The Central Government established the Cauvery Water Management Authority

 1. कावेरी नदीच्या तीरावर वसलेल्या कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुदूचेरी यांच्यात न्यायपूर्ण पाणी वाटपासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाकडून ‘कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरण’ याची स्थापना करण्यात आली आहे.
 2. जलसंपदा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या प्राधिकरणाच्या  संरचनेत पुढीलप्रमाणे पदांचा समावेश राहणार आहे:-
  1. एक अध्यक्ष आणि दोन पूर्ण वेळ सदस्य आणि काही अंशकालिक सदस्य असतील.
  2. केंद्राद्वारे पूर्णवेळ सदस्य नियुक्त केले जातील, तर अन्य दोन जणांसाठी केंद्राकडून नामनिर्देशित केले जाईल.
  3. याशिवाय, चार राज्यांचे एक-एक प्रतिनिधी समितीचे अंशकालिक सदस्य म्हणून नेमण्यात येतील.
  4. सचिव पदासाठी नियुक्ती केंद्राकडून केली जाईल.
  5. योजनेअंतर्गत, दिल्लीमध्ये मुख्यालय असलेले हे प्राधिकरण कावेरी जल तंटा निवारण प्रक्रियेची अंमलबजावणी करणारी एकमेव संस्था असेल, जी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यांमध्ये कावेरी नदीचे पाणी वाटप करणार.
  6. CWMA बेंगळुरूमधील कावेरी जल नियामक समिती (CWRC) ला त्यांच्या कार्यापासून त्यांची मुक्तता करण्यासाठी मदत करणार.
  7. ही कामे म्हणजे हेमावती, हरंगी, कृष्णराजसागरा, काबीनी, मेट्टूर, भवानीसागर, अमरावती आणि बनसुरासागर जलाशय या ठिकाणी दररोज पाण्याची पातळी, प्रवाहीत आणि साठा याबाबत माहिती एकत्रित करणे.
 3. वाद कश्यासंदर्भात आहे?
  1. कर्नाटकातील तळकावेरीत उगम पावणारी कावेरी नदी 322 किलोमीटर प्रवास करून तमिळनाडूत प्रवेश करते.
  2. तमिळनाडूत 483 किलोमीटर अंतर प्रवास करून बंगालच्या उपसागरास मिळते.
  3. कावेरी नदी कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांसाठी पाण्याची पूर्तता करण्यासाठी एक प्रमुख स्त्रोत आहे.
  4. या बाबतीतला संघर्ष सन 1892 आणि सन 1924 मध्ये माजी मद्रास प्रेसीडेंसी आणि मैसूर राज्य यांच्यामधील दोन कराराच्या संदर्भात आहे.
  5. यावर निर्णय घेण्यासाठी आणि कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुदूचेरी यांच्या सहमतीसाठी  भारत सरकारने 2 जून 1990 रोजी कावेरी जल विवाद न्यायाधिकरण (CWDT) गठित केले गेले होते. मात्र हा वाद अजूनही चालू आहे.


 There are eight agreements for strengthening Indo-Singapore relations

 1. आग्नेय आशियातल्या इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशिया या तीन देशांचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत.
 2. इंडोनेशियाच्या दौर्‍यानंतर 31 मे ते 2 जून 2018 या काळात पंतप्रधान सिंगापूरमध्ये होते.
 3. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांच्या निमंत्रणावरून त्यांनी भेट दिली.
 4. या दरम्यान सिंगापूरमध्ये "इंडिया अँड सिंगापूर: स्टेपींग इंटू द फ्युचर – पार्टनरशीप फॉर एंटरप्राइज अँड इनोव्हेशन" या शीर्षकाखाली एक कार्यक्रम आयोजित केला गेला.
 5. या भेटीत दोन्ही देशांमध्ये विविध विषयांमध्ये एकूण आठ करार/सामंजस्य करार/निवेदन यांच्यावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत.
 6. आठ करार/सामंजस्य करार/निवेदन:-
  1. CECA च्या दुसर्‍या आढाव्याच्या निष्कर्षावर संयुक्त वक्तव्य
  2. परिचारिका शिक्षण विषयात समान आवड असणार्‍या विषयांमध्ये करार
  3. परस्पर सहकार्य, नौदलांच्या जहाजांसाठी मालाची वाहतूक आणि सेवा यास पाठबळ तसेच पाणबुड्या आणि नौदलाचे विमान यांच्या भेटी याच्या संदर्भात भारत आणि सिंगापूर यांच्या नौदलांमध्ये अंमलबजावणी करार
  4. भारताचे संगणक आपत्कालीन प्रतिसाद चमू (CERT-IN) आणि सिंगापूर कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (SINGCERT) यांच्यातील सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्यासंदर्भात सामंजस्य कराराचा विस्तार
  5. अंमली पदार्थ, मानसिक अवस्थेवर परिणाम करणारे पदार्थ आणि संबंधित पदार्थ यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी दोन्ही देशांच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागांमध्ये सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार
  6. कार्मिक व्यवस्थापन आणि लोक प्रशासन क्षेत्रात सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार
  7. भारत आणि सिंगापूर यांच्यात फायनॅनष्यल टेक्नॉलॉजी संदर्भात संयुक्त कार्यगटाच्या (JWG) स्थापनेबाबत सामंजस्य करार
  8. नियोजन क्षेत्रात सहकार्यासाठी NITI आयोग आणि सिंगापूर को-ऑपरेशन एंटरप्राईझ (SCE) यांच्यात सामंजस्य करार
 7. अन्य बाबी :-
  1. दोन्ही पंतप्रधानांनी SIMBEX या द्वैपक्षीय वार्षिक नौदल सरावाच्या 25 व्या आणि सुधारित आवृत्ती संदर्भात चर्चा केली.
  2. हिंद महासागरात भारताची महत्त्वाची भुमिका ओळखून दोन्ही बाजूंनी क्षेत्रीय / ASEAN भागीदार देशांसोबत सागरी सराव आयोजित करण्यासह सामायिक सागरी क्षेत्रांमध्ये सतत आणि संस्थात्मक नौदल कार्यक्रमांसाठीच्या भारताच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 
  3. आंतरराष्ट्रीय सुरक्षाविषयक समस्यांना सामोरे जाण्यासाठी आणि विशिष्ट उपाययोजना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला गेला.
  4. सिंगापूरमध्ये रुपे कार्डच्या शुभारंभासह NETS आणि नॅशनल पेमेंट्स कॉपोर्रेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यातील भागीदारीची घोषणा करण्यात आली.
  5. सिंगापूरमध्ये देयकांसाठी SGQR ला मान्यता देण्यासाठी भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) ला विस्तारित करण्यासाठी NETS आणि NPCI यांच्यातील कराराचे स्वागत केले गेले आणि सीमापार देयकांसाठी व्यवस्था तयार करण्यासाठी चर्चा केली गेली. 


