$ 375 million loan agreement for waterway development project with World Bank of India

 1. भारतीय आंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (IWAI) ने बनारस ते हल्दिया पर्यंत राष्ट्रीय जलमार्ग-1 (NW-1) वर जलवाहतूकीला चालना देण्याच्या दिशेने जलमार्ग विकास प्रकल्पासाठी जागतिक बँकेसोबत करार केला आहे.
 2. जलमार्ग विकास प्रकल्प (JMVP) साठी आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय यांच्यासोबत $3.75 कोटींचा (सुमारे 2250 कोटी रुपये) ऋण करार झाला आहे.
 3. बनारस ते हल्दिया पर्यंत NW-1 (गंगा नदी) वर जलवाहतुकीला चालना देण्यासाठी $80 कोटींच्या JMVP प्रकल्पाच्या क्रियान्वयनासाठी आधीच मंत्रिमंडळाकडून मंजूरी प्राप्त झाली आहे. गंगा नदीवर जलमार्ग विकास प्रकल्पावर लवकरच काम सुरू होणार आहे. 
 4. जलमार्ग विकास प्रकल्पांतर्गत केली जाणारी कार्ये:-
  1. NW-1 हा गंगा नदीच्या पात्रात आखलेल्या मोठ्या बहुउद्देशीय वाहतूक जाळ्याच्या भाग होईल. हे पूर्वीय समर्पित रेल्वे वाहतुक मार्गाला तसेच महामार्गाच्या जाळ्याला जोडले जाईल.
  2. प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांमध्ये नदीच्या बाजूने सहा मल्टी-मॉडेल टर्मिनल उभारले जातील. शिवाय 10 RORO घाट, जहाज दुरुस्ती सुविधा तसेच प्रवाश्यांसाठी घाट विकसित केले जाईल. 
  3. फरक्का लॉक (नदी किंवा कालवा यांवर बांधलेली खोली, ज्यामुळे पाण्याची उंची निश्चित करण्यासाठी या खोलीचे दरवाजे उघडता, बंद करता येतात) चे आधुनिकीकरण करण्यास आणि आणखी एक नवीन लॉक विकसित केले जाईल.
  4. मंजुरीत निधि नदीच्या पात्रात सुरक्षित आणि अधिक विश्वसनीयतेने प्रवास करण्यासाठी एकमेव अश्या नदी माहिती प्रणाली तसेच सुचालन मदत यंत्रणा खरेदी करण्यास IWAI ला मदत करेल.
  5. 2000 टन पर्यंत माल वाहून नेण्याकरिता सक्षम असणार्‍या बार्ज (माल नेण्याचा मोठा पडाव) ची बांधणी करण्यासाठी मंजुरीत निधी वापरला जाईल.
  6. राष्ट्राच्या विकासामध्ये दळणवळण व्यवस्था महत्त्वाची ठरते. त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकार आंतर्देशीय जलमार्ग विकासावर लक्ष केंद्रित करीत आहे. गंगा-यमुना आणि देशातील अन्य नदींच्या पुनरुज्जीविकरणासोबतच 111 नदीवर जलमार्ग तयार करण्याची महत्त्वाकांक्षी योजनेवर भारत सरकार काम करीत आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदर आधारित विकासासाठी 8000 कोटी रुपयांची प्रकल्पे राबवली जात आहेत.
  7. NW-1 प्रकल्पाच्या विकास आणि संचालनाने उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यांमध्ये 4600 हजार प्रत्यक्ष रोजगार आणि जवळपास 84,000 अप्रत्यक्ष रोजगारांची संधी निर्माण होणार आहे.
जलमार्ग विकास प्रकल्प (JMVP)
