MPSC chalu ghadamodi, current affairs

1. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी पुन्हा एक मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीत तब्बल 11 हजार ठिकाणी हॉटस्पॉट लावले जाणार आहेत. एवढेच नाहीतर मोफत वायफाय सुविधा देखील लवकरच सुरू केली जाणार आहे. ज्यामुळे प्रत्येक वापरकर्त्यास 15 जीबी डाटा प्रत्येक महिन्याला मोफत दिला जाईल आणि हा यासाठीचा पहिला टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले.

2. दिल्ली विधानसभा निवडणुका 2020 मध्ये होणार असल्याने, केजरीवाल सरकारकडून दिल्लीकरांना खुश करण्यासाठी एकापाठोपाठ एक घोषणा केल्या जात आहेत.

3. तर या अगोदर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांना 200 युनिटपर्यंतची वीज मोफत व 201 ते 400 युनिटपर्यंत वापर असलेल्या ग्राहकांना वीज बिलावर 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. सलग पाचव्या वर्षी वीज बिल दरात कोणतीही वाढ केलेली नाही.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यानंतर 12 दिवसांनी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रं उद्ध्वस्त केली. या एअर स्ट्राइकमध्ये सहभागी झालेल्या हवाई दलाच्या पाच वैमानिकांचा त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी हवाई दलाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे.

2. 26 फेब्रुवारी बालाकोटमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये सहभागी असणाऱ्या हवाई दलाच्या वैमानिकांना हवाई दलाकडून मेडल ऑफ गॅलेंट्री देण्यात येणार असल्याचे या पुरस्कारशी संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

3. मिराज – 2000 या लडाऊ विमानांच्या तुकडीने 26 फेब्रुवारीच्या रात्री बालाकोट येथे हवाई हल्ला करत तेथील दहशतवादी तळ नष्ट केले होते. भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा पार करत आठ किलोमीटरपर्यंत आतमध्ये जाऊन मिराज 2000 च्या मदतीने स्पाइस 2000 बॉम्ब निर्देशित करण्यात आलेल्या ठिकाणी पाडले होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय हवाई दलातील विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

2. भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लाडऊ विमानांना पळवून लावताना 27 फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष (डॉगफाइट) झाला त्यामध्ये वर्थमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ 16 फायटर विमान पाडले होते. त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘विरचक्र’ पुरस्काराने सन्मान होणार असल्याचे सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

3. तर यावेळी अभिनंदन यांनी मिग 21 बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ 16 फायटर विमानावर वर आर- 73 मिसाइल डागले. या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले अॅमराम मिसाइल वर्धमान यांच्या मिग 21 बायसन विमानाला धडकले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज हाशिम आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

2. काही दिवसांपूर्वीच आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती, त्यानंतर आफ्रिकेच्या आणखी एका मोठ्या क्रिकेटपटूने निवृत्ती स्विकारली आहे. आमलाने आपला निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला कळवला आहे.

3. नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत आमलाला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर फेकला गेला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 9 ऑगस्ट हा ‘भारतीय स्वतंत्र चळवळीचा क्रांतिदिन‘ आहे.

2. सन 1942 मध्ये 9 ऑगस्ट रोजी (क्रांतिदिन) भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.

3. छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभा निमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन 9 ऑगस्ट 1993 मध्ये झाले.

4. सन 2000 मध्ये भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.


Top