current affairs, loksatta chalu ghadamodi

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॅनी वादळाचा फटका बसलेल्या ओदिशाची हवाई पाहणी करून मदत कार्यासाठी आणखी एक हजार कोटींची मदत जाहीर केली.

2. किनारी राज्यांसाठी आपत्ती दीर्घकालीन आपत्ती निवारण योजना आखण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला आहे. फॅनी वादळाने ओदिशाला झोडपून काढले त्यात 34 बळी गेले होते.

3. तसेच फॅनी वादळाची चाहूल लागताच केंद्राने राज्याला 381 कोटी रुपये मंजूर केले होते असे सांगून मोदी म्हणाले की, राज्याची गरज लक्षात घेऊन वेगाने मदतकार्य करण्यासाठी 1000 कोटी मंजूर करण्यात येत आहेत.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) 22 मे रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून राडार इमेजिंग सॅटेलाईट (रिसॅट-2 बीआरवन) अवकाशात सोडणार असल्यामुळे भारताला अवकाशात नजर ठेवण्यासाठी आणखी एक डोळा लाभणार आहे. यापूर्वीच्या रिसॅट मालिकेतील उपग्रहांच्या तुलनेत रिसॅट-2 बीआर वन हा खूपच अत्याधुनिक आहे.

2. नवा उपग्रह हा बाहेरून जुन्या उपग्रहासारखाच दिसतो; परंतु आधी अवकाशात सोडण्यात आलेल्या उपग्रहापेक्षा याचे कॉन्फिग्युरेशन वेगळे आहे.

3. तसेच नव्या उपग्रहाची टेहळणी व इमेजिंग क्षमता ही वाढलेली आहे. रिसॅटच्या एक्स बँड सिनेथिक अपर्चर राडारची (एसएआर) क्षमता दिवस-रात्र तसेच सर्व हवामानात लक्ष ठेवण्याची आहे. राडार ढगात शिरू शकते व एक रिझोल्युशन
एक मीटरपर्यंत झूम करू शकते. रिसॅट उपग्रह पृथ्वीवरील इमारत किंवा वस्तूचे छायाचित्र दिवसातून दोन ते तीन वेळा घेऊ शकते. त्यामुळे हा उपग्रह पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी दहशतवादी तळ आणि नियंत्रण रेषेवरील
दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅड्सवरून होणाऱ्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करील.

4. तर यापूर्वीच्या रिसॅट मालिकेतील उपग्रहांनी घेतलेल्या इमेजेसचा (प्रतिमा) उपयोग 2016 मध्ये केल्या गेलेल्या सर्जिकल स्ट्राईक्ससाठी आणि यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानातील बालाकोटमध्ये जैश-ए-महंमदच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांसाठी केला गेला आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या सुमारे 10 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्याला मानवाची कृत्येच कारणीभूत आहेत, पण यातून सरतेशेवटी माणसाचेच नुकसान होणार आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या स्टेट ऑफ नेचरया
मूल्यमापनात म्हटले आहे.

2. तसेच माणसांनी वने, महासागर, जमीन, हवा हे सगळेच धोक्यात आणले असून हवामान बदलांइतकाच हा धोका महत्त्वाचा आहे असे 132 देशांच्या साडेचारशे तज्ञांच्या बैठकीचे अध्यक्ष रॉबर्ट वॉटसन यांनी सांगितले.

3. तर येत्या दहा वर्षांत किमान 1 लाख प्राणी व वनस्पती नष्ट होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

4. गेल्या 10 दशलक्ष वर्षांत पृथ्वीवरील जीवसृष्टीची जेवढी हानी झाली नाही त्यापेक्षा दहा ते शंभर पट वेगाने हानी आता सुरू आहे. त्यामुळे 66 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनॉसॉर्स मेले होते त्यानंतरची ही सर्वात मोठी हानी असणार आहे.
ज्या पद्धतीने आपण उत्पादन करतो, वापरतो, त्या सर्व घटकांमध्ये स्थित्यंतरात्मक बदल केला नाही तर हे नष्टचर्य सुरूच राहील.

5. संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केलेला अहवाल 1800 पानांचा असून त्यात 15 हजार स्रोतांचा वापर करण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्येही एका अहवालात हवामान विज्ञान समितीने म्हटले होते की, सामाजिक स्थित्यंतरे झाल्याशिवाय तापमान वाढ 1.5 अंशांच्या टप्प्यात ठेवणे शक्य नाही. आधीच तापमान वाढ 12 अंश सेल्सियस झाली असून शतकअखेरीस ती 3 अंशांनी वाढणार आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. 7 मे 1907 मध्ये मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.

2. सोनी ह्या कंपनी ची स्थापना 7 मे 1946 मध्ये झाली.

3. एअर इंडिया ची मुंबई – टोकियो विमानसेवा 7 मे 1907 मध्ये सुरू झाली.

4. लता मंगेश कर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 7 मे 1990 मध्ये प्रदान.

5. 7 मे 1992 मध्ये एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.

6. पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रबिंद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात 7 मे 1861 मध्ये जन्म.


Top