1. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या पश्चात कुणाल कपूर, संजना कपूर आणि करण कपूर असा परिवार आहे.
 2. शशी कपूर यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत ११६ सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील ६१ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली.
 3. १९८४ मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर शशी कपूर एकटे राहायला लागले होते. त्यानंतर त्यांची तब्येत सातत्याने बिघडत गेली. सततच्या आजारपणामुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहणेच पसंत केले.
 4. २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
 5. शशी कपूर यांनी हिंदी तसेच इंग्रजी सिनेमांमध्येही काम केले आहे. निर्माते म्हणून त्यांनी ‘जुनून’ (१९७८), ‘कलियुग’ (१९८०), ‘३६ चौरंगी लेन’ (१९८१), ‘विजेता’ (१९८२), ‘उत्सव’ (१९८४) या नावाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली होती. तसेच ६० आणि ७० च्या दशकांत त्यांनी ‘जब-जब फूल खिले’, ‘कन्यादान’, ‘शर्मीली’, ‘आ गले लग जा’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘चोर मचाए शोर’, ‘दीवार’, ‘कभी-कभी’ आणि ‘फकीरा’ या सुपरहिट सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या होत्या.
 6. शशी कपूर यांचे समकालीन कलाकार व्यावसायिक चित्रपटांमध्येच अडकलेले असताना कपूर यांनी त्याबरोबरीने कलात्मकतेची कास धरत निर्माता होण्याचे धाडस दाखवले. फार कमी अभिनेते स्टार झाल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळण्याचे धारिष्टय़ दाखवतात. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून शशी कपूर यांनी तिथेही योगदान दिले.

पुरस्कार

 1. २०११ मध्ये पद्म भूषण
 2. २०१५ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
 3. १९९४ मध्ये ‘मुहाफीज’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार
 4. १९७९ मध्ये जुनून या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार
 5. २०१० मध्ये फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार


 1. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वात ३ डिसेंबरला राष्ट्रीय कृषी शिक्षण दिवस साजरा करण्यात आला.
 2. भारत सरकार वर्ष २०१५ मध्ये दरवर्षी ३ डिसेंबरला राष्ट्रीय कृषी शिक्षण दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम केंद्रीय कृषी मंत्री (१९४६) व स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा या दिवशी जन्म झाला होता.
 3. कृषी विषयांच्या पदवीधारकांना उद्योजकता विकास आणि रोजगार सुनिश्चित करण्यासाठी 'स्टूडेंट रेडी' कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ्यक्रमादरम्यान कौशल्याच्या दृष्टीने प्रशिक्षित करणे हा आहे.
 4. पदवीच्या चौथ्या वर्षात समग्र कौशल्य विकास व शेतकर्‍यांसोबत तसेच अतिरिक्त उत्पादन उपक्रमांमध्ये काम करण्याची तरतूद असणार. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणारा मासिक भत्ता  ७५० रूपयांवरून वाढवत ३००० रुपयांपर्यंत केला आहे.


 1. आज ४ डिसेंबरला भारतीय नौदलाने भारतीय नौदलाचे कर्तृत्व आणि वीर सैनिकांचे बलिदान यांचा गौरव करण्याकरिता ४६ वा 'नौदल दिन' साजरा केला आहे.
 2. या दिनानिमित्त दिल्लीत भरविलेल्या 'इनोवेशन पॅव्हिलियन' प्रदर्शनीत भाग घेतलेल्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
 3. 'ऑपरेशनल युनिट्स' श्रेणी - INS कुथार (विजेता) आणि INS विक्रमादित्य (उप-विजेता)
 4. 'शोअर इस्टॅब्लिशमेंट्स' श्रेणी – वेपन इलेक्ट्रॉनिक सिस्टम इंजिनीयरिंग इस्टॅब्लिशमेंट (विजेता) आणि नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड, कोची (उप-विजेता)
 5. ४ डिसेंबर १९७१ रोजी भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी 'ऑपरेशन ट्राय डेन्ट' अंतर्गत क्षेपणास्त्रांनी कराची बंदरावर चढवलेल्या साहसी हल्ल्याची आठवण म्हणून तसेच त्या युद्धातील सर्व शहीदांना श्रद्धांजली म्हणून भारतात नौदल दिन साजरा केला जातो.


Top