Inauguration of the first phase of this port of Chabahar

 1. भारताने इराणमध्ये विकसित केलेल्या चाबहार या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते झाले.
 2. या बंदरामुळे पाकिस्तानला वळसा घालून इराण, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात व्यापारासाठी वाहतुकीचा नवा मार्ग खुला होणार आहे.
 3. तसेच या बंदरामुळे मध्य आशियातील देशांशी व्यापारही आता वेगाने आणि अधिक सुकर होणार आहे.
 4. या प्रकल्पाचा करार १५ वर्षांपुर्वी इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महंमद खातमी नवी दिल्लीला आले असताना करण्यात आला होता.

 चाबहारचे महत्त्व :-

 1. इराणच्या आखातात होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर वसलेले चाबहार बंदर भारतासाठी व्यापारी तसेच सामरिकदृष्ट्याही उपयुक्त ठरणार आहे.
 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०१६ मध्ये इराणला दिलेल्या भेटीत भारत, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये संपर्क विकसित करण्यासाठी चाबहार बंदराच्या विकासाच्या करारावर स्वाक्षरी केली होती.
 3. भारताने गतवर्षी या बंदराच्या विकासासाठी ५०० दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली होती. त्यातून चाबहार बंदराचा विस्तार करण्यात येत आहे. 
 4. या बंदराची माल हाताळण्याची क्षमता पूर्वी वर्षांला २.५ दशलक्ष टन इतकी होती. आता ती वर्षांला ८.५ दशलक्ष टन इतकी वाढवण्यात आली आहे.
 5. चीनचा अरबी समुद्रामधील वाढता वावर पाहता भारतालाही येथे आपले स्थान निर्माण करण्याची गरज होती. चाबहार बंदरामुळे भारताला अरबी समुद्रक्षेत्रामध्ये भक्कम स्थान प्राप्त होईल.
 6. चाबहार जवळच पाकिस्तानच्या किनाऱ्यावरील ग्वादर हे बंदर चीन विकसित करत आहे. हे बंदर चाबहार पासून समुद्रमार्गे केवळ १०० किमी अंतरावर आहे. त्यामुळे भारतासाठी चाबहार बंदर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
 7. चाबहारला रस्ता व रेल्वेमार्गे अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पात अफगाणिस्तानही भारताचा भागीदार असणार आहे.
 8. चाबहार बंदराचा एक मोठा फायदा म्हणजे मध्यपुर्वेत आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी भारताला नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.
 9. त्याचप्रमाणे रशिया, युरोप, मध्य आशियातील उझबेकिस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान अशा देशांपर्यंत भारत आता पोहोचू शकेल.
 10. अफगाणिस्तानला कोणतीही मदत किंवा व्यापार करताना पाकिस्तानचा येणारा अडथळा आता दूर होणार आहे.
 11. चाबहार बंदरामुळे इंधनाचे आयातमूल्य कमी होऊन भारतामधील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. इंधनाप्रमाणे कोळसा, साखर व तांदुळाचा व्यापारही आता चाबहारमुळे सोपा होणार आहे.


Restrictions on Buying Companies

 1. बँकेच्या बुडीत कर्जामुळे दिवाळखोरीत निघालेल्या कुटुंबातील मालकांच्या कंपन्या खरेदी करण्यावर निर्बंध आणणारा वटहुकुम केंद्र सरकारने जारी केला आहे.
 2. या वटहुकुमानुसार, भाऊ, जवळचे नातेवाईक, सहकारी यांच्या दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्या मोठ्या कंपन्यांना खरेदी करता येणार नाहीत.
 3. या निर्णयाचा फटका साजन जिंदाल, मुकेश अंबानी, एल.के. मित्तल यासारख्या मातब्बर उद्योगपतींनाही बसला आहे.
 4. तसेच कंपनी कायदा २०१३ अंतर्गत अपात्र ठरलेल्या संचालकांनादेखील अशी दिवाळखोरीत निघालेली कंपनी खरेदी करता येणार नाही.
 5. अशा या निर्णयांमुळे मोदी सरकारने देशातील किमान तीन लाख कंपन्या व त्यांचे पाच ते सहा लाख संचालक अपात्र ठरवले आहेत.
 6. हे कोणीच आता बुडीत कर्जामुळे दिवाळखोरीत निघालेल्या ५०० कंपन्या या वटहुकुमामुळे खरेदी करू शकणार नाहीत.
 7. याशिवाय दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेचा गुन्हा केलेली व्यक्ती (शिक्षा झाली नसली तरी) दोषी असल्यास तिलाही या कंपन्या खरेदी करता येणार नाहीत.


China has stopped Pakistan's financial supply

 1. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पाकिस्तानमधील चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) अंतर्गत येणाऱ्या तीन मोठ्या प्रकल्पांचा आर्थिक पुरवठा चीनने थांबवला आहे.
 2. चीनने निधी रोखल्यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय महामार्ग अधिकार यंत्रणेंतर्गत येणा‍ऱ्या १०० अब्ज रुपयांच्या प्रकल्पांना फटका बसणार आहे.
 3. चीनने अर्थ पुरवठा थांबवल्याने डेरा इस्लाइल खान-झोब रोड, खुजदार-बसिमा रोड, रायकोटपासून थाकोटला जाणारा काराकोरम महामार्ग हे तीन मोठे प्रकल्प रखडणार आहेत.
 4. चीनने नवी मार्गदर्शक तत्त्वे व नियमावली जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांसाठी पुन्हा निधी दिला जाणार आहे.
 5. सीपीईसी हा चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना ‘वन बेल्ट वन रोड’चा (ओबीओआर) महत्त्वपूर्ण भाग आहे.
 6. पाकव्याप्त काश्मीरमधून जाणारा हा प्रकल्प बलुचिस्तान आणि चीनच्या शिनजियांग प्रांताला जोडणार आहे.
 7. या माध्यमातून पश्चिम चीनला अरबी सुमद्राला जोडण्याचा चीनचा प्रयत्न आहे.
 8. सीपीईसीसाठी ६० अब्ज डॉलर खर्च केले जाणार असून, यामुळे पाकिस्तानमध्ये सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे विविध प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत.
 9. परंतु आता चीनने आर्थिक रसद रोखल्याने पाकिस्तानच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा वेग मंदावणार आहे.
 10. हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्यामुळे चीनच्या या योजनेला भारताने आधीपासूनच विरोध केला आहे.


Pt Tansen Award for Ulhas Vahalkar

 1. संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे.
 2. दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 3. कशाळकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक आहे.
 4. ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत असणारे गवई आहेत.
 5. त्यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेले आपले वडील नागेश दत्तात्रेय कशाळकर यांच्याकडे घेतले.
 6. नागपूर विद्यापीठातून त्यांनी संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. नंतर त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांच्याकडे संगीताभ्यास केला.
 7. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.
 8. त्यांनी आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात १९८३ ते १९९० दरम्यान काम केले आहे. 
 9. यापूर्वी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


Top