New Sharia law in Brunei

 1. समलिंगी संबंध आणि व्यभिचारासाठी ब्रुनेई येथे दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा नवीन शरिया कायद्यानुसार संमत केली आहे.

 2. ब्रुनेईमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्य़ांसाठी शरिया कायद्यानुसार कडक शिक्षा जाहीर करण्यात आल्या असून जागतिक स्तरावरील राजकारणी, मानवी हक्क गट आणि प्रसिद्ध व्यक्तींनी या शिक्षांचा निषेध केला आहे.

 3. ब्रुनेईवर सध्या सुल्तान हस्सानाल बोल्किआ यांची सत्ता आहे. राष्ट्रीय स्तरावर शरिया कायदा लागू करणारा मध्य पूर्व आशियामधील ब्रुनेई हा पहिलाच देश आहे.

 4. चोरी करणाऱ्यांचे हात-पाय छाटण्याची आणि बलात्कार आणि दरोडय़ासाठीही देहांताची शिक्षा या कायद्यानुसार ठोठावण्यात येणार आहे. तर प्रेषित महंमद यांचा अपमान करणाऱ्या मुस्लीम अथवा बिगर मुस्लिमांना फाशीची शिक्षा ठोठावली जाईल.

 5. तसेच या शिक्षा ‘क्रूर आणि अमानवी’ आहेत अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांनी निषेध केला आहे. प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता जॉर्ज क्लूनी आणि पॉप स्टार इल्टॉन जॉन यांनी ब्रुनेईच्या बालकीच्या हॉटेल्सवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

 6. तर या देशात इस्लामची शिकवण दृढ झालेली पाहायची आहे, असे वक्तव्य सुलतान बोल्किआ यांनी देशातील लोकांसमोर केले.


Arvind Pandey for Nagpur Central Election Police Inspector

 1. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नागपूर लोकसभा मतदार संघासाठी पोलीस निरीक्षक म्हणून अरविंद भूषण पांडे यांची नियुक्ती केली आहे. पांडे यांनी नागपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकविषयक कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

 2. केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक अरविंद पांडे हे उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील 25 बटालियनचे कमांडंट असून, 2009 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत.

 3. नागपूर लोकसभा मतदार संघातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मतदारांची गाऱ्हाणे रविभवन येथे कॉटेज क्रमांक-1 येथे स्वीकारतील. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9022203935 आहे.

 4. तसेच ते जनतेसाठी तसेच राजकीय पक्ष, उमेदवार अथवा उमेदवारांच्या प्रतिनिधीसाठी रविभवन येथे सकाळी 11 ते 1 व सायंकाळी 5 ते 6 या वेळेत उपलब्ध राहतील.


 day special

 1. सन 1882 मध्ये ब्रिटन च्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम ईस्ट लंडन मध्ये चालू झाल्या.

 2. ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचा जन्म 4 एप्रिल 1902 मध्ये झाला होता.

 3. पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा 12 देशांनी 1949 मध्ये नाटो (NATO) या संस्थेची स्थापनाकेली.

 4. सन 1968 मध्ये जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्युथर किंग (ज्युनियर) यांची हत्या केली.

 5. लता मंगेशकर यांना 1990 यावर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.


The US will sell 24 'MH-60R' helicopters

 1. अमेरिकेनी भारताला 24 ‘MH-60R’ हेलीकॉप्टरांची विक्री करण्याविषयीचा प्रस्ताव मान्य केला आहे. हे हेलीकॉप्टर जमिनीवर मारा करण्याची आणि पाणबुडीचा वेध घेण्याची क्षमता ठेवते.
 2. अमेरिकेची ‘लॉकहीड मार्टिन’ या हेलीकॉप्टर तयार करणार्‍या कंपनीच्या माध्यमातून हा सौदा केला जात आहे. $ 2.6 अब्ज किंमतीचा हा प्रस्ताव आहे.
 3. भारत-अमेरिका संरक्षण संबंध:-
  1. संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमधील संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने, 2016 साली अमेरिकेनी भारताला त्याचा ‘मेजर डिफेन्स पार्टनर’ (MDP) हा दर्जा प्रदान केला.
  2. तसेच 2018 साली भारताला अमेरिकेचा ‘स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरायझेशन-1’ (STA-1) दर्जा दिला गेला, ज्यामुळे हा दर्जा प्राप्त करणारा भारत हा दक्षिण कोरिया आणि जपान नंतर तिसरा आशियाई देश ठरला.
  3. शिवाय संरक्षण क्षेत्रात सुरक्षित संपर्क यंत्रणेसाठी लागणारी उपकरणे पुरविण्यासाठी भारताशी अमेरिकेचा ‘कम्युनिकेशन्स कॉम्पॅटिबिलिटी अँड सेक्युरिटी अग्रिमेंट (COMCASA) हा करार झाला.
  4. संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिका उपखंडातला एक देश आहे.
  5. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि यूएस डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


