The 'Building Technology India (CTI) -2019' conference in Delhi concludes

 1. दिनांक 3 मार्च 2019 रोजी दिल्लीत दोन दिवस चालणार्‍या ‘बांधकाम तंत्रज्ञान भारत 2019’ (Construction Technology India -CTI) या प्रदर्शनी-नि-परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
 2. या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय गृह व शहरी व्यवहार मंत्रालयाने केले.
 3. 25 देशांमधून 32 नवीन तंत्रज्ञानासह 54 पुरवठादारांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.
 4. राजकोट (गुजरात), रांची (झारखंड), इंदौर (मध्यप्रदेश), चेन्नई (तामिळनाडू), आगरतळा (त्रिपुरा) आणि लखनऊ (उत्तरप्रदेश) या सहा शहरांना प्रायोगिक प्रकल्पासाठी ''प्रत्यक्ष प्रयोगशाळा'' म्हणून निवडले गेले असून त्या अंतर्गत 1,000 घरांचे बांधकाम केले जाणार, ज्यासाठी अभिनव तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
 5. हे बांधकाम कमी किमतीचे, टिकाऊ आणि नैसर्गिक संकट काळात टिकाव लागणारे असेल.
 6. याप्रसंगी ‘व्हल्नरेबिलिटी अॅटलस ऑफ इंडिया’च्या तिसर्‍या आवृत्तीचे अनावरण केले.
 7. देशभरामधील शहरांमध्ये बांधकाम सुरू करण्यापूर्वी त्याचे मूल्यांकन करण्यासाठी याचा वापर केला जाणार. संपूर्ण देशाच्या अस्तित्वात असलेल्या धोकादायक स्थितीचे संकलन आहे.
 8. 'एप्रिल 2019 ते मार्च 2020' हे बांधकाम-तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 9. या काळात जलद शहरीकरणामुळे देशातील घरांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला.
 


India and Russia to take 'AK-47' rifle production in Amethi

 1. दिनांक 3 मार्च 2019 रोजी कौहर, अमेठी (उत्तरप्रदेश) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘एके-47 रायफल’ निर्मितीच्या प्रकल्पाचा शुभारंभ करणार आहेत.
 2. रशियाबरोबर भागीदारीत या प्रकल्पाची सुरूवात आयुध कारखान्यात (ऑर्डिनन्स फॅक्टरी) केली जाणार असून 2010 साली त्याचे भूमीपूजन करण्यात आले होते.
 3. भारत सरकारचा याबाबत रशियाबरोबर एक करार झाला आहे.
 4. रशियाकडून संरचित ‘कलाश्नीकोव्ह’ असाल्ट रायफलचे भारतात उत्पादन घेण्यासाठी अमेठीमध्ये ‘इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड’ नावाचा ​​संयुक्त उपक्रम तयार करण्यात आला आहे.
 5. सुमारे साडेसात लाख एके-47 नव्या स्वरूपातील एके-47 रायफलची निर्मिती येथे होणार आहे.
 6. रशिया हा पूर्व यूरोप आणि उत्तर एशिया प्रदेशात स्थित एक विशाल आकार असलेला देश आहे.
 7. हा एकूण 17075400 चौ. किमी. क्षेत्रफळ असलेला जगातला सर्वात मोठा देश आहे. आकाराच्या दृष्टीने हा भारताच्या पाच पट आहे.
 8. या देशाची राजधानी मॉस्को शहर असून देशाचे चलन रशियन रूबल हे आहे.
 9. देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे आहेत.


The Maharashtra government will appoint an lokpal for the students to solve the grievances of students

