भारत, म्यानमार यांनी 11 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या

 1. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय प्रतिनिधीमंडळ म्यानमार देशाच्या भेटीवर आहेत.
 2. या भेटीत दोन्ही राष्ट्रांमध्ये परस्पर संबंधांना चालना देण्यासाठी विविध क्षेत्रात 11 सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत.   

सागरी सुरक्षाविषयी सहकार्य करण्यासाठी करार:-

 1. सन 2017-2020 मध्ये सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांसाठी करार
 2. यामेथिन, म्यानमार येथील महिला पोलिस प्रशिक्षण केंद्र अद्ययावत करण्यासाठी सहकार्य वाढवण्यासाठी करार
 3. व्हाइट शिपिंगसंबंधी माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी भारतीय नौदल आणि म्यानमार नौदल यांच्यात करार
 4. तटीय पाळत यंत्रणा उपलब्ध करविण्यासाठी तांत्रिक करार
 5. वैद्यकीय उत्पादनांच्या नियमनामधील सहकार्यासाठी भारताच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) आणि म्यानमारच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्यात करार
 6. आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्यासाठी करार
 7. MIIT च्या स्थापनेबाबत सामंजस्य कराराच्या विस्तारासाठी पत्राचार
 8. माहिती तंत्रज्ञानसंबंधी कौशल्य वाढविण्यासाठी भारत-म्यानमार केंद्र स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य कराराच्या विस्तारासाठी पत्राचार
 9. निवडणुकीच्या क्षेत्रात करार
 10. म्यानमार प्रेस कौन्सिल आणि भारतीय प्रेस कौन्सिल यांच्यातल्या सहकार्यासाठी करार
 11. म्यानमार हा भारताचा धोरणात्मक शेजारी देश आहे. हा देश ईशान्येकडील नागालँड आणि मणिपूर यांसारख्या राज्यांसह भारतासोबत 1,640 किलोमीटर लांबीच्या सीमा सामायिक करतात.


‘भारतात रस्ते अपघात-2016’ अहवाल प्रसिद्ध

 1. रस्ते परिवहन व महामार्ग, नौवहन, जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितिन गडकरी यांनी ‘भारतात रस्ते अपघात-2016’ अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात 2016 साली झालेल्या रस्त्यांवरील अपघात घटनांचा संपूर्ण अहवाल दिलेला आहे.    
 2. याप्रसंगी ‘मिशन रोड सेफ्टी’ या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर रस्ते अपघातांविषयी माहिती आणि आकडे उपलब्ध करून देणार.

