1. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) च्या नेतृत्वात ५ जून हा दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिवस साजरा करीत आहे. यावर्षी हा दिवस “कनेक्टिंग पीपल टु नेचर” या संकल्पनेखाली साजरा केला जात आहे.
 2. प्रत्येक जागतिक पर्यावरण दिवशी UNEP सोबत हा दिवस साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या देशाची निवड केली जाते. यावर्षी UNEP आणि कॅनडा हे संयुक्तपणे कार्यक्रम राबववित आहेत. सध्या संपूर्ण जगाला धोका असलेल्या कार्बन डायऑक्साईडचे आणि क्लोरे-फ्लुरो कार्बन (CFC) वायूचे उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याबाबत विशेष लक्ष देण्यात येत आहे.
 3. जागतिक पर्यावरण दिवस बद्दल : १९७४ सालापासून दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, त्याच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक समस्येच्या दृष्टीने निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा यामागील मुख्य हेतू आहे. 
 4. जगभरात जवळपास १०० हून अधिक देशांमध्ये जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य म्हणजे, पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि पर्यावरणाबाबत सरकारला पुढाकार घेण्याबाबत प्रोत्साहन देणे.
 5. पार्श्वभूमी : १९७२ साली ५-१६ जून दरम्यान स्टॉकहोम (स्वीडन) येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात पर्यावरणविषयक मुद्द्यांवर पहिली प्रमुख परिषद आयोजित करण्यात आली होती.
 6. या परिषदेच्या यशस्वीतेनंतर १५ डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सदस्य राष्ट्रांमध्ये साजरा करणारा ठराव अंगिकारला गेला. याच दिवशी आणखी एका ठरावाला मंजूर देण्यात आली ज्यामधून संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) च्या स्थापनेस मार्ग तयार झाला.


 1. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात  एस.टी.च्या मे 2017 या महिन्याच्या उत्पन्नात नांदेड विभाग राज्यात प्रथमआला आहे. यानिमित्ताने नांदेड विभागाचे  विभाग नियंत्रक नंदकुमार कोलारकर  यांचा नुकताच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  रणजितसिंह देओल  यांच्या हस्ते मुंबईत सत्कार करण्यात आला. 
 2. एस.टी. महामंडळाच्या  बसेस सध्या अवैध प्रवासी वाहतुकीला तोंड देत प्रवाशांची अखंडपणे गेल्या 68 वर्षापासून सेवा देत आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीच्या संकटावर मात करीत प्रवाशांसाठी विविध सोयी- सवलती देत आहेत. मे 2017  या महिन्याच्या उत्पन्नात नांदेड विभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून सरासरीच्या तीन करोड एवढे उत्पन्न नांदेड विभागाने गाठले आहे. 
 3. नांदेड विभागाचे कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले विभाग नियत्रंक नंदकुमार कोलारकर यांनी नांदेड विभागाचे विभाग नियत्रंक म्हणून  मे 2016 मध्ये सुत्रे स्वीकारली.


 1. मुस्लिम ब्रदरहूड, अल कायदा, इस्लामिक स्टेटला (आयएस) पाठिंबा देणे  आणि  इराणशी संबंध असल्याबद्दल चार अरब देशांनी कतारशी राजनैतिक संबंध तोडले. या निर्णयामुळे आखातातील अरब देशांतील संबंध आणखी ताणले गेले आहेत.
 2. बहारिन इजिप्त सौदी अरेबिया व  संयुक्त अरब अमिरातने कतारशी संबंध तोडल्याची घोषणा  करताना आम्ही आमचे राजनैतिक कर्मचारी माघारी बोलावत आहोत, असे सांगितले. एमिरेट्स  या विमान कंपनीने  कतारमधील विमान सेवा बंद  करण्याचे ठरविले असून, त्याची अंमलबजावणी होणार आहे.
 3. कतार हा नैसर्गिक वायूने समृद्ध असून 2022 मध्ये जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद त्याच्याकडे आहे. शिवाय अमेरिकेचा कातारमध्ये 10 हजार सैनिकांचा महत्त्वाचा लष्करी तळही आहे.सौदी अरेबियाने सध्या येमेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातून कतारी सैनिकांच्या तुकड्यांना काढून घेण्यात येईल, असे म्हटले.


Top