Government of India's new 'National Digital Telecom Policy 2018'

 1. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वात भारत सरकार नवे ‘राष्ट्रीय डिजिटल दूरसंचार धोरण 2018’ तयार करीत आहे.
 2. त्यासाठी हितधारकांकडून सल्ला आणि शिफारसींकरिता दूरसंचार धोरणाचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 3. देशाच्या प्रत्येक नागरिकाला 50 Mbps क्षमतेची ब्रॉडबॅंड सेवा उपलब्ध करून देणे.
 4. क्षेत्रामध्ये $100 अब्जची गुंतवणूक आकर्षित करणे.
 5. त्यातून सन 2022 पर्यंत या क्षेत्रात 40 लक्ष नोकर्‍या निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
‘राष्ट्रीय डिजिटल दूरसंचार धोरण 2018’
 1. धोरणाची अन्य वैशिष्ठ्ये:-
 2. सन 2020 पर्यंत देशाच्या सर्व ग्रामपंचायतींना 1 Gbps आणि सन 2022 पर्यंत 10 Gbps ब्रॉडबॅंड सेवा उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 3. धोरणात दूरसंचार क्षेत्राला कर्जबाजारीपणामधून बाहेर काढण्यासाठी वचनबद्धता दर्शविण्यात आली आहे.
 4. त्यासाठी दूरसंचार कंपन्यांना परवाना शुल्क, स्पेक्ट्रम वापर शुल्क, सार्वभौमिक सेवादायित्व कोषचे शुल्क यांचे पुनरावलोकन केले जाईल.
 5. वर्तमानात या सर्व शुल्कांमुळे दूरसंचार सेवेमधील गुंतवणूक वाढते आणि आर्थिक भुर्दंड भोगावा लागतो.
 6. नव्या धोरणात राष्ट्रीय डिजिटल लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी 5G तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या भविष्यकालीन ब्रॉडबँड तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला आहे.
 7. नव्या धोरणात 1.3 अब्ज भारतीय नागरिकांना स्वस्त इंटरनेट सुविधा पुरविण्यावर आणि आयातवरची अवलंबिता कमी करण्यासाठी स्थानिक उत्पादनास सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे.


 The IAAF has prevented women players with high levels of testosterone from participating

Topic:चालू घडामोडी

Sub- Topic:- क्रीडा 

 1. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन (IAAF) यांच्या नव्या नियमामधून विशिष्ट आंतरराष्ट्रीय ट्रॅक आणि फील्ड क्रिडाप्रकारात नैसर्गिकरीत्या उच्च टेस्टोस्टेरॉनची पातळी असणार्‍या महिला खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्यास प्रतिबंधित केले गेले आहे.
 2. नव्या नियमांनुसार, कमीतकमी सहा महिन्यांच्या सतत कालावधीसाठी महिला खेळाडूंमधील टेस्टोस्टेरोनची पातळी 5 नॅनोमोल्स प्रति लिटर यापेक्षा खाली असणे आवश्यक आहे, अन्यथा ती व्यक्ती खेळांसाठी अपात्र ठरणार आहे.
 3. महिलांमधील हायपरअँड्रोजेनिझम स्थिती:-
  1. महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी सर्वसाधारणपणे आढळून येणार्‍या प्रमाणापेक्षा उच्च असल्यास त्या स्थितीला ‘हायपरअँड्रोजेनिझम’ म्हणतात.
  2. ही एक आरोग्यासंबंधी स्थिती आहे, ज्यात सामान्यत: पुरुषांमध्ये आढळून येणारा टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन एखाद्या महिलेमध्ये उच्च पातळीमध्ये आढळून येतो.
  3. महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी सामान्यत: 0.12 ते 1.79 नॅनोमोल्स प्रति लिटर या दरम्यान असते तर पुरुषांमध्ये याचे प्रमाण 7.7 ते 29.4 नॅनोमोल्स प्रति लिटर एवढे खूप जास्त असते.
  4. टेस्टोस्टेरॉनच्या उच्च प्रमाणामुळे त्या महिलेत अन्य महिलेपेक्षा पुरुषी गुणांचा अंतर्भाव असतो, जसे की ताकद.
  5. या अधिकच्या ताकदीच्या जोरावर ती महिला अन्य महिला स्पर्धकांमध्ये श्रेष्ठ ठरते.
  6. यामुळे स्पर्धेमधील समानतेला धक्का पोहचू शकतो.


