DINVISHESH

 1. ICC च्या महिला फलंदाजांच्या जागितक क्रमवारीत नुकतेच अव्वल स्थान पटकावणाऱ्या भारताच्या स्मृती मंधानलामानाच्या ‘फोर्ब्स’च्या यादीत स्थान मिळाले आहे. 

 2. फोर्ब्सकडून भारतातील ’30 अंडर 30′ अशी एक यादी तयार करण्यात आलीआहे. या यादीत स्मृतीला स्थान देण्यात आले आहे.

 3. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक कमावणारी हिमा दास, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा नीरज चोप्रा यांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

 4. फोर्ब्स इंडियाच्या ’30 अंडर 30’चे हे सहावे वर्ष आहे. या यादीमध्ये खेळाडूबरोबर मनोरंजन क्षेत्र, मार्केटिंग अशा एकूण 16 क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे.

 5. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने 2-1 अशा विजय मिळवला आणि स्मृतीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. स्मृतीने 2018 वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 15 वन-डे सामन्यांत दोन शतक आणि 8 अर्धशतक झळकावली.

 6. तर ICCच्या क्रमवारीत स्मृतीने (751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग 76 गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानावर आहे.


ISRO GSAT 31

 • भारताने अंतराळात आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. भारताचे संदेशवाहक उपग्रह जीसॅट-31चे (GSAT-31)युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने आज (6 फेब्रुवारी) पहाटे अडीचच्या सुमारास फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

 • प्रक्षेपणाच्या 42व्या मिनिटानंतर 3 वाजून 14 मिनिटांनी उपग्रह जिओ-ट्रान्सफ ऑर्बिटमध्ये स्थापित झाला. भारताने यापूर्वी अनेक उपग्रह फ्रेंच गयानातून प्रक्षेपित केले आहेत.

 • एरियनस्पेसने दिलेल्या माहितीनुसार, या रॉकेटमध्ये भारताच्या जीसॅट-31 सह सौदी जियो स्टेशनरी उपग्रह 1/ हेलास उपग्रह 4 यांचेही प्रक्षेपण करण्यात आले आहेत.

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सांगितलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचे वजन 2535 किलोग्रॅम आहे. जीसॅट-31 40वा संदेशवाहक उपग्रह आहे. यामुळे भू-स्थैतिक कक्षेत कू-बँड ट्रान्सपाँडर क्षमता वाढवेल. जीसॅट-31 चा कार्यकाळ 15 वर्षे आहे.

 • तसेच जीसॅट-31 आता भारताचा जुना संदेशवाहक उपग्रह इनसॅट-4 सीआरची जागा घेईल. प्रक्षेपणात कोणतीच समस्या आली नाही.


MAHARASHTRA BUDGET

 1. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होत असून ते 2 मार्चपर्यंत चालणारआहे.

 2. तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचे दिवस केवळ सहाच असतील. अंतरिम अर्थसंकल्प 27 फेब्रुवारीला विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत सादर करणार आहेत.

 3. तसेच या अधिवेशनामध्ये राज्यातील दुष्काळावर चर्चा होणार आहे. विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयकेही याच अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. विधान परिषदेतही एक प्रलंबित विधेयक मांडले जाईल.


HOCKEY WORLD CUP

 1. पुढील हॉकी विश्वचषकाच्या आयोजनासाठी भारताने पुन्हा एकदा दावेदारी पेश केली आहे. 13 ते 29 जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाच्या शर्यतीत एकूण सहा देश असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) जाहीर केले.

 2. भारताने 2023 साली होणाऱ्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धासाठी आपला दावा केला आहे. मात्र या स्पर्धासाठी सध्या तरी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश आघाडीवर आहेत.

 3. भारताने गतवर्षी झालेल्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते. भुवनेश्वर येथे झालेल्या या विश्वचषकात भारतीय संघ लवकर बाहेर पडल्याने भारतीय हॉकीप्रेमींची निराशा झाली होती.

 4. तसेच पुढील विश्वचषकासाठी अन्य दावेदारांमध्ये स्पेन, मलेशिया आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे.


DIN VISHESH

 1. आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी झाला होता.

 2. सन 1918 मध्ये 30 वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला1928 या वर्षा पासून मध्ये हे वय 21 करण्यात आले.

 3. कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने सन 1932 मध्ये बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या होत्या.


Top