WHO's recommendations on daily calorie intake

 1. जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) दररोजच्या आहारातून संपूर्ण पोषण प्राप्त करण्यासाठी काही शिफारसी जाहीर केलेल्या आहेत.
 2. असंसर्गजन्य रोगांवर (NCDs) नियंत्रण ठेवण्याचा हेतूने ही मार्गदर्शके तयार करण्यात आली आहेत.
 3. 2016 साली जगभरातील 54.7 दशलक्ष लोकांच्या मृत्युंमध्ये 39.5 दशलक्ष मृत्यू (72%) असंसर्गजन्य रोगांमुळे झालेली आहेत.
 4. असंसर्गजन्य रोगांमध्ये हृदयरोग (CVD) जवळजवळ निम्म्या मृत्यूस जबाबदार होता.
 5. डायटरी सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि ट्रान्स-फॅटी अॅसिड हे विशेष चिंतेचे विषय आहेत कारण यांचे अधिक सेवन हृदयरोग वाढवण्याच्या जोखमीशी निगडीत आहेत.
शिफारसी
 1. प्रौढ आणि मुलांनी त्यांच्या दररोजच्या कॅलरीच्या सेवनामधील 10% पर्यंत भाग सॅच्युरेटेड फॅट (मांस आणि लोणीमध्ये आढळतात) आणि 1% भाग ट्रान्स फॅटच्या स्वरुपात प्राप्त करावा. 
 2. सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड प्राण्यांपासून मिळालेल्या अन्नपदार्थांमध्ये आढळून येतात.
 3. हे पदार्था म्हणजे लोणी, दुध, मांस, सामन मासा आणि अंडी, चॉकलेट आणि कोकाआ बटर, नारळ, पाम आणि पाम कर्नेल तेल.
 4. ट्रान्स-फॅटी अॅसिड हे भाजीपाला आणि माश्याचे तेल यांच्या आंशिक हायड्रोजनेशनद्वारे औद्योगिकरीत्या तयार केले जाऊ शकतात.
 5. शिवाय ते मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये देखील नैसर्गिकरीत्या आढळतात.
 6. औद्योगिकरीत्या उत्पादित ट्रांस-फॅटी अॅसिड भाजलेले (बेकरी) आणि तळलेले पदार्थ (डोनट्स, कूकीज, क्रॅकर्स, पाय आदि), हवाबंद स्नॅक्स आणि अन्न आणि आंशिक हाइड्रोजनेटेड कुकिंग तेल आणि फॅट यामार्गांनी मिळू शकतात.


Develop new technologies using sunlight for water purification

 1. अमेरिकेच्या बफेलो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
 2. जे जवळजवळ 100% शुद्धतेसह जलशुद्धीकरणासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करते.
 3. हे तंत्र अधिक सोपे आहे आणि सौरशक्तीचा वापर असल्याने स्वस्तही आहे.
 4. कल्पना:-
  1. 2,000 वर्षांपूर्वी, ग्रीक तत्त्ववेत्ता एरिस्टोटल यांनी सूर्यापासून मिळणार्‍या ऊर्जेचा वापर करून पाण्याला वाफेत बदलून पाणी शुद्ध करण्याची कल्पना मांडली होती.
  2. बाष्पीभवनामुळे पाण्यामधील मीठ, जीवाणू व घाण मागे सोडली जाते आणि शुद्ध पाणी मिळते.
तंत्रज्ञान व प्रक्रिया
 1. सामान्यतः जेव्हा सौरऊर्जा पाण्याचे वाफेत रूपांतर करण्यासाठी वापरली जाते, काही ऊर्जा आसपासच्या वातावरणामुळे उष्णतेच्या रूपात नष्ट होते.
 2. त्यामुळे ही प्रक्रिया 100% हून थोडी कमी कार्यक्षम ठरत आहे.
 3. या प्रणालीमध्ये आसपासच्या वातावरणातली उष्णता शोषून घेण्यासाठी एक मार्ग आहे, ज्यामुळे याला अधिक सक्षम बनवले जाऊ शकते.
 4. एक त्रिकोणी आकाराचा काळा व कार्बनमध्ये बुडवलेला कागद पाण्याला शोषून घेणे आणि बाष्प करणे अश्या दोन्ही प्रक्रियेसाठी वापरला गेला आहे.
 5. कार्बनमध्ये बुडवलेल्या कागदाचा एक थर ‘व्ही’ आकारात दुमडून, तो उपकरणाच्या वरच्या बाजूला उलटा करून एखाद्या पक्ष्याच्या घराच्या छताप्रमाणे ठेवण्यात आला आहे.
 6. कागदच्या खालच्या कडा पाण्याच्या वरती अडकवण्यात आले आहे. हे कागद पाणी शोषून घेते.
 7. त्याच वेळी त्यावर असलेला कार्बन थर सौरऊर्जा शोषून घेते, ज्यामुळे बाष्पीभवनातून ते उष्णतेमध्ये रूपांतरीत होते.
 8. अभ्यासानुसार, प्रत्येक प्रति चौरस मीटर क्षेत्रफळात दररोज 2.2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन होऊ शकते.