Telecom Commission has allowed the airline to speak on the phone during the trip

 1. दूरसंचार आयोगाने उड्डाणादरम्यान मोबाइल सेवा वापराला परवानगी दिली आहे.
 2. यापुढे आता विमान प्रवासादरम्यान फोनवर बोलता येणार आहे.
 3. दूरसंचार क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करून डिजिटल उपक्रमांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
 4. आता विमान प्रवास करताना मोबाईल फ्लाईट मोडवर टाकण्याची गरज लागणार नाही आणि इंटरनेटचाही वापर केला जाऊ शकणार आहे.
 5. शिवाय, TRAIच्या नियमांतर्गत ग्राहक तक्रार निवारण प्रणालीसाठी लोकपालाची निवड करण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे.
 6. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) हे भारतामधील दूरसंचार क्षेत्राचे नियामक आहे.
 7. दूरसंचार क्षेत्रात न्यायपूर्ण आणि पारदर्शक वातावरण प्रदान करण्याच्या उद्देशाने याची स्थापना 20 फेब्रुवारी 1997 रोजी झाली.
 8. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.  
 9. TRAI एका सचिवाच्या अध्यक्षतेखाली सचिवालयाच्या माध्यमातून चालवले जाते.


 Sitansu Car: PIB's new Principal Director General

 1. भारतीय माहिती सेवेचे वरिष्ठ अधिकारी सितांशू रंजन कार यांनी नवी दिल्लीतील पत्र माहिती कार्यालय (Press Information Bureau -PIB) याच्या प्रधान महासंचालक पदाची आणि भारत सरकारचे 27 वे प्रमुख प्रवक्ता म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.
 2. माजी महासंचालक फ्रँक नोरोन्हा यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
 3. पत्र माहिती कार्यालय (Press Information Bureau -PIB) ही भारत सरकारची एक केंद्रीय वृत्त संस्था आहे.
 4. याची स्थापना 1919 साली करण्यात आली.
 5. याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.


Renowned yogurt doctor Dr. Dhananjay Gunde passed away

 1. योगोपचाराने आरोग्यसंपदेचे जतन करण्याचा वस्तुपाठ घालून देणारे विख्यात योगोपचारतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे  निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
 2. इचलकरंजीलगतचे बोरगाव (ता. चिकोडी) हे त्यांचे मूळ गाव. स्टेम सेल प्रत्यारोपण शल्य चिकित्सक अशी त्यांची ओळख होती.
 3. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कोल्हापुरात व्यवसाय करू केला. १८८८मध्ये त्यांच्याकडे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या योग विभागाची जबाबदारीराज्यात सर्वप्रथम देण्यात आली.
 4. योगसाधनेने हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब आदि रोगांना आवर कसा घालता येतो, याची माहिती त्यांनी डॉक्टरसह रुग्णांना दिली.
 5. यासह वृत्तपत्र, नियतकालिके, मासिके यांतून त्यांनी याविषयावर भरपूर लिखाण करून योग विद्येबाबत जागृती केली.
 6. त्यांच्या ‘निरोगी राहू या आनंदाने जगू या’ हा संदेश देणाऱ्या शिबिरांनी आजवर ९००चा आकडा पूर्ण केला आहे. त्यांनी परदेशातही १४५ शिबिरे घेतली आहेत.
 7. त्यांनी पहिली हास्ययोग चळवळ १९८८साली सुरू केली. पहिला शेतकरी लढा, जैन धर्मीय तरुणांत लोकप्रिय ठरलेल्या वीर सेवा दलाच्या कामाची पायाभरणी त्यांनीच केली.
 8. त्यांची योग विषयी ६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्याच्या सीडी मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी भाषेत उपलब्ध आहेत.
 9. तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन, माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्यावर त्यांनी योगोपचार केले होते.


Top