 1. प्रकल्पाविषयी:-
  1. वाराणसी ते हल्दिया पर्यंत NW-1 वर संचालन क्षमता वाढविण्यात येईल. अर्थसंकल्पीय तरतूद आणि बॉण्ड मार्फत जवळपास 2280 कोटी रुपये गोळा केले जातील. या प्रकारे 258 कोटी रुपये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर खर्च केले जातील. JMVP प्रकल्प मार्च 2023 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जागतिक बँकेकडून प्रकल्पासाठी वित्तीय आणि तांत्रिक मदत मिळणार. हा प्रकल्प NW-1 वर 1500-2000 टन क्षमता असलेल्या जहाजांच्या व्यावसायिक संचालनाला सक्षम करणार आहे.
  2. वाराणसी, हल्दिया आणि झारखंडच्या साहिबगंजमध्ये सुदूर, बहूपद्धती केंद्रांचा विकास केला जाणार आहे. या मार्गावर नदी संचालन प्रणाली, संरक्षण कार्य, आधुनिक नदी माहिती प्रणाली (RIS), डिजिटल ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (DGPS), नाइट नेव्हिगेशन सुविधा उपलब्ध होणार आहे.
  3. प्रकल्पाला पर्यावरण अनुकूल बनविले जात आहे, या मार्गावर दळणवळण इंधनाच्या दृष्टीने कार्यक्षम आणि गुंतवणूक प्रभावी पर्यायी पद्धतीवर संचालित केले जाईल. विशेष रूपाने ठोक वस्तू, धोकादायक सामान आणि अती-आयामी मालाच्या आवागमनासाठी या मार्गांना उपयोगात आणले जाणार आहे.
  4. NW-1 प्रस्तावित पूर्व समर्पित मालवाहू मार्गिका आणि NW-2 सोबत, पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांसोबत राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) ला जोडणारा भारताचा पूर्व परिवहन मार्ग असणार आहे. हा बांग्लादेशसाठी एक कडीच्या रूपात कार्य करणार, कोलकाता बंदर आणि भारत-बांग्लादेश राजशिष्टाचार मार्गाच्या माध्यमातून म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि अन्य पूर्व व दक्षिण-पूर्व आशियाई देशांनी संपर्क साधला जाणार आहे.
 2. वर्तमानात देशात कार्यरत 5 राष्ट्रीय जलमार्ग आहेत आणि 106 मार्गांचा अभ्यास केला जात आहे:-
  1. राष्ट्रीय जलमार्ग-1 (1620 किमी) : इलाहाबाद-हल्दिया (गंगा-भागीरथी-हुगली नदीचा भाग) (वर्ष 1986 मध्ये घोषित)
  2. राष्ट्रीय जलमार्ग-2 (891 किमी) : सदिया-धुबरी (ब्रह्मपुत्र नदी) (वर्ष 1988 मध्ये घोषित)
  3. राष्ट्रीय जलमार्ग-3 (205 किमी) : चम्पाकारा आणि उद्योग मंडल कॅनल सहित कोल्लम-कोट्टापुरम (पश्चिम तट कॅनल) (वर्ष 1993 मध्ये घोषित)
  4. राष्ट्रीय जलमार्ग-4 (1078 किमी) : (i) काकीनाडा-पुडुचेरी आणि कालुवेली टँक (ii) गोदावरी नदीत नाशिक-भद्रचलम-राजामुंद्री (iii) कृष्णा नदीत गंलागली-वजीराबाद-विजयवाडा
  5. राष्ट्रीय जलमार्ग-5 (588 किमी) : (i) तालचेर-धर्मा (ii) ईस्ट कोस्ट कालव्याचे गेओंखली-चारबाटीया (iii) मताई नदी आणि महानदी संगम नदीत हर्बाटिया-धर्मा


