1. भारतीय पुरुष, तसेच महिला हॉकी संघ एकाच वेळी आशिया विजेता असणे हा योग १३ वर्षांनी साधला गेला आहे. यापूर्वी हे २००४ मध्ये असे घडले होते. तर आता महिला संघाच्या यशामुळेच हे १३ वर्षांनी घडले आहे.
  2. भारतीय पुरुष हॉकी संघाने २००३ मध्ये क्वालालंपूर आशिया कप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एका वर्षाने भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदा आशिया कप जिंकला, त्या वेळी पुरुष विजेतेपद भारताकडेच होते.
  3. जपानमध्ये ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या लढतीत भारतीय महिलांनी चीनचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ असे पराभूत करत विजे तेपद मिळविले. यापूर्वी केवळ १५ दिवसांपूर्वी भारतीय पुरुष संघाने ढाक्‍यात आशिया कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
  4. भारतीय महिलांनी यापूर्वी २००४ मध्ये भारतातच झालेल्या स्पर्धेत जपानचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. २००९ मध्ये विजेतेपदाच्या लढतीत चीनकडूनच झालेल्या पराभवाचा परतफेड या विजयाने केली. तसेच १९९९ मध्ये देखील त्या उपविजेत्या राहिल्या होत्या.


  1. पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक आणि ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित असणा-या 'अंटार्क्टिका' खंडावरील ३७ व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेस नुकताच प्रारंभ झाला आहे.
  2. २१ भारतीय संशोधकांचा समावेश असणा-या या मोहिमेचे उपनेते आणि अलिबाग येथील जागतिक कीर्तीच्या भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो हे या मोहिमेत तिस-यांदा सहभागी झाले आहेत.
  3. या मोहिमेदरम्यान बर्फाच्छादित 'अंटार्क्टिका' खंडावरील 'मैत्री स्टेशन' या भारतीय संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून भारतीय हवामान विभागाचे संशोधक सुन्नी चूग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  4. तसेच खंडावरील भारत सरकारच्या 'भारती स्टेशन'  या संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ॅण्ड ओशन रीसर्च संस्थेचे संशोधक डॉ. शैलेश पेडणेकर यांची तर उपप्रमुख म्हणून अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. ३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेच्या सागरी जलप्रवासाचे (व्हॉयेज) प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ॅण्ड ओशन रीसर्च संस्थेचे डॉ. योगेश राय यांची नियुक्ती कर ण्यात आली आहे.


  1. ५ नोव्हेंबर २०१७ रोजी इजिप्तच्या शर्म-अल-शेख शहरात 'जागतिक युवा मंच' च्या बैठकीला सुरुवात करण्यात आली.
  2. कार्यक्रमाचे उद्घाटन इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फतेह अल-सीसी यांच्या हस्ते केले गेले. या कार्यक्रमात १४ देशांचे विविध प्रतिनिधी, संयुक्त राष्ट्रसंघ, अरब लीग आणि आफ्रिका संघाचे प्रतिनिधी सहभागी झाली आहेत.
  3. पाच दिवसांच्या या कार्यक्रमात केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठौड हे भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
  4. संपूर्ण जगातील तरुणाईला मुख्य वैश्विक धोरण उद्देशांसह जोडणे हा जागतिक युवा मंचचा मुख्य उद्देश्य आहे. बैठकीत व्यापारांमधील तरुणाईची भूमिका, भविष्यातील नेत्यांच्या निर्माणासाठी नवीन पद्धती, आव्हाने, स्त्री-पुरुष समानता आणि महिला सशक्तिकरण या विषयांवरदेखील चर्चा करण्यात येणार आहे.
  5. इजिप्त हा अधिकृतपणे इजिप्त अरब प्रजासत्ताक देश आहे. या देशाची राजधानी कैरो शहर आहे आणि देशाचे चलन इजिप्तियन पाउंड हे आहे


Top