India is the third place in the list of billionaires behind the world

 1. अब्जाधीशांच्या यादीत भारत जगात तिसऱ्या स्थानकावर पोहचला आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत भारताने जर्मनीला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सगळ्यात जास्त अब्जाधीश अमेरिकेत आहेत. तर त्यानंतर चीनचा नंबर लागलो.
 2. या लिस्टनुसार भारतात एकुण 19 नवे अब्जाधीश असून भारतातील एकुण अब्जाधीशांची संख्या 121 झाली आहे. गेल्यावर्षी हा आकडा 102 होता.
 3. अमेरिकेत सर्वाधिक ५८५ तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत. फोर्ब्जने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज 112 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह प्रथम क्रमांकावर आहेत.
 4. मुकेश अंबानी यांची संपत्ती गेल्यावर्षीच्या तुलनेत 16.9 अब्ज डॉलर्सने(1.09 लाख करोड रूपये) वाढली आहे. सध्या त्यांची संपत्ती 40.1 अब्ज डॉलर (2.60 लाख करोड रूपये.) इतकी आहे. जागतिक पातळीवर मुकेश अंबानी ३३ व्या क्रमांकावरून १९ व्या क्रमांकावर पोहचले आहेत.
 5. २०१७ मध्ये २३.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते ३३ व्या स्थानावर होते. अझीम प्रेमजी यांनी लक्ष्मी मित्तल यांना यंदा मागे टाकत भारतातले सर्वाधिक श्रीमंतांचं दुसरं स्थान मिळवलं आहे.
 6. जिंदाल स्टील अँड पावरच्या सावित्री जिंदाल या सर्वाधिक श्रीमंत भारतीय महिला ठरल्या आहेत. जागतिक क्रमवारीत त्या ८.८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह १७६ व्या स्थानावर आहेत.
 7. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा १.७ अब्ज डॉलर्ससह जागतिक यादीतले सर्वात कमी वयाचे भारतीय अब्जाधीश ठरले आहेत.
 8. एचसीएलचे संस्थापक शीव नाडर चौथे तर सन फार्माचे दिलीप संघवी पाचवे श्रीमंत भारतीय ठरले आहेत. या यादीत जगातल्या एकूण २,२०८ अब्जाधीशांची नावं आहेत. या सर्वांची मिळून एकूण संपत्ती ९.१ लाख कोटी (ट्रिलिअन) आहे. मागील वर्षीपेक्षा या संपत्तीत १८ टक्के वाढ झाली आहे.
 9. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि वॉरन बफे ९० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. दोघांनीही आपली बहुतांश संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
 10. यंदा जगातल्या टॉप २० अब्जाधीशांच्या यादीत दोन चायनीज उद्योगपतींचा क्रमांक आला आहे. त्यापैकी एक चायनीज इंटरनेट जायंट टेनसेंटचे सीईओ मा हॉतेंग तर दुसरे अलिबाबाचे संस्थापक जॅक मा आहेत. यंदा फोर्ब्जच्या यादीत २५९ उद्योगपतींचा नव्याने समावेश झाला आहे.


One percent reservation for orphans

 1. राज्य सरकारने 17 जानेवारी रोजी याबाबत निर्णय घेतला होता. त्यामुळे अनाथाश्रम सोडल्यानंतर शिक्षण आणि नोकरीमध्ये अडथळे येणाऱ्या समस्त अनाथ मुलांना त्याचा थेट फायदा होणार आहे. अनाथ, निराधारांना शिक्षण आणि शासकीय नोकरीत एक टक्का समांतर आरक्षण देण्यासंबंधी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने 17 जानेवारी रोजी याबाबत निर्णय घेतला होता. त्यामुळे अनाथाश्रम सोडल्यानंतर शिक्षण आणि नोकरीमध्ये अडथळे येणाऱ्या समस्त अनाथ मुलांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
 2. या निर्णयानुसार, आता शासकीय नोकरीतल्या अर्जावर जातीच्या रकान्यांसोबत अनाथ असाही रकाना असेल. ज्यामुळे शासकीय नोकरीत 1 टक्के आरक्षण तर मिळेलच, शिवाय अनाथ मुलांसाठी आता जातीची कटकट राहणार नाही. अनाथ मुलांना त्यांचा संस्थेतील कालावधी संपल्यानंतर खुल्या जगात वावरताना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतं. विशेषतः त्यांचा प्रवर्ग निश्चित नसल्याने शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती आणि लाभांपासून वंचित रहावं लागत होतं.
 3. अनाथ मुलांच्या या समस्या ध्यानात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देऊ, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला आणि त्याला मंजुरीही देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग तयार करण्यात येईल अशी घोषणा केली होती. समाधानकारक गुण मिळूनही एमपीएससीला मुकलेल्या अमृता नामक मुलीच्या उदाहरणावरुन मुख्यमंत्र्यानी ही घोषणा केली होती.