India ranked sixth in the list of the richest countries

 1. न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार, जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आलेला आहे. भारताची एकूण संपत्ती $8,230 अब्ज एवढी आहे.
 2. अहवालात देशातल्या संपत्तीमध्ये नागरिकांच्या खासगी संपत्तीचा समावेश असून सरकारी संपत्ती वगळण्यात आली आहे.
 3. जगाबाबत:-
  1. $64,584 अब्ज एवढी संपत्ती असलेला अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देश ठरला आहे.
  2. अमेरिकेनंतर यादीत अनुक्रमे चीन ($24,803 अब्ज), जपान ($19,522 अब्ज), ब्रिटन ($9,919 अब्ज), जर्मनी ($9,660 अब्ज), फ्रान्स ($6,649 अब्ज), कॅनडा ($6,393 अब्ज), ऑस्ट्रेलिया ($6,142 अब्ज) आणि इटली ($4,276 अब्ज) यांचा प्रथम 10 श्रीमंत देशांमध्ये समावेश आहे.

अहवालात भारताचे स्थान     

 1. भारताने श्रीमंतीच्या बाबतीत फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली या देशांनाही मागे टाकले आहे.
 2. 2017 साली भारत हा सर्वात चांगली कमाई करणारा देश आहे.
 3. 2007 साली भारताची संपत्ती $3,165 अब्ज एवढी होती. एका दशकात ती 160% नी वाढून $8,230 अब्जवर पोहचलेली आहे.
 4. 2016 साली भारताची संपत्ती $6,584 अब्ज एवढी होती. भारतामध्ये एकूण 119 अब्जाधीश तर 20,730 कोट्यधीश व्यक्‍ती आहेत.
 5. कोट्याधीशांची संख्येत भारत जगात सातव्या क्रमांकाच देश आहे.
 6. सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारताचा अमेरिका आणि चीननंतर तिसरा क्रमांक लागतो.


Australian Open 2018 Winners: Complete list

 1. मेलबर्न येथे आयोजित ‘ऑस्‍ट्रलियन ओपन 2018’ टेनिस स्पर्धा पार पडली.
 2. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर ने मारिन सिलिचचा पराभव करत पुरुष एकेरीचा विजेता ठरला. त्याने आपले 20 वे ग्रँड स्लॅम जिंकले. रोजर फेडरर हा 20 ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
 3. डेन्मार्कची कॅरोलिना वोज्‍नियाकी हिने महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे.
 4. स्पर्धेच्या अंतिम लढतीत वोज्‍नियाकी हिने रोमानियाच्या सिमोना होलेप हिचा पराभव केला. या विजयासह कॅरोलिना वोज्‍नियाकी ही जागतिक क्रमांक 1 ची महिला खेळाडू बनली.
 5. हंगेरीची टिमिया बाबोस आणि फ्रांसची क्रिस्टिना म्लाडेनोविक या जोडीने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.
 6. बाबोस-म्लाडेनोविक या जोडीने अंतिम खेळीत इलेना वेसनिना आणि इकॅटरिना माकारोवा या जोडीचा पराभव केला. बाबोसचा हा पहिला ग्रँड स्लॅम किताब आहे.
 7. पुरुष दुहेरी प्रकारात ऑलिव्हर मॅराक (ऑस्ट्रिया) व मॅट पावीक (क्रोएशिया) यांनी जुआन सिबॅस्टियन कॅबॅल आणि रॉबर्ट फराह (कोलंबिया) यांच पराभव केला.
 8. मॅराक आणि पाविक यांचे हे पहिले ग्रँड स्लॅम आहे. या विजयासह मॅराक हा ऑस्ट्रियाचा तिसरा खेळाडू ठरला आहे ज्याने पुरुष दुहरीचे ग्रँड स्लॅम जिंकले.
 9. मिश्र दुहेरी प्रकारात टिमिया बाबोस (हंगेरी) व रोहन बोपन्ना (भारत) या जोडीचा पराभव करत मॅट पेवीक (क्रोएशिया) व गॅब्रिएला डाब्रोव्स्की (कॅनडा) या जोडीने विजेतेपद जिंकले.
 10. स्पर्धेविषयी:-
  1. ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ ही ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये जानेवारी महिन्यात दरवर्षी आयोजित होणारी एक टेनिस स्पर्धा आहे. ही स्पर्धा पहिल्यांदा 1905 साली खेळली गेली होती. ही वर्षात खेळल्या जाणार्‍या चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांमधील प्रथम स्पर्धा आहे. अन्य तीन - फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि यूएस ओपन.
  2. ऑस्ट्रेलियन ओपन वर्षभरात खेळल्या जाणार्‍या चार ग्रँड स्लॅममधील पहिला आहे, जे जानेवारी महिन्यात आयोजित केले जाते. त्यानंतर फ्रेंच ओपन (मे-जून), विंबल्डन (जून-जुलै) आणि यूएस ओपन (ऑगस्ट-स्पटेंबर) यांचे आयोजन केले जाते. या स्पर्धा इंटरनॅशनल टेनिस महासंघ (ITF) तर्फे आयोजित केले जाते.
ऑस्‍ट्रलियन ओपन 2018 - विजेते 
 1. पुरुष एकेरी - रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)
 2. महिला एकेरी - कॅरोलिन वोज्‍नियाकी (डेन्मार्क)
 3. पुरुष दुहेरी - ऑलिव्हर मॅराक (ऑस्ट्रिया) व मॅट पावीक (क्रोएशिया)
 4. महिला दुहेरी - टिमिया बाबोस (हंगेरी) आणि क्रिस्टिना म्लाडेनोविक (फ्रांस)
 5. मिश्र दुहेरी - मॅट पेवीक (क्रोएशिया) व गॅब्रिएला डाब्रोव्स्की (कॅनडा)
 6. मुले एकेरी - सेबॅस्टियन कॉर्डा (अमेरिका)
 7. मुली एकेरी – लिआंग एन-शुओ (चीनी-तायपेई)
 8. मुले दुहेरी - ह्यूगो गेस्टन व स्लेमेंट ताबूर (फ्रांस)
 9. मुली दुहेरी - लिआंग एन-शुओ (चीनी तायपेई) व वांग झींयू (चीन)
 10. व्हीलचेयर पुरुष एकेरी - शिंगो कुनेदा (जपान)
 11. व्हीलचेयर महिला एकेरी - दिदे डी ग्रूट (नेदरलँड)
 12. व्हीलचेयर क्वॉड एकेरी - डेलन अॅल्कोट (ऑस्ट्रेलिया)
 13. व्हीलचेयर पुरुष दुहेरी - स्टीफन हौदेट व निकोलस पीफर (फ्रांस)
 14. व्हीलचेयर महिला दुहेरी - मेरजोलीन बुइस (नेदरलँड्स) व युइ कमिजी (जपान)
 15. व्हीलचेयर क्वॉड दुहेरी - डेलन अॅल्कोट व हीथ डेव्हिडसन (ऑस्ट्रेलिया)


