chalu ghadamodi

1. रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळास अर्थमंत्री निर्मला सीतारामन मार्गदर्शन करणार आहेत. यात अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य आणि आर्थिक शिस्तीसाठी आराखडा या विषयावर त्या मार्गदर्शन करतील.सरकारने वित्तीय तूट एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या ३.३ टक्क्यापर्यंत दाखवली असून अंतरिम अर्थसंकल्प अंदाजानुसार सहा हजार कोटींचा अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे.
2. फेब्रुवारीत अंतरिम अर्थसंकल्पात
वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षासाठी ३.४ टक्के दाखवली होती . सरकारने वित्तीय तूट कमी करण्यासाठी पावले उचलली असून २०२० ते २०२१ पर्यंत तूट ३ टक्क्यावर आणण्याचा इरादा आहे.


chalu ghadamodi

1. मुंबईत आंतरराष्ट्रीय सनफ्लॉवर बिया आणि तेल परिषद (एलएसएसओसी) 2019 ची तिसरी आवृत्ती आयोजित केली जाईल
2. सूर्यफूल तेल उत्पादक आणि उद्योग समूह यांच्यातील चांगल्या संप्रेषणांना प्रोत्साहित करण्याचा मुख्य हेतू आहे.
3. सोव्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) ने सादर केलेला कार्यक्रम 
आंतरराष्ट्रीय सनफ्लॉवर ऑइल असोसिएशन (आयएसओ) द्वारे आयोजित केले जाते.
4. सूर्यफूल बियाणे, तेल आणि जेवणमध्ये स्वारस्य असलेले जगभरातील
300 प्रतिनिधी सहभागी होतील.


chalu ghadamodi

1. गुलाबी रंगाचे शहर म्हणून ओळख असलेल्या जयपूरला युनेस्को वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे.तर वास्तुरचना व संवेदनशील संस्कृती यांचा वारसा जयपूरला लाभलेला आहे.

2. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक अझरबैजान येथील बाकू येथे 30 जूनला सुरू झाली असून 10 जुलै पर्यंत चालणार आहे. त्यात जयपूर शहराच्या प्रस्तावावर विचार करण्यात आला व त्यानंतर या शहराला यादीत समाविष्ट करण्यात आले.

3. तर आतापर्यंत 167 देशातील 1092 ठिकाणांची निवड युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये झाली आहे.

4. जयपूर हे राजस्थानातील ऐतिहासिक शहर असून त्याची स्थापना सवाई जयसिंग द्वितीय यांनी इ.स 1727 मध्ये केली. सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न असलेल्या राजस्थानची ती राजधानी असून शहर नियोजन व वास्तूकला या मुद्दय़ांवर जयपूरची शिफारस करण्यात आली होती. जयपूर शहर हे मध्ययुगीन व्यापार शहराचे दक्षिण आशियातील प्रतीक असून व्यापाराच्या नव्या संकल्पना तेथे उदयास आल्या. येथील पारंपरिक कलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.


chalu ghadamodi

1. आधार क्रमांकाच्या मदतीने विवरण पत्र भरणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीकर विभागाकडून नवीन पॅन क्रमांक स्वत:हून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी यांनी सांगितले.

2. तसेच ज्या करदात्यांकडे पॅन क्रमांक नाही त्यांना आधार क्रमांकाच्या मदतीने प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची मुभा देण्याची घोषणा केंद्राय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

3. तर करविवरण पत्र भरण्यासाठी आधारची बायोमेट्रिक ओळख पुरेशी आहे, असे सांगण्यात आले होते.


chalu ghadamodi

1. 8 जुलै 1497 ला वास्को द गामा भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले.

2. 8 जुलै 1889 मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.

3. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 8 जुलै 1910 ला मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.

4. रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी 8 जुलै 2006 मध्ये चलनात आली.


Top

Whoops, looks like something went wrong.