1. स्वदेशी बनावटीच्या निर्भय या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी भारताने यशस्वी रीत्या घेतली असून हे क्षेपणास्त्र तीनशे किलो अस्त्रे वाहून नेऊ शकते. ओदिशातील चंडीपूर किनाऱ्यावर ही चाचणी करण्यात आली.
  2. २०१४ पासून घेतलेल्या  चार चाचण्यांत केवळ एक चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आताची चाचणी यशस्वी झाली ही आनंदाची बाब असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.
  3. चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्रातील संकुल क्रमांक ३ मधून हे क्षेपणास्त्र आकाशात झेपावले. सकाळी ११:२० वाजता ही चाचणी करण्यात आली, असे संरक्षण संशोधन व विकास संस्थेने म्हटले आहे. या क्षेपणास्त्राचे रॉकेट बूस्टर अ‍ॅडव्हान्सड सिस्टीम लॅबोरेटरी यांनी तयार केले आहे.
  4. या क्षेपणास्त्राचा पल्ला १००० किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र टबरेफॅन व टबरेजेट इंजिनसह चालते. त्यातील दिशादर्शक प्रणाली स्वदेशी असून ती आरसीआयने तयार केली आहे.
  5. या क्षेपणास्त्राने अपेक्षित वेग व उंची गाठली होती व त्याचा मार्गही योग्य होता, असे सांगण्यात आले. रडार व विमानांच्या मदतीने त्याचे निरीक्षण करण्यात आले.


  1. जागतिक स्तरावर 'ब्रॅंड इंडिया' च्या नावाखाली 'खिचडी' या भारतीय पाककृतीचा प्रचार करण्याच्या दृष्टीने, नवी दिल्लीतल्या 'वर्ल्ड फूड इंडिया २०१७' कार्यक्रमात ५० शेफच्या चमूने ९१८ किलोग्रॅम वजनाची 'खिचडी' बनविण्याचा जागतिक विक्रम केला आणि याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली गेली.
  2. खिचडीच्या सामुग्रीमध्ये प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या नेतृत्वात असलेल्या चमूने ८०० किलोग्रॅम विविध प्रकारच्या धनधान्यांचा वापर केला.


  1. भारतीय रेल्वेने ६ नोव्हेंबर २०१७ रोजी आपल्या पहिल्या गोल्ड स्टैंडर्ड म्हटल्या जाणार्‍या 'स्वर्ण' ट्रेनचे अनावरण केले आहे. याचे नवी दिल्ली-काठगोदाम शताब्दी एक्सप्रेस असे नाव आहे.
  2. रेल्वे मंत्रालयाद्वारा राजधानी व शताब्दी यांच्या समवेत प्रीमियम ट्रेनला पुनर्संरचित करण्यासाठी सुरू केलेल्या 'स्वर्ण प्रकल्प' च्या अंतर्गत ही ट्रेन तयार करण्यात आली.
  3. स्वर्ण ट्रेनमध्ये CCTV आणि रेल्वे पोलीसांची सुरक्षा तसेच स्वच्छतेसह ट्रोलीने पदार्थांचा पुरवठा करणे, कर्मचार्‍यांचे नवे परिधान, स्वयंचलित दरवाजे अश्या बाबींवर विशेष लक्ष दिले गेले आहे.
  4. ट्रेनमध्ये प्रवाश्यांना चित्रपट, मालिका, संगीत अश्या मनोरंजनाच्या सुविधा तसेच वाय-फाय हॉटस्पॉट्स उपलब्ध करून दिले जाणार आहे.


Top