अटी-शर्ती 

 1. बालगृह आणि अन्य अनाथ मुलांपैकी महिला आणि बाल विकास विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र असणाऱ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार.
 2. ज्याचे आई-वडील, अन्य नातेवाईक यांची कोणतीच माहिती नाही त्यांनाच या आरक्षणाचा लाभ हे आरक्षण सरकारी सेवेतील नोकऱ्यांसाठीही राहणार असून शिष्यवृत्ती, वसतिगृह, व्यावसायिक शिक्षणासाठी, शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्ती योजनांसाठी लागू केले जाणार आहे.

 

असा मिळणार लाभ :

 1. खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण
 2. गट अ ते ड च्या सर्व पदांवर लागू, अनाथ प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच लाभ
 3. आई – वडील, अन्य नातेवाईक यांची माहिती नसलेली मुले-मुली पात्र
 4. हे आरक्षण शिष्यवृत्ती, वसतिगृह, व्यावसायिक शिक्षणासाठी,शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनांसाठी राहील
 5. सरळसेवा भरतीसाठी हा निर्णय लागू


India - the second largest mobile phone manufacturer in the world

 1. मोबाइल उत्पादनाच्या बाबतीत भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे.
 2. चीनमध्ये सर्वाधिक मोबाइल हँडसेट उत्पादन घेतले जाते. या बाबतीत भारत व्हिएतनामला मागे टाकत दुसर्याे स्थानी आला आहे.
 3. २०१७ साली वैश्विक मोबाइल उत्पादनात भारताचा वाटा ११% होता, जो २०१४ साली ३% एवढाच होता. यामुळे देशात मोबाइल फोनच्या बाहेरून आयातीमध्ये देखील सन २०१७-१८ मध्ये अर्ध्याहून अधिक घट दिसून आली आहे.
 4. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत फास्ट ट्रॅक कार्यदलाने २०१९ सालापर्यंत हे उत्पादन ५० कोटीपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.


Kerala Football team won 'Santosh Trophy 2018'

 1. केरळ फूटबॉल संघाने कोलकातामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पश्चिम बंगालचा पराभव करत सहाव्यांदा संतोष करंडक आपल्या नावे करून घेतला आहे.
 2. संतोष करंडक ही अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) अंतर्गत प्रादेशिक राज्य संघटना व शासकीय संस्थांद्वारा आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे.
 3. १९४१ साली संतोष करंडक स्पर्धेची स्थापना करण्यात आली.
 4. संतोष करंडक ही देशांतर्गत खेळली जाणारी प्रमुख फूटबॉल स्पर्धा आहे.


Senior Socialist leader Bhai Vaidya passed away

 1. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. पूना हॉस्पिटलमध्ये भाई वैद्य यांनी अखेरचा श्वास घेतला. भाई वैद्य स्वादुपिंडाचा कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
 2. भाई वैद्य यांचं पार्थिव रात्री लॉ कॉलेज रोडवरील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी 7 वाजता साने गुरुजी स्मारक येथे ठेवले जाईल. दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा आणि संध्याकाळी 6 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
 3. पार्थिव सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सानेगुरुजी स्मारक सिंहगड रोड पुणे येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.
 4. आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक-राजकीय कारकीर्दीत आयुष्यभर लोकशाही आणि समाजवादी मूल्यांची जोपासना करणारं व्यक्तिमत्त्व भाई वैद्य यांच्या रुपाने काळाच्या पडद्याआड गेले. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, आणीबाणीविरोधी आंदोलन इत्यादी अनेक आंदोलनांमध्ये भाई वैद्य यांनी सक्रीयपणे सहभाग घेतला होता.
 5. राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील विषयांवर भाई वैद्य हे अभ्यासपूर्ण मांडणी करत असत. तळागाळातील लोकांच्या हक्कांसाठी भाई वैद्य आयुष्यभर झटले.


Top

Whoops, looks like something went wrong.