Researchers who develop cancer therapy will be awarded the Nobel Prize in Medicine

 1. प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारांच्या यादीतील विजेत्यांची नावं जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
 2. यंदाचं शरीरविज्ञानशस्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रासाठीचं नोबेल पारितोषिक जेम्स पी अलीसन आणि तासुकू होन्जो यांना संयुक्तपणे जाहीर झालं आहे.
 3. कॅन्सर अर्थात कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. कॅन्सर थेरपीतील महत्त्वाचं संशोधन त्यांनी केलं.
 4.  जेम्स पी अलीसन यांनी प्रोटीनचा अभ्यास करुन रोगप्रतिकार प्रणालीबाबत महत्त्वाचं संशोधन केलं.
 5. अलीसन आणि तासुकू होन्जो यांनी अशी थेरपी विकसित केली आहे, ज्यामुळे शरिरातील पेशींमधील रोगप्रतिकारक प्रणालीला कॅन्सर ट्यूमरशी लढण्यासाठी सक्षम केलं जातं.
 6. कॅन्सर थेरपीबाबतच्या महत्त्वाच्या योगदानाबद्दल या दोघांचा सन्मान करण्यात आला.
 7. यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही अशी घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे.
 8. गेल्या 70 वर्षात यंदा पहिल्यांदाच साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.


Gita Gopinath, the chief economist of the IMF

 1. रघुराम राजन यांच्यानंतर आणखी एका भारतीय व्यक्तीची वर्णी आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी लागली आहे.
 2. भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी करण्यात आली आहे.
 3. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टिन लगार्डी यांनी गीता यांची निवड केली आहे. सध्या मोरी ऑब्स्टफेल्ड आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची धुरा सांभाळत आहेत.
 4.  मोरी डिसेंबरमध्ये निवृत्त होतील झाल्यानंतर गीता गोपीनाथ कार्यभार सांभाळणार आहेत.
 5. आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती झालेल्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.
 6. याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली होती.
 7. राजन 1 सप्टेंबर 2003 ते 1 जानेवारी 2007 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी होते.


Special postal ticket for Rayat Shikshan Sanstha

 1. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त भारतीय टपाल खात्यातर्फे विशेष टपाल तिकीट व विशेष कव्हर प्रकाशित करण्यात येणार आहे.
 2. सातारा येथील संस्थेच्या मुख्यालयात होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात हे प्रकाशन केले जाईल, अशी माहिती टपाल खात्याच्या सूत्रांनी दिली.
 3. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये लावलेल्या या संस्थारूपी रोपट्याचे आता मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे.
 4. संस्थेच्या या कारकिर्दीबाबत टपाल तिकीट प्रकाशित करून गौरव करण्यात येणार असल्याची माहिती टपाल खात्यातर्फे देण्यात आली.


India's 4 reactors are under the supervision of the IAEA

 1. भारताने ४ अणुभट्ट्यांना आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अणुऊर्जा विभागाचे अध्यक्ष शेखर बसू यांनी १९ सप्टेंबर रोजी ही घोषणा केली.
 2. या ४ अणुभट्ट्यांमध्ये २ रशियन डिझाइनचे प्रेशराइज्ड लाइट वॉटर रिॲक्टर आणि २ प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टरचा समावेश आहे.
 3. याबरोबरच IAEAच्या देखरेखीखालील एकूण अणुभट्ट्यांची संख्या २६ झाली आहे.
 4. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था:-
 5. IAEA: International Atomic Energy Agency
 6. ही अणुऊर्जेच्या शांततामय वापराचा प्रसार करणारी आणि अणुउर्जेचा व आण्विक शस्त्रांचा लष्करी उद्देशासाठी वापर करण्यास प्रतिबंध घालणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
 7. २९ जुलै १९५७ रोजी एक स्वायत्त संस्था म्हणून या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे मुख्यालय ऑस्ट्रियाच्या राजधानी व्हिएन्ना येथे आहे.
 8. ही संस्था आंतरराष्ट्रीय अणुशक्तीसाठी वॉचडॉग म्हणून काम करते. १५१ देश या संस्थेचे सदस्य आहेत.
 9. ही संस्था जरी संयुक्त राष्ट्रांपासून स्वतंत्र असली, तरीही ती संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला आणि सुरक्षा परिषदेला आपल्या कार्याचा अहवाल देते.
 10. IAEA आणि या संस्थेचे माजी महानिर्देशक मोहमद अल बर्देई यांना २००७साली संयुक्तपणे नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.


For the first time, the birth of lionesses was born with artificial pregnancy

 1. दक्षिण आफ्रिकेमध्ये टेस्ट ट्युब तंत्रज्ञानाद्वारे सिंहाच्या दोन छाव्यांचा जन्म झाला आहे. 
 2. कृत्रिम गर्भधारणेद्वारे जन्माला आलेली जगातील ही पहिली सिंहांची जोडी आहे.
 3. आयव्हीएफ म्हणजे कृत्रिम गर्भधारणा पद्धतीचा वापर करून या छाव्यांचा जन्म झाला आहे. यापैकी एक नर आणि एक मादी आहे.
 4. दक्षिण अफ्रीकेतील प्रिटोरिया मॅमल रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये २५ ऑगस्ट रोजी या दोन्ही छाव्याचा जन्म झाला आहे.
 5. १८ महिन्यांचे परिक्षण आणि मेहनीतीनंतर संशोधकांना हे यश आले आहे.
 6. अशा प्रकारे यापुढे अनेक छाव्यांना जन्माला घातले जाऊ शकते. सिंहाप्रमाणे इतर प्राण्यांची निर्मितीही कृत्रिम पद्धतीने करता येऊ शकते. ज्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना वाचवले जाऊ शकते.
 7. आफ्रिकेच्या २६ देशांतील सिंहाच्या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांच्या संख्येत ४३ टक्केंनी कपात झाली आहे.
 8. आता फक्त २० हजार सिंह जिंवत राहिले आहेत. जर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर भविष्यात आपण सिंहाला पाहू शकणार नाही.


Top