अहवालाचे ठळक मुद्दे:-

 1. राष्ट्रीय पातळी -
 2. 2016 साली देशातील अपघातांमध्ये जवळपास 4.1% ची घट आलेली आहे. संपूर्ण वर्षात 4,80,652 अपघाताच्या घटना घडल्या, जेव्हा की 2015 साली ही संख्या 5,01,423 इतकी होती.
 3. 2016 साली अपघातांमध्ये मृत पावलेल्यांच्या संख्येत 3.2% ने वाढ झाली. म्हणजेच 1,50,785 लोग मारले गेले, जेव्हा की 2015 साली 1,46,133 लोकांचा मृत्यु झाला.
 4. वर्ष 2017 च्या पहिल्या सहा महिन्यात अपघातांमध्ये 3% ची घट दिसून आली आहे आणि यात मृत पावलेल्यांच्या संख्येत 4.75% ने घट झाली आहे. 2,36,458 अपघातांमध्ये 75,583 लोकांचा मृत्यू झाला.
 5. राज्य पातळी -
 6. वर्ष 2017 च्या पहिल्या सहा महिन्यात 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अपघातात मृत पावलेल्यांच्या संख्येत घट झाली आहे.
 7. वर्ष 2017 च्या पहिल्या सहा महिन्यात केवळ आसाम, बिहार, ओडिशा आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये मरणार्‍यांच्या संख्येत 2-8% ची वाढ झाली आहे.
 8. 2016 साली देशात घडलेल्या एकूण अपघातांच्या 86% अपघात केवळ 13 राज्यांमध्ये घडल्याचे दिसून आले आहे. यात तामिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे.
 9. 2016 साली देशात घडलेल्या एकूण अपघातांमध्ये झालेल्या मृतांच्या एकूण संख्येच्या 84% तर उत्तरप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा आणि बिहार या राज्यांमध्ये मारले गेले.
 10. शहरानुसार - 2016 साली चेन्नईमध्ये सर्वाधिक 7,486 अपघात घटना घडल्या. तर दिल्लीत अपघातांमध्ये सर्वाधिक 1,591 लोकांचा मृत्यू झाला.
 11. वयोगटानुसार -2016 साली अपघातांमध्ये बळी पडलेल्या लोकांमध्ये 18-35 वर्षे वयोगटातील युवांची संख्या 46.3% (69,851 व्यक्ती) आणि 18-45 वर्षे वयोगटातील लोकांची संख्या 68.6% (1,03,409 व्यक्ती) तसेच 18-60 वर्षे वयोगटातील लोकांची संख्या 83.3% (1,25,583 व्यक्ती) होती.
 12. लोकसंख्येनुसार - प्रत्येक एक लाख लोकांमध्ये अपघातांची संख्या 2010 साली 42.5% होती, जी 2016 साली घसरून 37.9% झाली, ज्यात अनुक्रमे मृतांची संख्या 2010 साली 44.8% होती, जी 2016 साली घसरून 39% झाली.
 13. रस्त्याच्या प्रकारानुसार - 2016 साली महामार्गावर 29.6% अपघात घडलेत आणि यात मरणार्‍यांची संख्या ही एकूण मृतांच्या 34.5% आहे.
 14. वाहन प्रकारानुसार - 2016 साली दुचाकी वाहनांना सर्वाधिक 33.8% अपघात घडलेत. यानंतर मोटर कार, जीप आणि टॅक्सी यांना 23.6%; ट्रक, टॅम्पों, ट्रॅक्टर आणि अन्य वाहन यांना 21.0%; बसला 7.8%; ऑटो रिक्शाला 6.5% आणि अन्य मोटर वाहनांना 2.8% अपघात घडलेत.
 15. मंत्रालयाने अपघातात कमतरता येण्यासाठी तसेच अपघातात सापडलेल्यांना लवकर मदत बहाल करण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. यात अभियांत्रिकी उपाय, उत्तम वाहन सुरक्षा मानके, नागरिकांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणे, कायदे लागू करणे तसेच मदत केंद्रे आणि ट्रॉमा केयर सुविधा यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा स्तरीय समितीचे गठन करण्यात येणार आहे.
 16. ही समिती रस्त्यांच्या स्थितीत सुधार करण्यासाठी स्थानीक पॉलटेक्नीक विद्यार्थ्यांची मदत घेणार.


भारतात सर्व क्षयरोग रुग्णांच्या तपासणीसाठी ‘युनिव्हर्सल ड्रग सेंसेटिव्हीटी टेस्ट’ कार्यक्रम सुरु

 1. क्षयरोगावर प्रथम टप्प्यात दिलेल्या जाणार्‍या औषधांना प्रतिकार होत असल्याची लक्षणे शोधण्यासाठी 1 सप्टेंबर 2017 रोजी देशातल्या सर्व क्षयरोग (ट्यूबरक्युलोसिस/TB) रुग्णांची तपासणी करण्यासाठी भारतात आरोग्य विभागाकडून ‘युनिव्हर्सल ड्रग सेंसेटीव्हीटी टेस्ट (सार्वत्रिक औषध संवेदनक्षमता तपासणी)’ नावाचा एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
 2. या राष्ट्रव्यापी कार्यक्रमामधून मोठ्या संख्येने आतापर्यंत लक्षात न आलेल्या क्षयरोग रुग्णांची तसेच क्षयरोग आणि ह्यूमन इम्युनोडिफीसिअन्सी व्हायरस (HIV) च्या बहू-संक्रमणाने ग्रासलेल्या रुग्णांची ओळख पटू शकणार.

