GOLD and ICON campaigns to explore NASA's ionosphere

 1. पृथ्वीपासून सुमारे 60 ते 1000 किलोमीटर इतक्या उंचीपर्यत वातावरणात आढळणारा आयनोस्फियर थर अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्याकरिता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ने GOLD आणि ICON नामक मोहिमा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमांमधून या थराची संपूर्ण आकृती तयार केली जाणार आहे.
 2. 'ग्लोबल-स्केल ऑब्जर्वेशन ऑफ द लिम्ब अँड डिस्क' (GOLD) याच महिन्यात तर 'आयनोस्फेयरिक कनेक्शन एक्सप्लोरर' (ICON) पुढच्या वर्षी अवकाशात सोडले जाणार आहे.
 3. ICON पृथ्वीपासून 560 किलोमीटरवरती तर GOLD भू-भौगोलिक कक्षेत (35000 किलोमीटर) परिभ्रमण करणार आहे.
 4. मोहिमांची उद्दिष्टे:-
  1. वातावरणाच्या वरच्या थरात हवामान संबंधित बदल पद्धतशीरपणे मोजणे हे या मोहिमांमधील एक सामायिक ध्येय आहे. 
  2. यातून प्रथमच हे पहिल्या जाणार की, वरचे वातावरण चक्रीवादळे आणि भू-चुंबकीय वादळ अश्या भौगोलिक आपत्ती परिस्थितीत प्रतिसाद देत कश्याप्रकारे बदलते.
  3. ICON आणि GOLD मोहिमा अंतराळ यानासोबत एक छोटा प्रवास करणार आणि पृथ्वी आणि इतर ग्रहांभोवती असलेल्या अंतराळापासून ते सूर्यापासुन सतत वाहणार्‍या सौर-पवनच्या प्रवाहाची उच्चतम मर्यादा जाणून घेण्यापर्यंतची व्यापक आंतरजोडणी प्रणालीचा अभ्यास करणार आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
  1. वातावरणाच्या या थरात सूर्यापासुन येणारी विकिरणे अणु-विद्युतभारीत (electrically charged) इलेक्ट्रॉन आणि विद्युतभारीत कण (ions) यांच्या संपर्कात येतात. पृथ्वीवरून पाठवविलेल्या रेडियो लहरीदेखील या थरामधून परावर्तित होऊन पृथ्वीवर परततात.
  2. त्यामुळे विमाने, सागरी जहाजे आणि ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GPS) उपग्रहांमध्ये रेडियो लहरींच्या वापरासाठी या थरात मानवीय हस्तक्षेप अधिकाधिक होत आहे.


The first advance estimates of National Income 2017-18 are announced

 1. केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय (CSO) ने प्रसिद्ध केलेल्या ‘राष्ट्रीय उत्पन्न 2017-18’ च्या प्रथम आगाऊ अंदाजानुसार, कृषी व निर्माण क्षेत्राच्या खराब प्रदर्शनामुळे देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वृद्धीदर वित्तवर्ष 2017-18 मध्ये 6.5% च्या चार वर्षांमधील सर्वात खालच्या पातळीवर राहणार आहे.
 2. वित्तवर्ष 2016-17 मध्ये GDP वृद्धीदर 7.1% होता, जेव्हा की हा त्याआधी 8% तर त्याच्या आधी वित्तवर्ष 2014-15 मध्ये 7.5% होता.
 3. वास्तविक सकल मूल्यवर्धन (GVA) च्या आधारावर वित्तवर्ष 2017-18 मध्ये वृद्धी 6.1% राहण्याचा अंदाज आहे, जो मागच्या वर्षात 6.6% होता.
 4. नोटबंदी आणि त्यानंतर वस्तू व सेवा कर (GST) यामुळे प्रभावित चालू वित्तवर्षात आर्थिक क्रियाकलापात घट दिसून आलेली आहे.
 5. कृषी, वन आणि मत्स्यपालन क्षेत्राचा वृद्धीदर चालू वित्तवर्षात घटून 2.1% वर येण्याचा अंदाज आहे, जो मागच्या वर्षात 4.9% होता.
आगाऊ अंदाजित दर 
 1. विनिर्माण क्षेत्र 4.6% (मागच्या वर्षात 7.9%) 
 2. खाणकाम आणि उत्खनन (2.9%) 
 3. बांधकाम (3.6%)
 4. प्रसारण, व्यापार, हॉटेल्स आणि वाहतूक व दळणवळण आणि प्रसारण सेवा (8.7%, वाढ)
 5. आर्थिक, विमा, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा (7.3%, वाढ)
 6. सार्वजनिक प्रशासन आणि संरक्षण  इतर सेवा (11.3% मध्ये 9.4% ची वाढ)
 7. दरडोई उत्पन्न (5.3%, 86660, घट)


Research project to create CSIR's environmentally-friendly fireworks

 1. वर्तमान फटाके उत्पादन उद्योगांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ने पर्यावरण-पूरक फटाके तयार करण्यासाठी संशोधन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी प्रदूषण मुक्त फटाके तयार करण्याची योजना CSIR-CEERI करीत आहे.
 3. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे.
 4. याची स्थापना 26 सप्टेंबर 1942 रोजी करण्यात आली.
 5. या संस्थेमार्फत सहाय्यक प्राध्यापक तसेच कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती यासाठी 'राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट)' घेतली जाते.
 6. याच्या देशभरात 39 प्रयोगशाळा (ज्यात 5 क्षेत्रीय संशोधन प्रयोगशाळा) आणि 50 क्षेत्रीय केंद्रे आहेत.


