union gov has given permission to DNA Technology act

 1. गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रिया सुरळीत आणि नेमकी व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार, डीएनए तंत्रज्ञान कायद्याला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 2. यामुळे देशाच्या न्याय वितरण प्रणालीला बळकटी मिळणार आहे.
 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने डीएनए तंत्रज्ञानाचा नियमन विधेयक 2018 ला मंजुरी दिली.
 4. देशाच्या न्याय वितरण प्रणालीला समर्थन आणि बळकटी देण्याकरिता डीएनए आधारित न्यायवैद्यक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे हा डीएनए आधारीत तंत्रज्ञान विधेयकाच्या अंमलबजावणीचा प्राथमिक उद्देश आहे.
 5. गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी तसेच हरवलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी डीएनए आधारित तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेला जगभरात मान्यता आहे. भारतातही याचा वापर करता यावा यासाठी डीएनए प्रयोगशाळांची मान्यता आणि नियमन बंधनकारक करण्यात आले आहे.
 6. या नव्या कायद्यानुसार, डीएनए चाचण्यांच्या कोणत्याही प्रकारे दुरुपयोग होऊ नये यासाठी या चाचण्यांचा निकाल आणि माहिती सुरक्षित, गुप्त ठेवता येणार आहे.


Rajsthan gov annapurna milk scheme

 

 1. भारत सरकारच्या ‘मध्यान्ह भोजन’ योजनेंतर्गत राजस्थान राज्य शासनाने नवीन  ‘अन्नपूर्णा दुग्ध योजना’ सुरू केली आहे.
 2. या योजनेंतर्गत शासकीय प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना शाळेत दूध दिले जाईल.
 3. जयपूरजवळ राजस्थान आदर्श वरिष्ठ माध्यमिक शाळा येथे मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
 4. भारतात ‘मध्यान्ह भोजन’ (mid-day meal) योजना 1995 साली राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात आली.
 5. शाळेतील मुलांची गळती रोखणे आणि मुलांना पोषक अन्न देण्यासाठी ही योजना सुरू आहे.


BCCI Lifetime achievment award to pankaj roy and othes 3 person

 

 

 1. पंकज रॉय (2016-17), अंशुमन गायकवाड (2017-18), डायना एदूलजी (2016-17) आणि सुधा शाह (2017-18) यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
 2. नरेन ताम्हने आणि अब्बास अली बेग (2016-17) आणि बुधी कुंदरण (2017-18) यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 3. त्यांना प्रत्येकी 15 लक्ष रुपये रोख पारितोषिक दिले जाईल.


cvigil app of election commision

 1. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी निवडणुकीदरम्यान निवडणूक आचारसंहिता भंग केल्याबद्दलच्या घटनांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी नागरीकांसाठी 'cVigil' नावाचे मोबाईल अॅप प्रस्तुत केले आहे.
 2. हे अॅप केवळ निवडणुका असलेल्या राज्यांमध्येच कार्यरत होईल, जेथे मतदानाची तारख घोषित केली गेली आहे.
 3. छत्तीसगढ, मध्यप्रदेश, मिझोराम आणि राजस्थान या राज्यांमध्ये होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीत नागरिकाला वापरासाठी हे अॅप उपलब्ध करून दिले जाईल.

 


rajsthan gov announced reservation to 5 cast

 1. राजस्थान सरकारकडून गुर्जर समाजासह गाडरिया, रेबारी, गाडिया लोहार आणि बंजारा या ५ जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे.
 2. आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास ७ जुलैला जयपूरमध्ये होणाऱ्या पंतप्रधानांच्या रॅलीमध्ये निदर्शने करण्याचा इशारा गुर्जर आरक्षण संघर्ष समितीने राजस्थान सरकारला दिला होता.
 3. तसेच समाजाच्या प्रतिनिधींनी संबंधीत मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत २ जुलैच्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आरक्षणाची घोषणा करण्याचा अल्टिमेटमही दिला होता.


maharashtra gov declared drought announcment

 1. ग्रामीण भागातील वाढता असंतोष लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष शिथिल करत नवीन नियमावली जाहीर केली आहे.
 2. यापूर्वी खरिपाच्या पेरणीत ऑगस्टअखेर सरासरीपेक्षा ३३.३३ टक्क्यांची घट झाल्यास दुष्काळ, तर ५० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाल्यास गंभीर दुष्काळ असा निकष होता.
 3. आता पेरणीत सरासरीच्या तुलनेत १५ टक्के घट झाल्यास दुष्काळ, तर सरासरीच्या तुलनेत पेरणीत २५ टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्यास गंभीर दुष्काळ जाहीर केला जाईल.
 4. त्यामुळे आता दुष्काळ जाहीर करणे व त्यानंतर शेतकऱ्यांना मदत देणे, केंद्र सरकारकडून मदत मिळवणे सुलभ होणार आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.