The first organized calculation of the dolphin in the Indus river in Punjab

 1. पंजाब राज्य शासनाने WWF-भारत यांच्यासह सिंधू नदीत आढळणार्‍या डॉल्फिन (Indus Dolphin) यांची गणना करण्यास प्रथमच संघटित गणना कार्यक्रम सुरू केला आहे.
 2. या डॉल्फिनचे संरक्षण करण्याच्या हेतूने ही गणना होत आहे.
 3. ही भारतात होणारी पहिलीच संघटित डॉल्फिन जनगणना आहे, जी पाच वर्षांमध्ये पूर्ण केली जाणार आहे.
उपक्रमामागील कारण काय आहे?
 1. सिंधू नदीत आढळणार्‍या डॉल्फिन केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 185 किलोमीटरच्या पात्रात आढळतात.
 2. या क्षेत्रात अंदाजे 1800 हून अधिक डॉल्फिन आहेत. भारतात डॉल्फिनची संख्या सध्या कमी आहे.
 3. या प्रजातीचे डॉल्फिन तलवाडा आणि हरिके पत्तन या दरम्यानच्या 180 किलोमीटरच्या पट्ट्यात भारताच्या ब्यास नदीत आढळतात.
 4. सन 2007 मध्ये हरीके वन्यजीव अभयारण्य आणि ब्यास नदीत सिंधू नदीची डॉल्फिन जिला ‘प्लॅटनिस्टा गंगेटिका’ या नावानेही ओळखल्या जाते, अधिकृतरीत्या पहिली गेली.
 5. अंदाधुंद मासेमारी आणि वाढत्या प्रदूषणाच्या पातळीमुळे ही प्रजाती धोक्यात आहे.
 6. आज पाकिस्तानातील सिंधू नदीच्या खालच्या भागात केवळ जवळपास 1,000-2,000 डॉल्फिन अस्तित्वात आहेत.
 7. इंटरनॅशनल यूनियन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (IUCN) अनुसार सन 1944 पासून आतापर्यंत या क्षेत्रात आढळणार्‍या डॉल्फिनच्या संख्येत 50%नी घट झालेली आहे. 
 8. नदीच्या वातावरणाविषयीची ही परिस्थिती चिंताजनक असल्याकारणाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


GST council permits to introduce new easy method to fill out tax returns

 1. वस्तू व सेवा कर (GST) परिषदेने टॅक्स रिटर्न (कर परतावा) अर्ज भरण्याकरिता नवीन सुलभ पद्धत सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
 2. नवी व्यवस्था सहा महिन्यांच्या आत लागू केली जाणार आहे.
 3. GST परिषदेच्या 27व्या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयानुसार, नवी पद्धत सुरू करण्यात आल्यानंतरही मात्र कंपोजीशन डीलर आणि शून्य देय-घेय करणारे डीलर प्रत्येक तिमाहीला रिटर्न अर्ज भरू शकतात.
नवी व्यवस्था
 1. नव्या व्यवस्थेत तीन टप्पे असतील.
 2. पहिल्या टप्प्यात रिटर्न अर्ज दाखल करण्याची वर्तमान प्रणाली GSTR-3B आणि GSTR-1 सहा महिन्यांपर्यंत चालणार आहे.
 3. त्यानंतर रिटर्न दाखल करण्याचा नवा सॉफ्टवेयर तयार केला जाईल.
 4. नवी व्यवस्था दुसर्‍या टप्प्यात लागू केली जाणार आणि त्यामध्ये प्रत्येक इनवायस महितीला अपलोड करण्याची व्यवस्था असणार आहे.
 5. मात्र पहिल्या सहा महिन्यात स्वघोषित आधारावर प्रोव्हिजनल इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्याची सुविधा असणार, जसे की GSTR-3B मध्ये आहे.
 6. त्याच्या पुढे प्रोव्हिजनल इनपुट टॅक्स क्रेडिटची सुविधा बंद होणार आणि खरेदी करणार्‍याला तेव्हाच इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार, जेव्हा विक्रेता इनवायस अपलोड करणार आहे.
 7. ही प्रक्रिया सुलभ करण्यासोबतच दुतर्फा व्यवसाय करणार्‍या डीलरला पुरवठ्याच्या प्रत्येक इनवायसची माहिती द्यावी लागणार आहे.
 8. एकतर्फी व्यवसाय करणार्‍या (ग्राहकांसोबत व्यवहार करणार्‍या) डीलरला केवळ विभिन्न कर पातळीमध्ये एकूण व्यवसायाचा खुलासा करावा लागणार आहे.
 9. या नव्या पद्धतीमुळे प्रोव्हिजनल क्रेडिट संबंधी तंट्यांमध्ये कमतरता होणार आहे.


