1. माजी केंद्रीय मंत्री आणि अजमेरचे भाजप खासदार सांवरलाल जाट यांचे ९ ऑगस्ट रोजी दिल्लीत निधन झाले. गेल्या महिन्यात ( २२ जुलै ) राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमात सांवरलाल जाट बेशुद्ध पडले होते.
 2. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. सांवरलाल जाट हे अजमेर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. मोदींच्या मंत्रिमंडळात ते ९ नोव्हेंबर २०१४ पासून ५ जुलै २०१६पर्यंत ते केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्रिपदी होते.
 3. अजमेर जिल्ह्यातील भिनाई विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९३, २००३ आणि २०१३ मध्ये त्यांनी राजस्थान सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले. २०   मध्ये फेरबदलानंतर त्यांच्याकडील मंत्रिपद काढून घेण्यात आले होते. 


 1. भारताला 'पॉवर हाउस' बनविण्यासाठी अनिवासी भारतीयांची मदत घेण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत.'मेक इन इंडिया'द्वारे परदेशस्थ भारतीयांनी देशात गुंतवणूक करावी, यासाठी त्यांना विविध सवलती दिल्या जात आहेत.
 2. अनिवासी भारतीय हे देशाचे मोठे भांडवल असून, त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी विशेष योजना तयार केल्या जात आहेत.परदेशात मोठा व्यवसाय उभा करणाऱ्या अनिवासी भारतीयांना (एनआरआय) देशात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्याकरता केंद्र सरकारने अनिवासी भारतीय आणि परदेशस्थ भारतीयांसाठी थेट परकी गुंतवणुकीचे (एफडीआय) नियम शिथिल केले आहेत.
 3. देशातील परकी गुंतवणुकीचा ओघ वाढण्यासाठी अनिवासी भारतीय (एनआरआय), परदेशस्थ भारतीय (ओआयसी) भारतीय वंशाचे परदेशी नागरिक (पीआयओ) यांच्यासाठी परकी गुंतवणुकीच्या (एफडीआय) नियमांत दुरुस्ती केली आहे.केंद्र सरकारच्या या बदलांमुळे 'मेक इन इंडिया' आणि 'मेक इन महाराष्ट्र'द्वारे संरक्षण, रेल्वे, विमा, वैद्यकीय उपकरणे, मसाले या क्षेत्रात गुंतवणुकीस परदेशस्थ भारतीय उत्सुक आहेत.


 1. ९ ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्यामधील प्रवासाचा एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. ९ ऑगस्ट हा क्रांतिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली "चले जाव" चा नारा लावण्यात आला.
 2. भारत छोडो चळवळ (Quit India Movement), ज्याला "भारत ऑगस्ट चळवळ" म्हणून देखील ओळखतात, ही अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई सत्रात ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू करण्यात आलेली नागरी असहकार चळवळ होती.
 3. समितीचे नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले होते. या दिवशी महात्मा गांधी यांनी मुंबई मधील गोवालिया टॅंक मैदानावरच्या त्यांच्या भारत छोडो भाषणात "करो या मरो (Do or Die)" चा नारा दिला.
 4. भारत छोडो आंदोलनातील आक्रमक स्वरूप मिळण्यास प्राथमिक घटक म्हणजे सर स्टाफोर्ड क्रिप्सच्या परती विरोधात बापूंचा निषेध हा होता.


 1. ९ ऑगस्ट २०१७ रोजी दरवर्षीप्रमाणे "जगातल्या आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस" साजरा करण्यात येत आहे. "10th अॅनिवर्सरी ऑफ द यूएन डिक्लेयरेशन ऑन द राइट्स ऑफ इंडिजीनस पीपल्स" या संकल्पनेखाली हा दिवस यावर्षी साजरा करण्यात येत आहे.
 2. जगभरात ९० देशांमध्ये अंदाजे ३७० दशलक्ष आदिवासी लोक राहतात. त्यांचे प्रमाण जगाच्या लोकसंख्येत ५% पेक्षा कमी आहे, परंतु सर्वात दरिद्री लोकांमध्ये त्यांचे प्रमाण १५% इतके भरते. जगात बोलल्या जात असलेल्या अंदाजे ७००० भाषांपैकी बहुसंख्य भाषा या लोकांकडून बोलल्या जाते आणि शिवाय ते जवळपास ५००० संस्कृतींचे प्रतिनिधित्व करतात.
 3. आजच्या काळात आदिवासी लोक जगातील सर्वात वंचित व संवेदनशील गटांपैकी आहेत. त्यामुळे त्यांच्या अधिकारांचे संरक्षण आणि त्यांची भिन्न संस्कृती आणि जीवनशैली टिकवण्यासाठी प्रयत्न म्हणून त्यांच्याविषयी जागृती आणि समर्थन करण्याकरिता "जगातल्या आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस" हा साजरा केला जातो.
 4. १९९० साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने वर्ष १९९३ ला जगातील आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. २३ डिसेंबर १९९४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठराव ४९/२१४ स्वीकारून दरवर्षी ९ ऑगस्ट या तारखेला "जगातल्या आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस" साजरा करण्याचा निर्णय घेतला.
 5. १३ सप्टेंबर २००७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने आदिवासी लोकांच्या अधिकारासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाचा जाहीरनामा अंगिकारला गेला. भारतात ४६१ जातीय समुदाय "अनुसूचित जमाती" म्हणून ओळखल्या जातात. या समुदायातील लोकांना आदिवासी म्हणून देखील मानले जातात.
 6. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८.२% (म्हणजेच अंदाजे ८४.३ दशलक्ष) लोकसंख्या आदिवासी समुदायांची आहे. या समुदायाची सर्वाधिक लोकसंख्या ईशान्य भारतामधील सात राज्यांत आढळते आणि त्यामुळे राजस्थान ते पश्चिम बंगाल पर्यंतच्या पट्ट्याला "केंद्रीय आदिवासी पट्टा" म्हणून संबोधले जाते.
 7. या लोकांचे हक्क जपण्याकरिता भारताकडे अनेक कायदे आणि घटनात्मक तरतुदी आहेत, जसे की मुख्य भूप्रदेशात घटनेची पाचवी अनुसूचित आणि ईशान्य भारताच्या काही विशिष्ट क्षेत्रासाठी सहाव्या अनुसूचित या लोकांचे जमिनीचे आणि स्व-प्रशासनाचे हक्क जपले जाते.


Top