death penalty for child rafe cases

 1. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यात दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे फौजदारी कायदा (दुरुस्ती) विधेयक २०१८ लोकसभेत ३० जुलै रोजी आवाजी मतदानाने मंजूर झाले.
 2. यापूर्वीच्या कायद्यामध्ये सज्ञान स्त्रीवरील बलात्कारासाठी शिक्षेची तरतूद असली तरी १२ किंवा १६ वर्षांखालील मुलींवरील बलात्कारासाठी कठोर शिक्षेची तरतूद नव्हती.
 3. ती उणीव भरून काढून गुन्हेगारांवर वचक बसावा या हेतूने हे विधेयक संमत करण्यात आले. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचा वेगाने तपास करून पीडितेला न्याय देण्याचे या कायद्याचे उद्दिष्ट आहे.
 4. या विधेयकात १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार प्रकरणातील किमान शिक्षा ७ वर्षांहून वाढवून १० वर्षे केली आहे. ही शिक्षा आजीवन कारावासापर्यंतही वाढविली जाऊ शकते. प्रसंगी मृत्युदंडही ठोठावला जाऊ शकतो.
 5. तसेच १६ वर्षांखालील मुलीवरील बलात्कारासाठी किमान शिक्षेची तरतूद १० वर्षांवरून २० वर्षे इतकी वाढवण्यात आली आहे. तसेच ही शिक्षा आजीवन कारावासापर्यंतही वाढविली जाऊ शकते.
 6. १६ वर्षांखालील मुलीवरील सामूहिक बलात्काराबद्दल आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर १२ वर्षांखालील मुलीवरील सामूहिक बलात्कारासाठी देहदंडाची शिक्षा असेल.
 7. बलात्कार प्रकरणात दोषी अथवा निर्दोष ठरविलेल्या प्रकरणांचे अपील सहा महिन्यांच्या आत निकाली काढावे लागतील. तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची यात तरतूद आहे.
 8. तसेच १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात आता आरोपीला जामीन मिळू शकणार नाही.
 9. पीडितेला तपासात होणारा त्रास पाहता, कोणताही वकील पीडितेच्या चारित्र्याबाबत प्रश्न करणार नाही, अशीदेखील तरतूद या विधेयकात आहे.


england become fisrt team to play 1000 test match

 1. भारताविरुद्ध एजबस्टन येथे होणारा पहिला कसोटी सामना यजमान इंग्लंडसाठी पुरुष विभागातील १०००वा कसोटी सामना असणार आहे.
 2. १००० कसोटी सामने खेळणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरणार आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने ८१२ कसोटी सामने खेळले आहेत.
 3. इंग्लंडने मार्च १८७७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आजपर्यंत ते ९९९ कसोटी सामने खेळले आहेत.
 4. त्यापैकी ३५७ सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळविला आहे तर २९७ मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच ३४५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
 5. या ऐतिहासिक सामन्यासाठी आयसीसीच्या अव्वल श्रेणी पंच मंडळातील वरिष्ठ सदस्य व न्यूझीलंडचे माजी कर्णधार जेफ क्रो हे आयसीसीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 6. कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी त्यांच्या हस्ते इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रिव्ह्ज यांचा रौप्य सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जाणार आहे.
 7. भारताविरुद्ध इंग्लंडने जून १९३२मध्ये पहिला कसोटी सामना खेळला. उभय संघांदरम्यान ११७ कसोटी सामने खेळले गेले असून, इंग्लंडने ४३ सामन्यांत तर भारताने २५ सामन्यांत विजय मिळवला आहे. उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत.


post payment bank starting from august

 1. देशभरातील ६५० शाखा आणि १७ कोटी खात्यांसह बहुप्रतीक्षित ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ (आयपीपीबी) ऑगस्टपासून ग्राहकांच्या सेवेत रूजू होत आहे.
 2. रिझर्व्ह बँकेकडून आवश्यक त्या परवानग्या प्राप्त झाल्यानंतर ऑगस्टपासून बँकेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.
 3. पेमेंट बँकेचा परवाना प्राप्त झालेली आयपीपीबी ही एअरटेल आणि पेटीएमनंतरची तिसरी संस्था आहे.
 4. देशभरात सध्या १.५५ लाख टपाल कार्यालयांचे (पैकी १.३३ लाख कार्यालये ग्रामीण भागात) जाळे पसरले आहे.
 5. ही कार्यालये पोस्टाच्या पेमेंट बँकेसाठी ग्राहक केंद्रे म्हणून कार्यरत राहणार आहेत. या शिवाय ६५० शाखा अधिकृतरित्या कार्यरत राहणार आहेत.
 6. याशिवाय आयपीपीबीतर्फे लवकरच देशभरात ५००० एटीएमचीही उभारणी करण्यात येणार आहे. तसेच, ग्रामीण भागात ३२५० अॅक्सेस पॉइंटची निर्मिती करण्यात येणार आहे.
 7. शिवाय ग्रामीण भागात ११ हजार डाक सेवकांची आणि शहरी भागासाठी पोस्टमनची पदे निर्माण करून घरपोच बँकेची सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
 8. खातेधारकांना आपल्या आयपीपीबी खात्यामधून सुकन्या समृद्धी, आवर्ती योजना, स्पीड पोस्ट आदी योजनांचाही लाभ घेता येणार आहे.
 9. आयपीपीबीतर्फे लवकरच ऑनलाइन बँकिंग सेवेसाठी अॅप सादर करण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना फोन बिल, डीटूएच, गॅस आणि विजेची देयके अदा करता येणार आहेत.
 10. आयपीपीबीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक : सुरेश सेठी


Top

Whoops, looks like something went wrong.