MPSC chalu ghadamodi, current affairs

1. फलंदाजांचा कर्दनकाळ समजला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने निवृत्तीचा निर्णय जाहीर केली.

2. तर स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

3. तसेच स्टेनने 93 कसोटी सामन्यांमध्ये 439 बळी मिळवले होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. राज्यातील कबड्डीचा दर्जा वाढविण्यासाठी पुढील काळात राज्यभर दौरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या प्रशिक्षण समितीच्या पहिल्या सहविचार सभेत घेण्यात आला. या सभेत प्रशिक्षकाला अंतिम खेळाडू निवडीचे  अधिकार देण्याविषयीही मत मांडण्यात आले.

2. नाशिकच्या के.व्ही.एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंढे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या सहविचार सभेत समितीच्या प्रमुख शकुंतला खटावकर यांनी समिती स्थापन करण्यामागील हेतू स्पष्ट केला.

3. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनीतून प्रशिक्षण घ्यावे आणि प्रशिक्षकाला अंतिम खेळाडू निवडण्याची पूर्णपणे मुभा असावी, अशा सूचना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका शैलेजा जैन यांनी केल्या.

4. प्रशिक्षकांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशी प्रतवारी करून त्यानुसार अभ्यासक्रम तयार करणे आणि प्रशिक्षण वर्ग चालवणे, प्रगतीनुसार त्यांना टप्प्याटप्प्याने या श्रेणी बहाल करणे, शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षणासाठी संशोधन केंद्र तयार करणे, असे उपाय प्रशांत भाबड यांनी सुचवले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला ‘अनुच्छेद 370’ रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने सोमवारी उचलले. त्याचबरोबर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले.

2. तसेच पाच तासांच्या वादळी चर्चेनंतर राज्यसभेने या निर्णयांना मंजुरी दिली असून लोकसभेत त्यांच्यावर शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता उरली आहे.

3. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिसूचना जारी करीत ‘अनुच्छेद 370’ रद्द केला. अनुच्छेद 370 पूर्णत: संपुष्टात आणलेले नाही. त्यातील उपकलम 1 कायम असून त्याद्वारे या अनुच्छेदातील अन्य सर्व विशेष लाभ राष्ट्रपतींनी विशेषाधिकारानुसार रद्द करण्यात केले आहेत.

4. अनुच्छेद 370 रद्द झाल्याने याच अनुच्छेदाचा आधार घेऊन 1954 मध्ये लागू केलेला अनुच्छेद 35-अ देखील आता घटनाबाह्य़ ठरला आहे. त्यामुळे राज्याबाहेरील नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करता येणार आहे.

5. आíथक दुर्बलांसाठी लागू होणारे दहा टक्के आरक्षणही आपोआप लागू होईल. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट असल्याने हे विधेयक तेथील विधानसभेऐवजी संसदेत मांडण्यात आले.

वैशिष्ट्य:

 • अनुच्छेद 370 नुसार जम्मू-काश्मीरला लाभलेले सर्व विशेष अधिकार रद्द.
 • जम्मू-काश्मीरच्या स्वतंत्र राज्यघटनेचे अस्तित्व संपुष्टात. देशभर एकच राज्यघटना.
 • त्यामुळे देशभर एकच कायदा लागू.
 • केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा जम्मू-काश्मीरमधील जनतेलाही लाभ.
 • 35-अ देखील आपोआप रद्द. उर्वरित भारतातील नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदीचे स्वातंत्र्य.
 • जम्मू-काश्मीरमधील जनतेचे दुहेरी नागरिकत्व रद्द. ते केवळ भारताचे नागरिक ठरतील.
 • जम्मू-काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्यासही वाव.
 • राज्य विभाजनामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख हे वेगवेगळे प्रशासकीय विभाग.
 • लडाख हा विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश.
 • जम्मू-काश्मीर हा विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश.
 • जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेच्या जागा निश्चित करण्याची जबाबदारी फेररचना समितीवर.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 6 जून 1674 मध्ये रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

2. गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना 6 जून 1930 मध्ये झाली.

3. 6 जून 1969 मध्ये वि.स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली.

4. भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलम यांनी 6 जून 2004 रोजी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून घोषित केली.


Top