राज्य ऊर्जा संवर्धन धोरण-2017 राबविण्यास मंजूरी

 1. महाराष्ट्रात राज्य ऊर्जा संवर्धन धोरण - 2017 राबविण्यास मंजुरी मिळाली आहे. राज्यासाठी स्वतंत्र ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य झाले आहे.
 2. पुढील 5 वर्षांत विविध क्षेत्रात या धोरणाच्या माध्यमातून सुमारे 1000MW ऊर्जेची बचत करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 3. नव्या धोरण्यात वीज क्षेत्राशी संबंधित कार्यवाही, अर्थसहाय्याच्या योजना, तरतुदी निश्चित करण्यात आल्या आहेत.
 4. महाराष्ट्राची महाऊर्जा ही संस्था केंद्रीय ऊर्जा संवर्धन कायदा, 2001 ची राज्य स्तरावर अंमलबजावणी करीत आहे.

 


मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यास मंजूरी

 1. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीनुसार वीज पुरवठा उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
 2. ही योजना महानिर्मिती कंपनीमार्फत सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येईल. 
 3. वाहिनीसाठी शासकीय जमीन 30 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्टीने देण्यात येईल.
 4. सध्या राज्यात वीजेच्या एकूण वापरापैकी 30% वीज कृषि-क्षेत्रात वापरली जाते.


‘सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्र’ वर रशिया व भारताच्या स्वाक्षऱ्या

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ 29 मे 2017 पासून जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या चार युरोपीय देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. 
भारतासोबतचे द्वैपक्षीय आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने हा दौरा आहे.
जर्मनी आणि स्पेनच्या यशस्वी भेटीनंतर भारताचे पंतप्रधानांनी रशियाची भेट घेतली. 
यावेळी 18 व्या वार्षिक द्विपक्षीय चर्चेनंतर भारत आणि रशिया यांनी आपापसात सहकार्य वाढविण्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी ‘सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्र’ वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

घोषणापत्रामध्ये समाविष्ट बाबी:

 1. भारत आणि रशिया हे संरक्षण, दहशतवाद विरोधात, गुप्त माहितीचे आदानप्रदान, व्यापार आणि अणुऊर्जा यासह सर्व शक्य क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करतील.
 2. भारत आणि रशिया यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा वर्ष 2017 हा 70 वा वर्धापन वर्ष आहे.
 3. नवी दिल्ली आणि मॉस्को यांनी सर्व स्वरूपात दहशतवादाचा निषेधही केला.
 4. दोन्ही देशांनी कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात दोन संयंत्राच्या उभारण्यासाठी मान्यता दिली आहे.
 5. दोन्ही देशांनी यूरेशियन इकॉनॉमिक युनियनसह मुक्त व्यापार क्षेत्र वाटाघाटीवर सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.

    भारत-रशिया संबंध:

 1. रशियाची भारताला स्वातंत्र्य चळवळीसाठीच्या संघर्षात पाठिंबा मिळाला होता. 
 2. ऑगस्ट 1971 मध्ये आमच्या देशांनी शांतीमय, मैत्रीपूर्ण आणि सहकार्याच्या करारावर स्वाक्षर्‍या केल्या. 
 3. 3 ऑक्टोबर 2000 रोजी धोरणात्मक भागीदारी घोषणापत्रावर स्वाक्षर्‍या झाल्यानंतर भारत व रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध नव्या स्तरावर पोहचले. 
 4. त्यात जागतिक आणि प्रादेशिक पातळीवरील समस्यांना संबोधित करताना आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात घनिष्ठ सहकार्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 
 5. 21 डिसेंबर 2010 रोजी या भागीदारीला विशेष आणि विशेषाधिकृत धोरणात्मक भागीदारीच्या स्तरापर्यंत वाढविण्यात आले.


2017 जागतिक शांतता निर्देशांक प्रसिद्ध 

2017 जागतिक शांतता निर्देशांक प्रसिद्ध 


अमेरिकेमधील इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस (IEP) संस्थेने "2017 जागतिक शांतता निर्देशांक" (Global Peace Index -GPI) प्रसिद्ध केला आहे. 
हा अहवाल जागतिक शांततेविषयी जागतिक स्थिती दर्शवतो.