Akshay Kumar appointed as the ambassador for clean Mumbai campaign

 1. स्वच्छ मुंबई अभियानात सहभागी होणाऱ्या रहिवाशांचे आभार मानण्याकरिता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची संदेशदूत म्हणून मुंबई महानगरपालिकेने नेमणूक केली आहे.
 2. गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या उघडय़ावर हागणदारी विरोधातील मोहिमेत अक्षय कुमार  ब्रॅंड अ‍ॅम्बेसिडर म्हणून सहभागी झाला होता.
 3. या वर्षीही सामाजिक बांधिलकी कायम ठेवत, स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत आहे.
 4. स्वच्छ भारत अभियानात नागरिकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
 5. केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात नागरिकांच्या सहभागावर विशेष भर दिला जातो त्यामुळे महानगरपालिकेतर्फे नागरिकांचे स्वच्छ मुंबई मोहीमेत सहभागी झाल्याबद्दल आभार मानत आहोत, त्यासाठी अक्षय कुमार यांनी सहभागी होण्याची तयारी दाखवली, असे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.
 6. स्वच्छता सर्वेक्षण ४ जानेवारीपासून शहरात सुरू झाले असून केंद्राकडून आलेला गट पाहणी करत आहे.
 7. महापौर- विश्वनाथ महाडेश्वर 
 8. आयुक्त -अजॉय मेहता
   


Indian origin has won the Golden Globe Award for Best Actor

 1. भारतीय वंशाचा अमेरिकन अभिनेता अजीज अन्सारी यांना म्युझिकल कॉमेडी विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
 2. टेलिव्हिजन सीरिज ‘द मास्टर ऑफ नन’मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी त्याचा गौरव करण्यात आला.
 3. हा अजीजचा सर्वात पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार ठरला आहे.
 4. गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे यंदाचे हे ७५ वे वर्ष आहे.
 5. ‘द मास्टर ऑफ नन’ या कार्यक्रमासाठी अन्सारीला २०१६ मध्येही त्याच विभागासाठी नामांकन मिळाले होते. पण, त्यावेळी मात्र हा पुरस्कार मिळवण्यात तो अपयशी ठरला होता.
 6. पण, यंदा मात्र अजीजने या पुरस्कारावर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं आहे असंच म्हणावं लागेल.
 7. अजीजव्यतिरिक्त इतरही बऱ्याच कलाकारांचा या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात गवगवा पाहायला मिळाला.
 8. अभिनेत्री निकोल किडमनला ‘बिग लिटिल लाइट्स’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

गोल्डन ग्लोबमधील सर्व पुरस्कार आणि विजेत्यांची यादी

 1. बेस्ट मोशन पिक्चर- ड्रामा- थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग
 2. बेस्ट मोशन पिक्चर- म्युझिकल/ कॉमेडी- लेडी बर्ड
 3. बेस्ट अॅक्ट्रेस, मोशन पिक्चर ड्रामा- फ्रान्सेस मॅकडोरमंड
 4. बेस्ट अॅक्टर, मोशन पिक्चर ड्रामा- गॅरी ओल्डमॅन
 5. बेस्ट अॅक्टर, मोशन पिक्चर म्युझिकल/ कॉमेडी- जेम्स फ्रॅन्को
 6. बेस्ट अॅक्ट्रेस, मोशन पिक्चर म्युझिकल/ कॉमेडी- सोर्स रोनन
 7. बेस्ट परफॉर्मन्स (अॅक्ट्रेस) सपोर्टिंग रोल मोशन पिक्चर- एलिसन जेनी, आई, तोन्या
 8. बेस्ट परफॉर्मन्स (अॅक्टर) सपोर्टिंग रोल मोशन पिक्चर- सॅम रॉकवेल
 9. बेस्ट डायरेक्टर, मोशन पिक्चर – गुलिर्मो डेल टोरो (दि शेप ऑफ वॉटर)
 10. बेस्ट परफॉर्मन्स (अॅक्टर) मोशन पिक्चर, म्युझिकल/ कॉमेडी- जेम्स फ्रॅन्को (दि डिझास्टर आर्टिस्ट)
 11. बेस्ट स्क्रीनप्ले, मोशन पिक्चर – मार्टिन मॅक्डॉनाग (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग)
 12. बेस्ट मोशन पिक्चर, अॅनिमेटेड – कोको
 13. बेस्ट मोशन पिक्चर, फॉरेन लॅंग्वेज – इन दि फेड
 14. बेस्ट ओरिजिनल साँग, मोशन पिक्चर – दिस इज मी (दि ग्रेटेस्ट शोमॅन)
 15. बेस्ट टीव्ही सीरिज, ड्रामा – दि हैंडमेड्स टेल
 16. बेस्ट परफॉर्मन्स अॅक्टर, टीव्ही सीरिज, ड्रामा- स्टर्लिंग के ब्राउन (दिस इज अस)
 17. बेस्ट टीव्ही सीरिज, म्यूझिकल/ कॉमेडी – दि मार्वलस मिसेस मेजल (अमेजन)
 18. बेस्ट परफॉर्मन्स इन टीव्ही सीरिज (अॅक्ट्रेस) म्युझिकल/ कॉमेडी – रेचल ब्रॉसनहन (दि मार्वलस मिसेस मेजल)
 19. बेस्ट टीव्ही लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीव्ही – बिग लिटिल लाइज (एचबीओ)
 20. बेस्ट परफॉर्मन्स इन लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीव्ही (अॅक्ट्रेस) – निकोल किडमॅन (बिग लिटिल लाइज)
 21. बेस्ट परफॉर्मन्स इन लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीवी (अॅक्टर) – इवान मॅकग्रेगर (फार्गो)
 22. बेस्ट परफॉर्मन्स सपोर्टिंग रोल इन सीरिज, लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीवी (एक्ट्रेस) – लॉरा डर्न (बिग लिटिल लाइज)
 23. बेस्ट परफॉर्मन्स सपोर्टिंग रोल इन सीरिज, लिमिटेड सीरिज/ मोशन पिक्चर फॉर टीवी (अॅक्टर) – एलेग्जेंडर स्कार्सगार्ड


