The Central Government now contributes 14% to the National Pension Scheme

  1. नव्या निर्णयानुसार, 2004 साली सुरू केलेल्या राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत (NPS) केंद्र सरकारकडून दिले जाणारे योगदान 14% पर्यंत वाढवण्यात आले आहे.
  2. याशिवाय सेवानिवृत्तीनंतर राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत (NPS) मधून काढली जाणारी रक्कमही आता करमुक्त करण्यात आली आहे.
  3. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत केंद्र सरकारकडून 10% इतके योगदान कर्मचाऱ्यांना मिळत होते, त्यात आता 14% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. या योजनेनुसार कर्मचाऱ्याचे कमीत कमी योगदान त्याच्या मूळ वेतनाच्या 10% इतके असते. 
  4. पेन्शन योजनेतील योगदानात वृद्धी करण्यात आल्याने 2019-20 या वित्त वर्षात सरकारी तिजोरीवर 2,840 कोटी रूपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
  5. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत निवृत्तीवेळी कर्मचारी एकूण जमा रकमेच्या 60% रक्कम काढू शकतो, तर उर्वरित 40% रक्कम पेन्शन योजनेत जमा केली जाते.
  6. ही 60% रक्कम आता करमुक्त करण्यात आली आहे. याआधी 40% रक्कम करमुक्त होती, तर 20% रकमेवर कर घेतला जात होता. 


Top

Whoops, looks like something went wrong.