 Moody's downgrades India's GDP growth forecast

 1. भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट करण्यात आल्याचे मूडीज रेटिंग या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने म्हटले आहे.
 2. यावर्षी भारताची अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांच्या दराने वाढेल असा अंदाज आधी मूडीजकडून वर्तवण्यात आला होता.
 3. मात्र, यात कपात करताना भारताची अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी वाढेल असा सुधारीत अंदाज मूडीजने वर्तवला आहे.
 4. खनिज तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे.
 5. अर्थात २०१९मध्ये मात्र भारताची अर्थव्यवस्था ७.५ टक्क्यांच्या दरानेच वाढेल असा अंदाज मात्र कायम ठेवला आहे.
 6. समाधानकारक पाऊस, शेतमालाला किमान आधारभूत किंमत आणि ग्रामीण भागातील वाढती उलाढाल यामुळे अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग चांगला राहील.
 7. येत्या काही महिन्यांमध्ये जीएसटीचा परिणामही अर्थव्यवस्थेवर जाणवणार असल्याचे नमूद करण्यात या पतनिर्धारण संस्थेने नमूद केले आहे.
 8. जगभरातले गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करताना पतनिर्धारण संस्थांच्या रेटिंगला महत्त्व देतात. त्यामुळे मूडीजसारख्या संस्थांच्या अहवालाकडे जगाचे लक्ष असते.
 9. जर या संस्थांनी एखाद्या देशाचा पतदर्जा कमी केला तर त्या देशामध्ये विदेशी गुंतवणुकीचा ओघ मंदावण्याची भीती असते.


 Maharashtra Agriculture Minister Pandurang Phundkar passes away

 1. महाराष्ट्राचे कृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे ३१ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
 2. फुंडकर हे भाजपाच्या पहिल्या फळीचे नेते होते. वर्ष १९९१ ते ९६ या काळात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले होते.
 3. पांडुरंग फुंडकर यांचा जन्म १ ऑगस्ट १९५० रोजी नांदुरा तालुक्यातील नारखेड येथे झाला. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रीय झाले.
 4. आणीबाणीच्या काळात त्यांनी ३ महिने तुरुंगवासही भोगला. यानंतर मिसाबंदी म्हणूनही ९ महिने ते तुरुंगात होते.
 5. १९७७मध्ये फुंडकर हे राजकारणात सक्रीय झाले. जनसंघाच्या वतीने विदर्भात निवडून येणाऱ्या पहिल्या चार आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता.
 6. फुंडकर यांनी ३ वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे तर १९७८ व १९८०मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.
 7. फुंडकर हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेही होते. कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष म्हणून फुंडकर यांनी काम केले आहे.
 8. ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट कृषीमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
 9. १९८३ मध्ये कापूस प्रश्नावर फुंडकर यांची ३५० किलोमीटरची पदयात्रा त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती.
 10. त्याकाळी राज्यात काँग्रेसचे वर्चस्व असताना पांडुरंग फुंडकर यांनी राज्यात विशेषत: ग्रामीण भागात भाजपाचे स्थान मजबूत केले.
 11. अटलबिहारी वाजपेयींचे निकटवर्तीय पांडुरंग फुंडकर हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते. मुंडे आणि फुंडकर यांची मैत्री सर्वश्रृत होती.
 12. २००९मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना २००६-०७ या वर्षाचा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


 Weightlifter Sanjita Chanu guilty of stimulant test

 1. एप्रिलमध्ये गोल्डकोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारतीय वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे.
 2. आंततराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने संजिता उत्तेजक चाचणी दोषी आढलली असल्याची माहिती दिली आहे. यामुळे संजिता चानूला सुवर्णपदक गमवावे लागण्याची शक्यता आहे.
 3. उत्तेजकांच्या यादीत असलेले द्रव्य संजिताच्या शरीरात आढळले असून तिच्यावर आजीवन बंदीची शक्यता वर्तवली जात आहे.
 4. संजिताने ५३ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा पराभव करत एकूण १९२ किलो वजन उचलत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
 5. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सध्या तिच्यावर तात्पुरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर योग्य तो नि र्णय घेतला जाणार आहे.
 6. २०१४मध्ये वर्षांपुर्वी ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ४८ किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक जिंकले होते.
 7. कुंजाराणी देवी यांच्यापासून प्रेरणा घेत संजिताने वेटलिफ्टिंगमध्ये रस घेण्यास सुरुवात केली होती.


Top