Ban on 'import of oxytocin' hormones

 1. भारत सरकारने ‘ऑक्सीटोसिन’ हार्मोनच्या आयातीवर बंदी आणली आहे. अधिक दूध उत्पादनासाठी पशूंमध्ये होत असलेल्या अनियंत्रित उपयोगामुळे हा निर्णय घेतला आहे.
 2. ‘ऑक्सीटोसिन’ हार्मोनचा वापर पशूंमध्ये दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी केला जातो.
 3. संशोधकांच्या अभ्यासातून आसे आढळून आले आहे की, ऑक्सीटोसिनच्या अत्याधिक वापरामुळे पशूंमधील हार्मोनचे संतुलन बिघडते, सोबतच त्यांचे आयुर्मानही कमी होते.
 4. शिवाय दीर्घकाळापर्यंत ऑक्सीटोसिन दिल्यामुळे पशूंमध्ये वंध्यत्व येण्याची शक्यता वाढते.
 5. ऑक्सीटोसिनच्या वापरामुळे मिळालेल्या दुधाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर काही प्रतिकूल प्रभाव झाल्याचे दिसून आले आहे. त्याचा मानवाच्या हार्मोनवरही परिणाम दिसून आला आहे.
 6. शासनाने ऑक्सीटोसिनच्या देशांतर्गत उत्पादनाला पुरेसे म्हणत, त्याच्या आयातीवर तात्काळ बंदी आणली आहे.
 7. यापूर्वी शासनाने 2014 साली ऑक्सीटोसिनच्या विक्रीवर बंदी आणली होती.


 In 2017, more solar power was increased than fossil fuel capacity: UN report

 1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पाठिंब्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, 2017 साली सौर ऊर्जेने नवीन वीजनिर्मितीमध्ये जागतिक गुंतवणुकीवर प्रभुत्व राखले आहे, जे पूर्वी कधीच अस्तित्वात नव्हते.
 2. जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा उत्पादनापासून ते 'हरित' ऊर्जा स्रोताकडे एक स्थिर पाऊल जगाने उचलले आहे, असे वक्तव्य करण्यात आले आहे.
 3. ठळक मुद्दे:-
  1. 2017 साली जगात 98 गिगावॉट एवढ्या नव्या सौरऊर्जा क्षमतेची स्थापना केली गेली. हे प्रमाण इतर अक्षय ऊर्जा उत्पादने, जीवाश्म इंधन आणि अणुऊर्जा यांच्या एकत्रित क्षमतेहून खूप अधिक आहे.
  2. सौरऊर्जा क्षेत्रात इतर कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित केली गेली, जे 18% पेक्षा अधिक आहे आणि ते $160.8 अब्ज एवढे आहे.
  3. सौरऊर्जा क्षेत्रात गेल्या वर्षीच्या या वाढीला चीन कारक ठरला आहे. त्यांनी त्या काळात 53 गिगावॉट नवी क्षमता प्रस्थापित केली होती. त्यासाठी त्यांनी $86.5 अब्जची गुंतवणूक केली, जी जागतिक पातळीवरील निम्म्याहून अधिक (58.5%) आहे.
  4. 2017 साली नवीकरणीय क्षेत्रात जागतिक गुंतवणूक $ 200 अब्ज इतकी झाली आणि या हरित ऊर्जा स्त्रोतांमध्ये जगाने 2004 सालापासून आतापर्यंत $ 2.9 लक्ष कोटी गुंतविले आहेत.

सौर ऊर्जा क्षेत्रात भारत

 1. भारतात सौर ऊर्जा हा एक वेगाने विकसित होत असलेला उद्योग आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये देशभरातली सौरऊर्जा निर्मिती 20 गिगावॉट (GW) क्षमतेपर्यंत पोहोचली.
 2. 26 मे 2014 ते 31 जानेवारी 2018 या काळात भारतातील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत 8 पट वाढ झाली, जी 2650 MW पासून 20 GW करण्यात आली.
 3. खरं तर 20 GW क्षमतेचे लक्ष 2022 सालापर्यंत ठेवण्यात आले होते, परंतु सरकारने चार वर्षांपूर्वीच लक्ष्य साध्य केले.
 4. सौर ऊर्जा वीजनिर्मितीची सरासरी वर्तमान किंमत कोळसा आधारित वीज निर्मितीच्या तुलनेत 18% पर्यंत खाली आली आहे.
 5. गुजरात आणि राजस्थान हे भारतातील आघाडीचे सौर ऊर्जा उत्पादक आहेत.


 Hafiz Saeed's MML party declared terrorist organization

 1. मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदच्या मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) या राजकीय पक्षाला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
 2. याशिवाय तेहरिक ए आझादी ए काश्मीर (टीएजीके) या संघटनेलाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 3. मिल्ली मुस्लिम लीगशी संबंधित ७ जणांनादेखील अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले.
 4. एमएमएल आणि टीएजीके या दोन्ही संघटना लष्कर-ए-तोयबाचा भाग आहेत.
 5. लष्कर ए तोयबाचे डाव उधळून लावून त्यांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ही कारवाई केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
 6. या कारवाईनंतर आता अमेरिकेला ‘लष्कर’च्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करता येणार आहे.
 7. यापूर्वी हाफिज सईदच्या मिल्ली मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. या अर्जावर पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने जोरदार आक्षेप घेतला होता.


 Senior socialist leader Bhai Vaidya passed away

 1. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य (भालचंद्र सदाशिव वैद्य) यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे २ एप्रिल रोजी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
 2. स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री असलेले वैद्य राजकीय आणि सामाजिक चळवळीत मात्र 'भाई वैद्य' याच नावाने परिचित होते.
 3. भाई वैद्य यांचा जन्म २२ जून १९२७ रोजी झाला होता. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात चलेजाव चळवळीत सहभाग घेतला होता. 
 4. १९४३पासून ते राष्ट्रसेवा दलाचे सेवक झाले. त्यानंतर १९४६मध्ये कॉंग्रेस समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला.
 5. १९५५मध्ये गोवामुक्ती आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता.
 6. १९५७मध्ये संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्यांनी ३ आठवडे तुरुंगवास भोगला होता.
 7. १९६२ ते ७८ दरम्यान ते पुणे महापालिकेचे सदस्य होते. याचबरोबर, १९७४-७५ दरम्यान त्यांनी पुणे शहराचे महापौरपदही भूषविले होते.
 8. देशातील आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने मिसाबंदीखाली कारावास भोगला.
 9. १९८३मध्ये जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यान निघालेल्या भारत यात्रामध्ये ४००० किमी अंतराच्या यात्रेत त्यांचा सक्रिय सहभागहोता.
 10. पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून दीड वर्षे प्रशासन सांभाळले होते.
 11. कष्टकऱ्यांच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या भाई वैद्य यांनी त्यांना सुमारे २५ वेळा कारावास भोगला होता. अगदी अलीकडे शिक्षणहक्कासाठी सत्याग्रह करून वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली होती.
 12. त्यांनी ‘लोकशाही समाजवाद’ ही विचारधारा स्वीकारली आणि अखेरच्या श्वासापर्यंत जोपासली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.


Top

Whoops, looks like something went wrong.