The unveiling of the playlist 'Play India'

 1. केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्रालयाकडून आकर्षक ‘खेलो इंडिया’ च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. 
 2. तीन-स्ट्रोक ‘खेलो इंडिया’ लोगो बोधचिन्ह ओगिलवी इंडियाद्वारा तयार केले गेले.
 3. 31 जानेवारी 2018 पासून ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ चे उद्घाटन नियोजित आहे. या खेळांचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्सद्वारा केले जाणार आहे.
 4. एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली होती.
 5. समाजाच्या अगदी तळ पातळीवर बदल करून राष्ट्रव्यापी क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नियोजित ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ याच्या प्रथम संस्करणात जवळपास 6000 खेळाडू आणि अधिकारी भाग घेतील.
 6. स्पर्धांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार, जी 1000 उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे.
 7. वर्षागणीक खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जोडण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धा आणि शिक्षण अश्या दोन्ही प्रकारे खेळाडूंना सहभाग घेता येईल अश्या देशभरातल्या 20 विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देणार आहे.
 8. मोठ्या राष्ट्रीय शारीरिक आरोग्यसंबंधी कार्यक्रमामधून 10-18 वर्षे वयोगटातील 200 दशलक्ष लहान मुला-मुलींना या कार्यक्रमात समाविष्ट केले जाईल.


Adv. Madhukar Pratikra passes away

 1. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विदर्भ अनुशेषाचे गाढे अभ्यासक, स्वतंत्र विदर्भाचे खंदे समर्थक आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य अ‍ॅड. मधुकर उपाख्य मामा किंमतकर यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
 2. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या प्रश्नांचा अभ्यास असणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
 3. रामटेकमध्ये १० ऑगस्ट १९३२ला जन्मलेल्या मधुकरराव किंमतकर यांचे प्राथमिक शिक्षण रामटेकला झाले.
 4. १९५५मध्ये पुढील शिक्षणासाठी ते नागपूरला आले. नरेंद्र तिडके यांच्या आग्रहास्तव मॉडेल मिल कामगार चळवळीत सहभागी झाले.
 5. त्यांनी १९५८मध्ये वकिलीचे शिक्षण घेतले आणि न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली सुरू केली.
 6. महाविद्यालयीन जीवनातच ते काँग्रेस सेवादलात सहभागी झाले होते.
 7. १९८०मध्ये त्यांनी काँग्रेसकडून रामटेकमधून विधानसभेची निवडणूक लढवली व विजयी झाले.
अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांचा राजकीय प्रवास
 1. १९८२मध्ये बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. त्यानंतर वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे वित्त, नियोजन कामगार, विधि व न्याय या विभागाचा कार्यभार होता.
 2. राजकीय जीवनात त्यांनी सुरुवातीपासूनच विदर्भाच्या विकासावर लक्ष्य केंद्रित केले होते. सरकार या भागाकडे लक्ष देत नसल्याची त्यांची धारणा होती.
 3. १९८५च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांची राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. १९९०पर्यंत या पदावर कार्यरत होते.
 4. १९९२मध्ये म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. १९९२ ते ९८ या काळात विधान परिषद सदस्य होते.
 5. १९९४ मध्ये राज्यपालांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून ते या मंडळाचे तज्ञ सदस्य म्हणून काम करीत होते.
 6. अलीकडेच त्यांना रामटेक भूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.


Top

Whoops, looks like something went wrong.