Palghar has a growing graph of malnutrition, 119 victims in seven months

 1. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुपोषण आणि विविध आजारांमुळे बालमृत्यू होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.
 2. जिल्हा स्थापनेपासून हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या, तरी पहिल्या दोन वर्षात अडीच टक्के इतक्या प्रमाणात बालमृत्यू झाले.
 3. पालघर जिल्हा निर्मिती होऊन चार वर्षे उलटली, परंतु कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या गेल्या असल्या तरी बालमृत्यूचे ग्रहण या जिल्ह्याला अजूनही लागले आहे.
 4. 2017-18 मध्ये पालघरमध्ये तब्बल 469 बालमृत्यू झाले असून, चालू वर्षात गेल्या सात महिन्यात जुलैपर्यंत 119 बालकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यु झाले आहेत.
 5. नुकतेच वाडा तालुक्यातील गूंज आश्रमशाळेतील आठवीत शिकणाऱ्या प्रमिला शांताराम पागी या विद्यार्थिनीचा भुकेमुळे (कुपोषणाने) उपचारादरम्यान मृत्यू झाला.प्रमिलाचे हिमोग्लोबिन अत्यंत कमी म्हणजे 2 पर्यंत गेल्याने तिचा मृत्यू झाला.
 6. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुपोषण आणि विविध आजारांमुळे बालमृत्यू होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.
 7. जिल्हा स्थापनेपासून हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या, तरी पहिल्या दोन वर्षात अडीच टक्के इतक्या प्रमाणात बालमृत्यू झाले. त्यानंतर गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व नवजात बालकांसाठी पोषण आहार, आरोग्य तपासणी यासाठी योजना आखण्यात येऊन त्यावर देखरेख ठेवण्यासाठी आरोग्य मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्सची स्थापनाही झाली.
 8. मात्र बालमृत्यूचे प्रमाणात अजूनही लक्षणीय राहिल्याने शासनाला पोषण आहार, आरोग्य सेवांसोबत स्थानिक पातळीवर अधिक लक्ष द्यावं लागणार आहे.
 9. 2014-15 मध्ये 626 बालमृत्यूची नोंद झाली असताना, 2015-16 मध्ये 565, 2016-17 मध्ये 557, सन 2017-18 मध्ये 469 इतक्या बालमृत्यूची नोंद झाली आहे.
 10. या सोबत प्रसूतीच्या वेळी सन 2014-15 मध्ये 16, सन 2015-16 मध्ये 15, सन 2016-17 मध्ये 18, सन 2017- 18 मध्ये 19 मातांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण डहाणू आणि जव्हार तालुक्यात अधिक प्रणाम असून मोखाडा, पालघर, तलासरी, विक्रमगड आणि वाडा तालुक्यात देखील लक्षणीय आहे.


Alastair Cook announced retirement

 1. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत दमदार कामगिरी करता आली नाही म्हणून इंग्लंडचा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
 2. भारताचा माजी महान क्रिकेटपटूसचिन तेंडुलकरच्या कसोटी विक्रमांच्या जवळ कुक पोहोचला होता. त्यामुळे सचिनचे विक्रम आता कुक मोडणार असे वाटले होते.
 3. पण कुकच्या निवृत्तीच्या बातमीमुळे सचिनचे चाहते काहीसे सुखावले आहेत.  भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यानंतर कुक निवृत्ती पत्करणार आहे.
 4. त्यामुळे आपल्या अखेरच्या सामन्यात कुक कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे
 5. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान कुकने पटकावला आहे. कुकच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 12, 254 धावा आहेत.