 1. राज्यात विद्यापीठ आणि महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सर्व विद्यापीठांमध्ये लोकपाल नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे.
 2. विद्यापीठ स्तरावर लोकपाल नियुक्त करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे.
 3. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना सोडविण्याच्या दृष्टीने सर्व विद्यापीठांमध्ये समान कार्यपद्धतीची गरज दिसून आली.
 4. त्यासाठी विद्यापीठ तक्रार निवारणसंदर्भात एकरूप परिनियम तयार करण्यात आला आहे.
 5. या परिनियमामुळे महाविद्यालय, तसेच विद्यापीठ स्तरावर तत्काळ निवारण कक्षाची योजना आणि विद्यापीठ स्तरावर अपील करण्यासाठी लोकपाल नियुक्त केला जाणार आहे.
 6. विद्यापीठ/महाविद्यालये निवृत्त न्यायाधीश, निवृत्त कुलगुरू, तज्ज्ञ यांची नेमणूक लोकपाल म्हणून करू शकतात.
 7. शिवाय विद्यापीठ तक्रार निवारण कक्ष तयार केले जाईल. थेट विद्यापीठाच्या विरोधातील तक्रारींसाठी, तसेच महाविद्यालय तक्रार निवारण कक्षाद्वारे निवारण न झालेल्या तक्रारीसाठी हा कक्ष काम करेल.
 8. प्रकुलगुरू/अधिष्ठाता/वरिष्ठ प्राध्यापक यापैकी एक जण कक्षाच्या अध्यक्षस्थानी असतील.
 9. तक्रार निवारण समितीची मुदत दोन वर्षांची असेल.
 10. तक्रार निवारणाची कार्यपद्धती कशी असावी याबाबत निर्देशदेखील देण्यात आले आहेत.
 11. तक्रार नोंदवण्यासाठी ऑनलाइन पोर्टल तयार करणे आवश्‍यक केले आहे. तक्रारदार विद्यार्थ्याला त्याची बाजू स्वतः अथवा स्वतः निवडलेल्या/प्राधिकृत केलेल्या व्यक्तीद्वारे मांडण्याची मुभा असणे इत्यादी बाबींचा उल्लेख केलेला आहे.
 12. विद्यार्थ्याची तक्रार मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत तक्रार निवारण करणे आवश्‍यक आहे.
 13. विद्यार्थ्यांच्या 15 प्रकारच्या तक्रारींबाबत दाद मागता येणार आहे.
 14. यात प्रामुख्याने गुणवत्तेनुसार प्रवेश न देणे, प्रवेशप्रक्रियेतील अनियमितता, अकारण प्रवेश नाकारणे, संस्थेचे विहित नमुन्यातील माहितीपत्रक प्रसिद्ध न करणे.
 15. संस्थेच्या माहितीपत्रकामध्ये चुकीची वा खोटी माहिती देणे याबाबतच्या तक्रारी करता येतील.


In Coimbatore, IAF gave two 'President's Colors' to the two parties

 1. दिनांक 4 मार्च 2019 रोजी कोयंबटूरजवळ सुलूर तळावर एका कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारतीय हवाई दलाच्या (IAF) दोन तुकडींना ‘प्रेसिडेंट्स कलर’ प्रदान करून गौरवांकीत केले आहे.
 2. सुलूर सुविधेत काम करणारे ‘5-बेस रिपेयर डेपो’ आणि हैदराबादच्या हकीमपेठ जवळील प्रशिक्षण केंद्र या दोन तुकडींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
 3. राष्ट्रपती मानक/रंग (presidential standard/President’s Colour) किंवा राष्ट्रपती ध्वज हा एक सन्मान आहे, जो राज्यप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष यांचे प्रतीक किंवा राजेशाही मानक म्हणून अनेक देशांमध्ये वापरला जातो.
 4. संरक्षण दलाला मिळणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.
 5. भारतात 26 जानेवारी 1950 पासून हा सन्मान भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून प्रदान केला जात आहे.
 6. या मानकावर चार (2 निळे व 2 लाल) भागामध्ये सोनेरी बाह्यरेखांनी काढलेली राष्ट्रीय प्रतीके कोरलेली आहेत – सिंह, हत्ती (5 व्या शतकाच्या अजिंठा लेणीमधील आदिमानवांची चित्रकला), तराजू (17 व्या शतकातील लाल किल्लामधील), कमळ पुष्पाची फुलदाणी.


Roger Federer won his 100th ATP Tour title

 1. स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने दुबईत ATP टूरवरील दुबई ड्युटी फ्री पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविताना ग्रीकच्या स्टेफनोस सिटसिपेसचा पराभव केला.
 2. फेडररच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत ATP टूरवरील हे शंभरावे अजिंक्यपद आहे.
 3. ATP टूरवर सर्वाधिक अजिंक्यपदे मिळविणार्‍या पुरूष टेनिसपटूंच्या यादीमध्ये रॉजर फेडरर दुसर्‍या स्थानी आहे.
 4. अमेरिकेचा माजी टेनिसपटू जिमी कॉनर्सने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत ATP टूरवर 109 अजिंक्यपदे मिळविली असून त्याचा विक्रम अद्याप अबाधित आहे.
 5. 2001 साली फेडररने ATP टूरवरील पहिली स्पर्धा मिलान येथे जिंकली होती.


Top

Whoops, looks like something went wrong.