indira banergee become 8 th women to be appointed as supreme court justic

 1. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी नियुक्तीकरण्यात आली आहे.
 2.  इंदिरा बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश बनणाऱ्या आठव्या महिला न्यायाधीश आहेत.
 3. यापूर्वी फातिमा बीवी, सुजाता वी. मनोहर, रूमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा, राजन प्रकाश देशाई, आर. भानुमति आणि इंदु मल्होत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश म्हणून काम पाहिलेले आहे.
 4. 3 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींनी दिलेल्या एका अधिसूचनेव्दारा हे सांगण्यात आले आहे की, राष्ट्रपती मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी नियुक्त करत आहेत.
 5. दरम्यान, इंदिरा बॅनर्जी यांनी 5 एप्रिल 2017 रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
 6. त्यांनी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या जागेवर काम पाहिले होते.


england will support to india in organ donation

 1. ‘युनायटेड किंग्डम‘ (इंग्लंड) सरकारने अवयवदानाबाबतच्या नव्या नियमाची घोषणा केली.
 2. यामध्ये भारतातील गरजू व्यक्तीला इंग्लंड सरकारकडून त्वरीत मदत व्हावी, यासाठी इंग्लंड सरकारकडून अवयवदानाच्या कायद्यात बदल करण्यात येणार आहे. याबाबतचा विचार येथील सरकारकडून करण्यात येत आहे.
 3. इंग्लंड सरकारने या निर्णयाची सध्या घोषणा केली आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास 2020 पर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे.
 4. या नव्या अंदाजित संमती प्रणालीनुसार, ज्यांना अवयवदान करण्याची इच्छा नाही. अशा लोकांनी त्यांचा निर्णय राज्य-अनुदानित राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) अवयव दाता रजिस्टरकडे (ओडीआर) द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
 5. तसेच अवयवदान ही प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा असेल. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे अत्यंत योग्य भूमिका बजावता येईल, असे इंग्लंडच्या संसदीय राज्य सचिव जॅकी डॉयल-प्राईस यांनी सांगितले.
 6. दरम्यान, इंग्लंड सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.


Top