MPSC chalu ghadamodi, current affairs

1. जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एलआयसी) ने ‘जीवन अमर’ नावाची बहुप्रतिक्षित स्वस्त मुदत योजना सुरू केली असून यामुळे पॉलिसीधारकांना अधिक फायदे आणि लवचिकता मिळेल.

2. ही नवीन मुदत योजना ही बाजारपेठेशी संबंधित योजना नाही जे सदस्यांच्या वर्गवारीसाठी दोन पर्याय देईल- लेव्हल सम अ‍ॅश्युअर्ड आणि वाढती अ‍ॅश्युअर्ड रक्कम. विपणन-नसलेल्या योजनेत पॉलिसीधारक परिपक्वतावर गुंतविलेल्या / विमा उतरलेल्या रकमेचा दावा करु शकत नाहीत.

3. केवळ, पॉलिसीच्या मुदतीमध्ये एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास, उमेदवाराला मृत्यूचा दावा मिळतो.

4. जीवन अमर पॉलिसीमध्ये धूम्रपान करणारे आणि धूम्रपान न करणार्‍या अशा दोन प्रकारांपैकी एक निवडण्याचा पर्याय आहे. एलआयसी कडून हे नवीन टर्म पॉलिसी केवळ ऑफलाइन विकल्या जाईल आणि अधिकृत एलआयसी एजंटकडूनच विकत घेता येईल.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी, तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे.

2. तर शाल, श्रीफळ आणि 51,000 हजार रुपये रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

3. चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणार्या मान्यवरांना देण्यात येणारे ‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार बुधवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले.

4. तसेच रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, अप्पा वढावकर, नरेंद्र पंडित, प्रशांत पाताडे, दीपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मींना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे तसेच राजनैतिक संबंधांचा स्तरही घटवणार असल्याचे म्हटले आहे.

2. तर पाकिस्तान आपल्या उच्चायुक्तांना भारतात पाठवणार नसल्याचे समजते. पाकिस्तानने भारतासाठी नियुक्त केलेले उच्चायुक्त या महिन्यात पदभार संभाळणार होते. त्याचवेळी भारताचे उच्चायुक्त अजय बिसारीया यांना पाकिस्तान सोडण्यास सांगितले आहे. बुधवारी झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत खालावत्या कर्ज मागणीला उभारी देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात थेट 0.35 टक्के कपात केली.

2. रिझव्‍‌र्ह बँकेने चौथ्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर 0.35 टक्के कमी करत 5.40 टक्के असा गेल्या जवळपास दशकातील किमान स्तरावर आणून ठेवला. यामुळे व्यापारी बँकांचा कर्जभार कमी होणार असून त्याचा लाभ कर्जदारांना होणार आहे.

3. तर पतधोरणापूर्वीच स्टेट बँक, एचडीएफसीने काही प्रमाणात दरकपात केली. मात्र आता अन्य बँकांनाही दरकपातीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्ज मागणीला उठाव नसल्याने नव्या दरकपातीने या क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त होण्याची चिन्हे आहेत.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार ‘भारत रत्न’ देऊन गौरवण्यात येणार आहे.

2. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिकायांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

3. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. भारतरत्नने आजवर 45 जणांना सन्मानित करण्यात आले आहे.

4. यापूर्वी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 8 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय मांजर दिन‘ आहे.

2. सन 1942 मध्ये 8 ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.

3. भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी 8 ऑगस्ट 1958 मध्ये कार्यान्वित झाली.

3. पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय(Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सन 1994 मध्ये 8 ऑगस्ट रोजी सुरू केले.

4. सन 1998 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.


Top