$ 250 million deal with ADB for improving rural connectivity in five states

 1. ‘प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते कार्यक्रम (PMGSY)’ अंतर्गत आसाम, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 6,254 किलोमीटर लांबीच्या सर्वकाळ ग्रामीण रस्त्यांच्या बांधकामाला वित्तपुरवठा करण्यासाठी भारत सरकारने आशियाई विकास बँक (ADB) सोबत $250 दशलक्ष चा कर्ज करार केला आहे.
 2. हा निधी निर्दिष्ट पाच राज्यांमध्ये ग्रामीण संपर्क व्यवस्था कायम स्वरुपात तयार करण्यासाठी वापरला जाणार आहे.
 3. प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते कार्यक्रम (PMGSY) ही देशातील ग्रामीण भागांना जोडण्यासाठी पक्के रस्ते प्रदान करण्याच्या उद्देशाने 25 डिसेंबर 2000 रोजी सुरू करण्यात आलेली एक केंद्र पुरस्कृत योजना आहे.
 4. आशियाई विकास बँक (ADB) ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे.
 5. ज्याची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली.
 6. ही बँक UN इकोनॉमिक कमीशन फॉर एशिया अँड फार ईस्ट (UNESCAP) आणि गैर क्षेत्रीय विकसित देशांच्या सदस्यांना सामावून घेते.


High-performance computing system of 'Mihir' unveiled at Noida

 1. नोएडा मधील ‘राष्ट्रीय मध्यम क्षेत्र हवामान अंदाज केंद्र’ (National Centre for Medium Range Weather Forecasting -NCMRWF) येथे 'मिहिर' नामक एक उच्च कार्यक्षमता संगणकीय (HPC) प्रणालीला प्रस्थापित केले गेले आहे.
 2. 'मिहिर' ची HPC क्षमता 2.8 पेटाफ्लॉप आहे.
 3. ही पीक क्षमता आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी HPC सुविधा असेल.
 4. 'प्रत्‍यूष' मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकंप्यूटरला ‘भारतीय हवामानशास्त्र संस्‍था (IITM), पुणे’ येथे प्रस्थापित केले गेले आहे, ज्याच्या माध्यमातून भुविज्ञान मंत्रालयाकडून अचूक हवामान अंदाज मिळण्यास मदत होईल.
 5. 'प्रत्‍यूष' ची HPC क्षमता 4.0 पेटाफ्लॉप (PF) आहे. यासोबतच भारताची एकूण HPC क्षमता 6.8 PF झाली.
 6. यासोबतच हवामानशास्त्राला आणि हवामान संबंधी समुदायाला समर्पित HPC संसाधनाची सोय असणार्‍या देशांच्या बाबतीत आता भारत ब्रिटन (20.4 पेटाफ्लॉप), जापान (20 पेटाफ्लॉप) आणि अमेरिका (10.7 पेटाफ्लॉप) नंतर चौथ्या स्थानी गणला जाणार आहे.


Top