पहिले विजेतेपद ठरले आहे.
 4. पात्रता फेरीत दिपा कर्माकरने 11.850 गुणांची कमाई केली होती.
 5. यानंतर अंतिम फेरीतही आपला फॉर्म कायम राखत दिपाने भारतीय चाहत्यांना निराश होऊ दिले नाही.
 6. आगामी आशियाई खेळांसाठी भारताच्या जिमनॅस्ट चमूमध्येही दिपा कर्माकरची निवड करण्यात आलेली आहे


education department ban beaten rod from school

 1. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने केलेल्या सूचनांनुसार शिक्षण विभागाने शाळेतून छडी गायब करण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. 6 जुलै रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळेमधून छडी वगळण्याच्या आदेश शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.
 3. शाळेत शिक्षकांनी मारले म्हणून विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले किंवा शिक्षेमुळे विद्यार्थ्याला मानसिक धक्का बसला अशा विविध घटना सातत्याने समोर येऊ लागल्या.
 4. याची दखल राष्ट्रीय बालहक्क आयोगाने घेतली आणि कोणत्या प्रकारच्या शिक्षांमुळे विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होतो, यावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर वर्गातून छडी हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
 5. राष्ट्रीय बालहक्क आयोगने केलेल्या सूचनेनुसार तसेच शिक्षण हक्क कायदा, 2009 मधील अनुच्छेद 17 नुसार कोणत्याही मुलाला शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागू नये, अशी तरतदू करण्यात आली आहे.
 6. शारीरिक शिक्षांमुळे निरागस विद्यार्थ्यांच्या मनात भीती, राग, दहशत निर्माण होते. तसेच अनेक प्रकणांमध्ये आत्मविश्वासही कमी होतो.
 7. यासर्व परिणामांचा विचार करून शाळांमध्ये शारीरिक शिक्षा दिल्या जाऊ नयेत, अशी सूचना राष्ट्रीय बालहक्क आयोगने केली होती.


Top