Ganga is most polluted river in the world says world wide fund report

 1. केंद्र सरकारकडून नमामि गंगे यांसारख्या उपक्रमातून गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.
 2. परिस्थिती मात्र काहीही बदललेली नाही, हे चित्र उलट धोकादायक होत चालल्याचं वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड (WWF) या संस्थेच्या अहवालातून समोर आलं आहे.
 3. गंगा ही जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक असल्याचं WWF ने आपल्या अहवालात म्हटलं आहे. कारण, देशात 2071 किलोमीटर क्षेत्रात वाहणाऱ्या गंगा नदीत इतर भारतीय नद्यांप्रमाणेच अगोदर पूर आणि नंदर दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे.
 4. उत्तराखंडपासून ते हिमालायातून बंगालच्या खाडीच्या सुंदरवनापर्यंत गंगा नदीवर मोठ्या प्रमाणात सिंचन केलं जातं.
 5. गंगा भारतात 2071 किमी आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये आपल्या सहाय्यक नद्यांसोबत 10 लाख वर्ग किमी या मोठ्या क्षेत्रात विस्तार करते.
 6. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून गंगा नदी वाहते. गंगा नदीला येऊन मिळणाऱ्या उत्तरेकडील प्रमुख नद्यांमध्ये यमुना, रामगंगा, करनाली, तापी, गंडकी, कोसी आणि काक्षी यांचा समावेश आहे.
 7. तर दक्षिण पठाराहून येऊन मिळणाऱ्या नद्यांमध्ये चंबळ, सोन, बेतवा, केन, दक्षिणी टोस यांचा समावेश आहे. यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी सहाय्यक नदी आहे, जी हिमालयातील यमुनोत्रीहून उगम पावते.
 8. गंगा नदी उत्तराखंडमध्ये 110 किमी, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 1450 किमी, बिहारमध्ये 445 किमी आणि पश्चिम बंगालमध्ये 520 किमीचा प्रवास करते आणि पुढे बंगालच्या खाडीला जाऊन मिळते.


Amit Pangal's Golden Punch

 1. इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत भारताचे सुवर्ण अभियान सुरू असून, शनिवारी या स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदके मिळाली.
 2. बॉक्सिंगमध्ये युवा बॉक्सर अमित पांघलने सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर भारताला पत्त्यांच्या खेळात सुवर्णलाभ झाला आहे.
 3. बॉक्सिंगमध्ये या स्पर्धेत कमी पदके मिळाली. भारताचे अनेक खेळाडू पराभूत होत असताना विकास कृष्णन आणि अमित फांगल यांनी मात्र पदकांच्या फेरीत प्रवेश केला होता.
 4. सलग दोन्ही आशियाई स्पर्धेत पदके जिंकल्यामुळे विकासकडून पदकाची खात्री होती; परंतु सेमीफायनल गाठताना त्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याचे सुवर्णपदकाचे स्वप्न कांस्य पदकावर थांबले होते.
 5. विकास कृष्णनचे सुवर्णपदकाचे अपुरे राहिलेले स्वप्न युवा बॉक्सर अमितने पूर्ण करताना 49 किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या हसनबॉय दुस्मातोवचा 3-2 असा पराभव करत भारताला 14 वे सुवर्णपदक मिळवून दिले.  
 6. अंतिम लढतीच्या पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी सावध खेळ केला. अमितने सुरेख बचाव करताना उझबेकिस्तानच्या खेळाडूला गुण मिळवण्यापासून रोखले. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमितचा खेळ उल्लेखनीय झाला. त्याने ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला तोडीस तोड उत्तर दिले. हरियाणाच्या अमितने 2017 मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. अमितने 3-2 अशा फरकाने बाजी मारताना भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमितने फिलीपाईन्सचा आपला प्रतिस्पर्धी कार्लो पालमवर मात केली होती. भारताचा आणखी एक अनुभवी बॉक्सर विकास कृष्णनला दुखापतीमुळे 75 किलो वजनी गटातून माघार घेतल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 
 7. बॉक्सिंगमध्ये भारताने यंदाच्या आशियाई स्पर्धेत निराशा केली आहे. या स्पर्धेत भारताला फक्त 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक जिंकता आले आहे, पण एकूण स्पर्धेचा विचार करता भारताची आशियाई स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी 2010 ला चीनमध्ये झालेल्या


Top