BRICS बैठकीत ‘शिक्षणावरील बीजिंग घोषणापत्र’ प्रसिद्ध

BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) राष्ट्रांच्या शिक्षण मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक 5 जुलै 2017 ला बीजिंग (चीन) मध्ये संपन्न झाली.

भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

या बैठकीत शेवटी ‘शिक्षणावरील बीजिंग घोषणापत्र’ स्वीकारले गेले आहे.

या घोषणापत्रात समाविष्ट बाबी पुढीलप्रमाणे आहे -

 1. शिक्षण, संशोधन आणि अभिनवता क्षेत्रात सहयोग वाढवण्यासाठी BRICS नेटवर्क यूनिवर्सिटी (NU) ला पाठबळ देणे.
 2. BRICS युनिव्हर्सिटी लीगमध्ये सहभागी होण्यास विद्यापीठांना प्रोत्साहन देणे.
 3. BRICS देशांमधील इतिहास व संस्कृती संबंधी समज वाढवण्यासाठी भाषा शिक्षण आणि बहुभाषिकतेच्या माध्यमातून सांस्कृतिक सहकार्य वाढवणे.
 4. BRICS-NU द्वारे उच्च शिक्षणात अभ्यासक्रमांमध्ये व्यावसायिकतेला वाढविण्यासाठी पुढाकार घेणे.
 5. शिक्षकांची गुणवत्ता आणि कामगिरी सुधारण्यामध्ये इतर देशांच्या अनुभवातून शिकण्यासाठी अधिकाधिक शिक्षक आणि शैक्षणिक प्रशासकांना प्रोत्साहित करणे.
 6. शिक्षणतज्ज्ञांच्या अनुभव, नवकल्पनेमधून नवीन प्रकल्प तयार करून तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (TVET) च्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करणे.
 7. BRICS थिंक टॅंक कौन्सिल (BTTC), BRICS-NU तसेच BRICS पुढाकार यांच्यातील कामाचे संरेखन सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्यातील सहकार्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्यास प्रोत्साहन देणे.
 8. युवा हिवाळी / उन्हाळी शिबिरांच्या संघटनांना प्रोत्साहन देणे.
 9. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी अधिकाधिक संध्या प्रदान करणे.
 10. SGD4-शिक्षण 2030 लक्ष्यांना अधिक अनुकूल धोरण वातावरण प्रदान करण्यासाठी, देशांमधील अनुभव आणि सरावांचे आदानप्रदान करणे.
 11. वर्ष 2018 मध्ये केप टाउन, दक्षिण आफ्रिका येथे आयोजित तिसर्या BRICS NU वार्षिक परिषदेत आणि सप्टेंबर 2017 मध्ये सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे आयोजित BRICS जागतिक व्यवसाय व अभिनवता परिषदेत भाग घेण्यास प्रोत्साहित करणे.


बालकांमध्ये औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे प्रमाण अंदाजाहून अधिक आहे: आरोग्य मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अभ्यासानुसार, बालकांमध्ये बहू-औषधी प्रतिरोधक (MDR) क्षयरोगाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिक आहे.

RNTCP अंतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागाच्या सहयोगाने फाउंडेशन फॉर इनोव्हेटिव्ह न्यू डायग्नोस्टीक्स (FIND) संस्थेकडून नऊ शहरांमध्ये तपासलेल्या 76,000 बालकांमध्ये 5000 जणांना क्षयरोग असल्याचे आढळून आले आहे.

यामध्ये 9% बालकांमध्ये MDR क्षयरोग आढळून आला आहे.

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) अंतर्गत या तपासण्या करण्यात आल्या आहेत.