2017 GPI मधील ठळक बाबी:

 1. गेल्या वर्षात अधिक शांततापूर्ण वातावरण होते. मात्र, गेल्या दशकात जगात शांतता लक्षणीयरित्या कमी आहे.
 2. गेल्या तीन दशकांत लष्करी शासनामध्ये घट झाली आहे.
 3. 93 देशांमध्ये शांततेत वाढ झाली आहे तर 68 देशांमध्ये याची स्थिती खालावली.
 4. आइसलँड हे जगातील सर्वात शांत देश ठरले आहे. ही स्थिती या देशाने 2008 सालापासून राखून ठेवली आहे. 
 5. आइसलँड नंतर न्यूझीलंड, पोर्तुगाल, ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क यांचा क्रमांक लागतो.
 6. सिरीया हा जगात सर्वाधिक शांततापूर्ण देश म्हणून कायम आहे. त्याआधी अफगाणिस्तान, इराक, दक्षिण सुदान आणि येमेन यांचा क्रमांक लागतो.
 7. सर्वाधिक प्रादेशिक अशांततापूर्ण वातावरण उत्तर अमेरिकामध्ये आहे, तर त्यानंतर याच बाबतीत उप-सहारा आफ्रिका आणि मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका क्षेत्राचा समावेश आहे.
 8. युरोप हा जगातील सर्वाधिक शांत प्रदेश म्हणून कायम आहे. निर्देशांकमधील दहा सर्वाधिक शांत देशांमध्ये यातील आठ देशांचा समावेश आहे.
 9. 2008 सालापासून 2.14% ने जागतिक शांततेत कमतरता आली आहे, तर 52% GPI देशांमध्ये अशांतता दिसून आली आहे.
 10. सरासरीने दहा किमान शांततापूर्ण देशांमध्ये हिंसाचारच्या घटना 37% आहेत तर दहा सर्वाधिक शांत देशांमध्ये हा आकडा केवळ 3% आहे.

जागतिक शांतता निर्देशांक:

 1. जागतिक शांतता निर्देशांक (GPI) हा राष्ट्रे आणि क्षेत्रांमधील शांततापूर्ण वातावरण संबंधित स्थिती दर्शवण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे.
 2. GPI हे इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस (IEP), न्यूयॉर्क, अमेरिका यांचे उत्पादन आहे. 
 3. हा अहवाल शांतता संस्थांमधील शांतता तज्ञांच्या आंतरराष्ट्रीय मंडळाच्या सल्लामसलताने विकसित केला जातो. 
 4. यासाठी लागणारी माहिती इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU)कडून गोळा केली जाते. 
 5. प्रथम यादी मे 2007 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आणि तेव्हापासून वार्षिक आधारावर त्यामध्ये बदल केले जात आहेत.

जागतिक शांतता निर्देशांक आणि भारत:

 1. जागतिक शांतता निर्देशांकात भारताचा १४१ वा क्रमांक लागला आहे. 
 2. बुरूंडी, सर्बिया व बुर्किना फोसो या देशांपेक्षाही भारतात अशांतता जास्त आहे असा या क्रमवारीचा अर्थ होतो. 
 3. २०१५ मध्ये हिंसाचारामुळे भारतात ६८० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असेही याबाबतच्या पाहणी अहवालात म्हटले आहे.
 4. गेल्यावर्षीच्या तुलनेत भारत दोन घरे वर सरकला आहे.
 5. देशाचे शांतता गुण हे कमी झाले आहेत त्यामुळे इतरांच्या तुलनेत भारताची कामगिरी खराब झाली आहे. 
 6. अहवालात म्हटले आहे की, गेल्या दशकभरात भारताची परिस्थिती घसरत गेली आहे. 
 7. संयुक्त राष्ट्रांनी ठरवून दिलेल्या काही गटात भारताची कामगिरी वाईट आहे. 
 8. भारतातील देशांतर्गत हिंसाचार, अंतर्गत कलह, लष्करीकरण यामुळे भारताची स्थिती वाईट आहे.
 9. देशात दहशतवादाचा धोका पाकिस्तानला सीमा लागून असल्यामुळे आहे. वर्षांत दहशतवादी हल्ल्यातील मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे.
 10. भारताला २०१६ या वर्षांत अर्थव्यवस्थेला ६७९.८० अब्ज डॉलर्स इतका फटका बसला असून हे प्रमाण देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या पाच टक्के असून दरडोई ५२५ डॉलर्सचा फटका बसला आहे.
 11. दक्षिण आशियात भूतानची स्थिती चांगली असून त्याचा तेरावा क्रमांक आहे तर पाकिस्तान आशियात सहावा तर एकूणात १५३ वा, भारत आशियात पाचवा तर एकूणात १४१ वा आहे. 
 12. अफगाणिस्तानही सहाव्या क्रमांकावर असून एकूणात त्याचा क्रमांक १६० वा आहे.


Top