India's 'amazing' growth will be more than 7%: ADB

 1. आशियाई विकास बँक (ADB) याच्या अहवालानुसार, चालू वित्त वर्षात भारताचा 7% हून अधिक पूर्वानुमानित आर्थिक वृद्धीदर आश्चर्यजनक स्वरूपाने गतीमय आहे.
 2. जर ही गती कायम राहणार असेल तर अर्थव्यवस्थेचा आकार एका दशकाच्या आतच दुप्पट होणार आहे.
 3. ADB ने भारताचा आर्थिक वृद्धीदर सन 2018-19 मध्ये 7.3% तर सन 2019-20 मध्ये 7.6% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
 4. भारताचा वृद्धीदर सन 2017-18 मध्ये 6.6% राहण्याचा अंदाज आहे, जो सन 2016-17 च्या 7.1% हून कमी आहे.
 5. वर्तमानात भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार $2500 अब्ज एवढा आहे आणि याप्रमाणे ही जगातली सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
 6. आशियाई विकास बँक (ADB) ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे.
 7. ज्याची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली.
 8. याचे मंडल्यूँग (फिलीपिन्स) येथे मुख्यालय आहे.
 9. ही बँक UN इकोनॉमिक कमीशन फॉर एशिया अँड फार ईस्ट (UNESCAP) आणि गैर क्षेत्रीय विकसित देशांच्या सदस्यांना सामावून घेते.


 Speed ​​of 'Noon Assemblies' campaign in Delhi schools

 1. ‘ड’ जीवनसत्व आणि त्याचे आरोग्यवर्धक परिणाम याबद्दल मुलांमध्ये जागरुकता पसरविण्यासाठी दिल्लीच्या शाळांमध्ये 'नून असेंब्ली (दुपारची शाळा)' ही संकल्पना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
 2. या उपक्रमाची सुरुवात पूर्व दिल्लीतील ‘हॅपी इंग्लिश स्कूल’ या शाळेने करत त्यांची सकाळची शाळा दुपारच्या कालावधीत भरविण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
 3. क्वालिटी लिमिटेड कंपनी आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांनी 9 एप्रिल 2018 रोजी दिल्लीत नॅशनल बाल भवन येथे नून असेंब्ली (दुपारची शाळा) या संकल्पनेला प्रस्तुत केले होते.
 4. संशोधकांच्या मते, सकाळी 11 वाजेपासून ते दुपारच्या 1 वाजेपर्यंत या काळात मिळणार्‍या सूर्यप्रकाशामुळे त्वचा सकाळच्या तुलनेत पाच पटीने अधिक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्व तयार करते.
 5. भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) याची स्थापना 2011 साली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत झाली.
 6. ही एक स्वायत्त संस्था आहे.
 7. आशिष बहुगुणा हे FSSAI चे वर्तमान अध्यक्ष आहेत आणि याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे.


 Bangladesh proposes to include non-Muslim states as OIC observers

 1. बांग्लादेशाने ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कांफ्रेंस (OIC)’ याच्या संहितेमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
 2. मुस्लिम बहुल नसलेल्या देशांना संघटनेत निरीक्षक म्हणून समावेश करण्याबाबत हा प्रस्ताव आहे.
 3.  जेणेकरून अश्या देशांमधील मुसलमान नागरिकांपर्यंत पोहचता येईल.
 4. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कांफ्रेंस (OIC) मुस्लिम बहुल 57 देशांची एक संघटना आहे.
 5. याची 1969 साली स्थापना करण्यात आली.
 6. याचे जेद्दाह (सौदी अरब) येथे मुख्यालय आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.