FIND चा ‘युनिक’ पुढाकार:-

 1. FIND ने एप्रिल 2014 मध्ये दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या चार शहरांमध्ये पेडाएट्रिक क्षयरोगाच्या निदानसाठी ‘युनिक’ पुढाकाराचा शुभारंभ केला होता.
 2. या पुढाकाराला आंतरराष्ट्रीय विकासासाठी संयुक्त राष्ट्रसंघ संस्था (USAID) यांच्याकडून अर्थसहाय्य झाले आहे.
 3. या कार्यक्रमाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने यामध्ये नागपूर, सुरत, विशाखापट्टणम, बंगलोर आणि गुवाहाटी या पाच शहरांचा समावेश केला गेला आहे.
 4. क्षयरोगाच्या निदानासाठी जेनेक्स्पर्ट MTB/RIF प्रयोगशाळांचा वापर करण्यात येत आहे.
 5. कार्यक्रमांतर्गत वय वर्ष 15 खालील सर्व रोग्यांसाठी तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत.
 6. जेनेक्स्पर्ट MTB/RIF हे क्षयरोग, HIV या रोगांच्या संक्रमणाच्या निदानासाठी आणि आकड्याच्या रूपात HIV आणि हिपॅटायटीस-सी रोगांचे मापन करण्यासाठी त्याप्रकारचे एकमेव असे यंत्र आहे, जे मॉलीक्युलर तपासणीवर कार्य करते.

जेनेक्स्पर्ट उपकरणाबाबत:-

 1. जेनेक्स्पर्टला एक्स्पेर्ट MTB/RIF म्हणूनही ओळखले जाते.
 2. ही एक कारट्रिज आधारित न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिफीकेशन टेस्ट (NAAT) आहे.
 3. ही मायक्रोबॅक्टेरीयम ट्यूबरकुलोसिस (MTB) DNA आणि NAAT द्वारे रिफाँम्पिसिन (RIF) चा प्रतिरोध ओळखू शकणारे स्वयंचलित निदान करण्यासाठी तपासणी आहे.
 4. यूनिवर्सिटी ऑफ मेडिसिन अँड डेंटिस्ट्री ऑफ न्यू जर्सी (UMDNJ) येथील प्रा. डेव्हिड ऑलँड यांनी विकसित केले.


सोनल बबेरवालला पहिली 'कल्पना चावला' शिष्यवृत्ती प्रदान

 1. अमरावतीच्या 21 वर्षीय सोनल बबेरवाल हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.
 2. या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाची (इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी) पहिली 'कल्पना चावला स्कॉलरशिप' प्रदान करण्यात आली आहे.
 3. आयर्लंडमधील कॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने ही घोषणा केली आहे.
 4. भारताची पहिली महिला अंतराळवीर डॉ. कल्पना चावला यांच्या स्मरणार्थ ही स्कॉलरशिप प्रदान करण्यात येते.
 5. फेब्रुवारी 2003 मध्ये कोलंबिया अंतराळयानाच्या अपघातात चावला यांचा मृत्यू झाला होता.
 6. बुद्धिमान भारतीय महिलांमधील तांत्रिक आणि अंतराळविषयक संशोधन कौशल्य विकसित करणे हे या शिष्यवृत्तीमागील उद्दिष्ट आहे.
 7. अंतराळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत हा कायमच महत्त्वाचा भाग राहील, असेही यावेळी युनिव्हर्सिटीने म्हटले आहे.
 8. विज्ञान, वैद्यकीय वा खगोलशास्त्राशी संबंधित क्षेत्रांतील भारतीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करण्याचा कॉर्क इन्स्टिट्यूटचा मानस आहे.


भारत-इस्त्रायलमध्ये सात करार समंत

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्त्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि इस्त्रायल यांनी विविध क्षेत्रांतील सात करारांवर स्वाक्षरी केली.
 2. जागतिक शांतता आणि स्थर्याला धोका असलेल्या दहशतवादाचा बिमोड करण्याचा निर्धार पंतप्रधान मोदी आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी चर्चेनंतर बोलताना व्यक्त केला.
 3. भारत-इस्त्रायल यांच्यातील नात्याची गाठ स्वर्गातच बांधली असल्याची टिप्पणी करत नेतान्याहू यांनी उभयपक्षी संबंध दृढ असल्याची ग्वाही दिली.
 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर झालेल्या जंगी स्वागताने लिहिल्या गेलेल्या नव्या अध्यायानंतर द्वीपक्षीय संबंध आणखी दृढ झाले.
 5. पंतप्रधान मोदी आणि नेतान्याहू यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.
 6. या वेळी भारत आणि इस्त्रायल यांच्यात अवकाश, जलव्यवस्थापन, कृषी या क्षेत्रांसह सात करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.


Top