SEBI permitted trading of derivatives till 11.55 pm

 1. भारतीय सिक्युरिटीज व विनिमय मंडळाने (SEBI) रात्रीच्या 11.55 वाजेपर्यंत शेयर बाजारचे इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागामध्ये व्यापार करण्यासाठी कालमर्यादा वाढविण्यास परवानगी दिली आहे.
 2. नव्या मर्यादेनुसार सकाळच्या 9 वाजेपासून ते रात्रीच्या 11 वाजून 55 मिनटांपर्यंत हे व्यवहार चालतील.
 3. नवा नियम 1 ऑक्टोबर 2018 पासून लागू होणार आहे.
 4. हा निर्णय म्हणजे एकाच एक्सचेंजवर स्टॉक आणि कमोडिटीज ट्रेडिंग यांना एकात्मिक करण्यात सक्षम बनविण्याच्या SEBIच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
 5. भारतीय सिक्युरिटीज व विनिमय मंडळ (SEBI) हे भारतामधील सिक्युरिटीज बाजारपेठेचे नियामक आहे.
 6. 1988 साली याची स्थापना केली गेली.
 7. SEBI अधिनियम 1992 अन्वये 30 जानेवारी 1992 रोजी वैधानिक दर्जा दिला गेला.
 8. याचे मुंबईमध्ये मुख्यालय आहे.


India won two silver medals in the Grand Prix of Liberation International Competition

 1. भारताचे नेमबाज गगन नारंग आणि पूजा घाटकर यांनी ग्रँड प्रिक्स ऑफ लिबरेशन इंटरनॅशनल कॉम्पिटिटेशनमध्ये भारताला 2 रौप्यपदके मिळवून दिली आहेत.
 2. झेक प्रजासत्ताकच्या पिल्सेन शहरात खेळल्या गेलेल्या 10 मीटर एयर रायफल प्रकाराच्या मिश्र संघ गटात या जोडीने रौप्यपदक जिंकले.
 3. जेव्हा की स्पर्धेचे सुवर्णपदक जुरेट केसीनैट आणि कॅरोलिस गिरुलिस या जोडीने जिंकले.
 4. शिवाय एयर पिस्तूल प्रकाराच्या मिश्र गटात पी. श्री निवेथा आणि अमनप्रीत सिंग या जोडीने रौप्यपदक जिंकले.
 5. मिहिका पूरे हिने महिला एयर रायफल प्रकारात तर निवेथा परामनंथम हिने महिलांच्या एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.


M. T. Vasudevan Nair: Winner of ONV Literature Prize

 1. साहित्यकार एम. टी. वासुदेवन नायर यांनी यावर्षीचा वार्षिक ONV साहित्य पारितोषिक जिंकला आहे.
 2. नायर यांना हा पुरस्कार मल्याळम साहित्य क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी दिला जात आहे.
 3. शिवाय, अनुजा अकाथूट यांना त्यांचा काव्यसंग्रह ‘अम्मा उरंगुन्नीला’साठी तरुण लेखकाच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
 4. 27 मे 2018 रोजी आयोजित एका समारंभात हे पुरस्कार दिले जातील.
 5. ONV साहित्य पारितोषिकाची स्थापना प्रसिद्ध कवी (दिवंगत) ओ. एन. व्ही. कुरूप यांच्या स्मृतीत केली गेली आहे.
 6. हा पुरस्कार ONV सांस्कृतिक अकादमीकडून दिला जातो.
 7. 3 लक्ष रुपये, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


Top