Hundreds of political parties were closed by the Facebook company

 1. फेसबुक कंपनीने असमाधानात्मक वर्तन दिसून आल्याने भाजप, कॉंग्रेस अश्या भारतातल्या राजकीय पक्षांशी संबंधित असलेली 702 खाती, पृष्ठे व गट यांच्यावर बंदी आणून त्यांचे खाती बंद केली आहेत.
 2. दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीवर असलेल्या लोकसभा निवडणूक-2019 याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही मर्यादेशिवाय सामाजिक माध्यमांवर गैरपद्धतीने प्रकाशित होणार्‍या सामग्रीबाबत वाढत्या चिंतेवर उपाययोजना म्हणून अमेरिकेत मुख्यालय असलेल्या या कंपनीने हा निर्णय घेतला आहे.


India, against Turkey, the European Union filed a complaint with the WTO

 1. युरोपीय संघाने (EU) भारत आणि टर्की यांच्या चुकीच्या व्यापारी धोरणांच्या विरुद्ध जागतिक व्यापार संघटना (WTO) याकडे तक्रार दाखल केली आहे.
 2. माहिती तंत्रज्ञान उत्पादनांवर लादलेले आयात शुल्क याबाबत भारताविरुद्ध तर औषधीनिर्मात्यांना प्रभावित करणार्‍या उपायांवरून टर्कीविरुद्ध दोन WTO तंटा प्रस्ताव सादर केले आहेत.
 3. दोन्ही देशांच्या धोरणांमुळे युरोपीय संघाच्या निर्यातीला वर्षाला एकूण 1 अब्ज युरोपेक्षा अधिकचा भुर्दंड बसत आहे.
 4. जागतिक व्यापार संघटना (WTO) :-
  1. ही आंतरसरकारी संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. 
  2. याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि याचे 164 देश सभासद आहेत.
  3. 1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश कराराच्या अंतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झाले.
  4. WTO वाटाघाटी करता येणार्‍या व्यापार करारासाठी कार्यचौकट प्रदान करून सहभागी देशांमध्ये व्यापाराचे नियमन करते तसेच सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सह्या केलेल्या आणि त्यांच्या संसदेने मान्य केलेल्या WTO कराराप्रती सहभागींची निष्ठा वाढविण्यासाठीच्या उद्देशाने तंटा निवारण प्रक्रिया हाताळते.
 5. युरोपीय संघ (EU):-
  1. युरोपीय संघ (EU) हा 28 सदस्य राज्यांचा राजकीय आणि आर्थिक संघ आहे, जे प्रामुख्याने युरोप खंडात आहेत.
  2. युरोपीय संघाची स्थापना 1 नोव्हेंबर 1993 रोजी झाली.
  3. याचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आहे.


For the first time in the world, 5G networks have been tested in China

 1. चीनचा शांघाय हा 5G नेटवर्कचे क्षेत्र आणि ब्रॉडबँड गिगाबिट नेटवर्क याबाबतची जगातली पहिली चाचणी घेणारा जिल्हा बनला आहे.
 2. पुढील पिढीचे सेल्युलर मोबाईल दळणवळण व्यवस्था विकसित करण्याविषयी जगभरात प्रयत्न केले जात आहे.
 3. 5G हे 4G LTE नेटवर्कपेक्षा 10 ते 100 पट अधिक वेगवान डाउनलोड स्पीडसह चालते.
 4. त्यासाठी ‘हुवाई मेट X’ हा जगातला पहिला 5G AI फोन सादर करण्यात आला आहे. त्यावरून पहिला 5G व्हिडिओ कॉल केला गेला.
 5. 5G नेटवर्क:-
  1. 5G तंत्रज्ञानात डेटा स्पीड हा 100 गीगाबाईट्स प्रति सेकंद यावर पोहोचलेला असेल.
  2. यासोबतच डेटाची देवानघेवान अत्यंत गतीमान होऊन फोनवर इंटरनेट ऑफ थिग्ज (IoT) ही सुविधाही मिळू शकेल.
  3. 5G तंत्रज्ञानात एक ते दोन गीगाहर्ट्झ चॅनल बॅन्ड विड्थचा वापर केलेला अॅंटेना विकसीत केला जाईल, जो वर्तमानात 4G साठी 20 मेगाहर्ट्झचा आहे.


Korea - Winner of the Sultan Azlan Shah Cup Hockey Tournament

 1. इपोह (मलेशिया) येथे ‘2019 सुलतान अझलन शहा चषक’ या हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला अंतिम सामन्यात कोरियाने पराभुत करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
 2. सुलतान अझलन शहा चषक ही मलेशिया देशात दरवर्षी खेळवली जाणारी एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे. 1983 साली या स्पर्धेची सुरुवात झाली.
 3. 1998 सालापासून ही स्पर्धा दरवर्षी भरविण्यात येऊ लागली. ही एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरुष फिल्ड हॉकी स्पर्धा आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.