1. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते देशभरात ई-शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वयंम, स्वयंम प्रभा आणि नॅशनल अॅकेडमिक डिपॉझिटरी’ या ३ डिजिटल उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
 2. या पुढाकारांचा उद्देश म्हणजे २०२० सालापर्यंत उच्च शिक्षणामध्ये सकल नोंदणीचे प्रमाण २४.५% वरून ३०% पर्यंत वाढवणे हा आहे.
 3. स्वयंम - मोठ्या प्रमाणात खुले ऑनलाइन अभ्यासक्रम ‘स्वयंम’ उपक्रमामधून चालवले जाणार आहेत, ज्यामुळे कोणालाही, कुठुनही कुठेही प्रवेश घेता येऊ शकेल. यामध्ये इयत्ता ९ वी पासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंत वर्गांमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रम शिकवले जाणार. ज्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले नाही इच्छित व्यावसायिक शिक्षण पूर्ण करू शकत नाही आणि इच्छित व्यावसायिक शिक्षण पूर्ण करू शकत नाही अश्यांना या उपक्रमामधून लक्ष्यित केले जाईल.
 4. स्वयंम प्रभा - स्वयंम प्रभा हे GSAT-15 उपग्रहाद्वारे संपूर्ण वेळ उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी समर्पित ३२ DTH वाहिन्यांचे व्यासपीठ आहे.
 5. नॅशनल अॅकेडमिक डिपॉझिटरी - ही डिपॉझिटरी प्रमाणपत्रांची ऑनलाइन तपासणी सुलभ करणार.सर्व अभ्यासक्रम परस्परसंवादी आणि विनामूल्य उपलब्ध आहेत. भारतातील विविध मान्यताप्राप्त संस्थांमधील विद्यार्थी या ऑनलाईन अभ्यासक्रमांना यशस्वीपणे पूर्ण केल्यावर ते क्रेडिट मिळवू शकतात. हे अभ्यासक्रम सर्व IIT, दिल्ली विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ यासारख्या प्रमुख संस्थांमधील हजारहून अधिक तज्ज्ञ शिक्षकांद्वारे तयार करण्यात आले आहेत.


 1. महाराष्ट्र न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेत गोमांस तपासण्यासाठी पोलिसांसाठी बीफ डिटेक्शन किट विकसित केले आहे.
 2. हे किट नमुन्यामधील मांसाचे प्रथिने शोधू शकतात आणि अर्ध्या तासात चाचणीचे निकाल देते. नमुन्यात गोमांसाचे अंश सापडल्यास पुढील चाचण्यांसाठी पाठविण्यात येईल. या किटची किंमत ८००० रुपये एवढी अपेक्षित आहे.


उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

 1. उत्तर कोरियाने ५ जुलै रोजी त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.
 2. उत्तर कोरियाच्या उत्तर प्योंगान प्रांतातून ही चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र ९३० किमी लांब जात समुद्रात कोसळले. या क्षेपणास्त्राने २८०० किमी उंची गाठली होती, असाही दावा जपानने केला आहे.
 3. ६७०० किमी उंची गाठण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र अलास्कापर्यंत पोचू शकते, असा अंदाज अमेरिकेतील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
 4. उत्तर कोरियाच्या सततच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्यावर अनेक निर्बंध घातले आहेत.
 5. तरीही दबावाला न झुगारता उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन वारंवार क्षेपणास्त्र तसेच अण्वस्त्र चाचण्या घेत आहेत.
 6. यामुळे त्यांचा पारंपरिक शत्रू असलेल्या दक्षिण कोरियाबरोबरील तणावात भर पडणार आहे.
 7. अमेरिकेच्या स्वांतत्र्यदिनीच त्यांच्यावर हल्ला करण्याची उघड धमकी देणाऱ्या उत्तर कोरियाने ही चाचणी केल्याने, अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे.
 8. उत्तर कोरियाचा एकमेव मित्रदेश असलेल्या चीन ने मात्र इतर देशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
 9. इतर देशांनी चर्चेच्या माध्यमातूनच प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे चीनने आवाहन केले आहे.


Top