राष्ट्राव्यापी कार्यक्रमाची आवश्यकता:-

 1. जरी क्षयरोग रूग्णांच्या संख्येत जगात भारत आघाडीवर असले तरीही, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) असे अनुमान काढले आहे की संभाव्यतः आणखी लाखो क्षयरोगाने ग्रासलेल्या भारतीयांची सरकारला ओळख पटलेली नसू शकते.
 2. एकट्या 2015 साली, संशयाखाली नऊ दशलक्ष भारतीयांची तपासणी करण्यात आली होती आणि त्यामध्ये 900000 लोकांना क्षयरोग असल्याचे आढळून आले. सुमारे 3% नवीन क्षयरोग प्रकरणे आणि सध्याच्या 18% क्षयरोग प्रकरणे औषध-प्रतिरोधक असल्याचे मानले जाते आहे.

जीनएक्सपर्ट: मॉलीक्युलर डायग्नोस्टिक टेस्ट:-

 1. हा राष्ट्रव्यापी कार्यक्रम ‘जीनएक्सपर्ट’ या मॉलीक्युलर निदानासाठीच्या तपासणीचा वापर करून चालवला जाणार आहे. जीनएक्सपर्ट हे अमेरिकेने विकसित केलेले तंत्रज्ञान साधन असून ते 2010 सालापासून जगभरात वापरली जात आहे.
 2. ही तपासणी 90 मिनिटांतच क्षयरोगाच्या विषाणूचा शोध लावण्यासोबतच रायफॅम्पसिन या प्रचलित औषधाला प्रतिकार होत असल्यासंबंधी तपास करू शकते. अशाच परिणामांसाठी पारंपारिक तपासण्या कमीतकमी एक  किंवा अधिक दिवस घेतात आणि त्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता असते.

अंमलबाजवणीचे धोरण:-

 1. हा कार्यक्रम सर्वप्रथम अरुणाचल प्रदेश, बिहार, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. तथापि, या राज्यांमध्ये क्षयरोग रुग्णांची संख्या कमी आहे.
 2. धोरणाचा भाग म्हणून, या राज्यांमध्ये 1 ऑगस्ट 2017 किंवा त्यानंतरच्या स्थितीत ही निदान प्रक्रिया रुग्णांसाठी अंमलात आणणे अपेक्षित आहे.

सरकार पुढील आव्हाने:-

 1. भारताच्या नवीनतम WHO च्या नवीन आकडेवारीनुसार 2015 साली जागतिक स्तरावर असलेल्या क्षयरोगींच्या 96 दशलक्ष संख्येत भारतात 2.2 दशलक्ष क्षयरोगी असल्याचा अंदाज आहे.
 2. क्षयरोग निर्मूलनासंबंधी भारताच्या धोरणात मल्टि-ड्रग रेझीस्टन्ट क्षयरोगाचे निदान करणे हा प्रमुख अडथळा आहे. सध्या भारतात फक्त 600 जीनएक्सपर्ट उपकरण वापरात आहेत.
 3. शिवाय, जीनएक्सपर्ट उपकरण देखील महाग आहेत. त्याचप्रमाणे त्याला वातानुकूलित वातावरण आणि इष्टतम परिणामासाठी शाश्वत वीजेची उपलब्धता आवश्यक आहे.
 4. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) जीनएक्सपर्टच्या जागी स्वस्त पर्यायी ‘ट्रिनॅट MTB’ साधनाची तपासणी करीत आहे, जे की अधिक हाताळता येण्याजोगे, बॅटरीवर चालणारे आणि कमी खर्चाचे आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.