MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो 2022 पर्यंत अंतराळामध्ये अंतराळवीर पाठवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. भारताला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षातच इस्रो पहिला भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची तयारी करत आहे.

2. तर भारताच्या या अंतराळवीराला अँस्ट्रोनॉट नाही तर ‘व्योमनॉट’ असे म्हटले जाईल. भारताची ही मोहिम यशस्वी झाल्यास अंतराळात मानवरहीत मोहिम करणारा भारत चौथा देश ठरेल. या आधी हा पराक्रम रशिया, अमेरिका आणि चीनने केला आहे.

3. भारतीयांना अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेला गगनयान असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत एका आठवड्यासाठी तीन भारतीय अंतराळवीरांना अंतराळ पाठवले जाणार आहे. अमेरिकेमध्ये अंतराळवीरांना ‘अँस्ट्रोनॉट म्हणतात तर रशियामध्ये अंतराळवीरांना ‘कॉस्मोनॉट्स’ म्हणतात. चीनमध्ये अंतराळवीरांना ‘ताइकोनॉट्स’ असं म्हणतात.

4. याच पार्श्वभूमीवर भारत आपल्या अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ या नावाने ओळखले जाणार आहे. ‘व्योमनॉट्स’मध्ये ‘व्योमन्’ हा संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ अंतराळ असा होतो. अनेकदा आकाश या अर्थानेही हा शब्द वापरला जातो. त्यामुळेच व्योमन् या शब्दापुढे अँस्ट्रोनॉटमधील नॉट्स ही अक्षरे लावून ‘व्योमनॉट्स’ हा शब्द तयार झाला आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत भारताच्या चेतेश्वर पुजाराला पिछाडीवर सोडत तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे.

2. तर त्याचे 900 गुण झाले आहेत. विराट (922 गुण), केन विल्यमसन (913 गुण) यांच्यानंतर तो तिसर्या स्थानी आहे. या कसोटीपुर्वी त्याचे 857 गुण होते.

3. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी कायम आहे तर पुजाराची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

4. चेंडू छेडखानी प्रकरणात एक वर्षाच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे गेल्यानंतर पहिला कसोटी सामना खेळणार्या स्मिथने 144 व 142 धावांची खेळी केली. तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. त्या 66 वर्षांच्या होत्या.

2. तसेच भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती.

3. तर प्रकृतीच्या कारणावरून 2019ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते.

सुषमा स्वराज बद्दल मुख्य माहिती :

• सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी, 1952 रोजी हरियाणाच्या अंबाला छावणी येथे झाला होता. त्यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रख्यात सदस्य होते.
• नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सोळाव्या लोकसभेत त्या परराष्ट्रमंत्री (ईएएम) म्हणून काम करणार्‍या भारताच्या एक विख्यात राजकारणी होत्या.
• 25 वर्षांच्या वयात त्या भारताच्या सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. तथापि,
प्रथम महिला मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे.
• त्याशिवाय सुषमा स्वराज 1977 ते 1979 दरम्यान हरियाणा येथील कामगार आणि रोजगार विभागात कॅबिनेट मंत्री आणि 1987 ते 1990 दरम्यान हरियाणा येथील शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा विभागात कॅबिनेट मंत्री होत्या.
• सुषमा स्वराज यांनी 2019 ते 2019 या काळात नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात भारतीय
परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करणे, या मोदी सरकारच्या काश्मीर धोरणावर लोकसभेने शिक्कामोर्तब केले.

2. तर अनुच्छेद 370 संपुष्टात आणण्याची शिफारस राष्ट्रपतींना करणारा प्रस्ताव 351 विरुद्ध 72 मतांनी मंजूर करण्यात आला. यामुळे गेली 70 वष्रे अमलात असलेला हा अनुच्छेद कायमस्वरूपी रद्द होईल. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्रशासित प्रदेश करणारे विधेयकही

3. तसेच जम्मू आणि काश्मीरमधील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल सवर्णाना दहा टक्के आरक्षण लागू करणारे विधेयक लोकसभेत संमत झाले. मात्र अनुच्छेद 370 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीरमध्ये उर्वरित देशातील सर्व कायदे लागू होऊ शकतील.

4.त्यामुळे या विधेयकाची आता गरज उरली नसल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यालाही मंजुरी देण्यात आली.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 मध्ये रोजी झाला.

2. 7 ऑगस्ट 1941 हा दिवस जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांचा स्मृतीदिन आहे.

3. मुंबई महानगरपालिकेने 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनीआपल्या ताब्यात घेतली.

4. सलग 128 वर्षे प्रकाशित झाल्यावर ‘द वॉशिंग्टन स्टार‘ हे वृत्तपत्र सन 1981 मध्ये बंद पडले.


Top

Whoops, looks like something went wrong.