1. शहराच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर विदर्भातील सर्वात उंच (206 फूट) तिरंगा झेंडा (राष्ट्रध्वज) लावण्याच्या प्रस्तावाला यवतमाळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. 
 2. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नगरपरिषदेने स्वीकारली आहे. त्यात  पालिका होमगार्ड,  एनसीसी बटालियनची मदत घेऊ शकते.
 3. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून हा राष्ट्रध्वज लावला जाणार आहे. त्यासाठी त्यांनी खासदार निधीतून  52 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 
 4. तसेच याला प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळाली असून सर्वसाधारण सभेत नग राध्यक्ष  कांचन चौधरी यांनी हा विषय पटलावर आणला. त्याला सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शवून ठराव मंजूर केला.


 1. 3 ते 5 सप्टेंबर रोजी चीनमध्ये होणाऱ्या ब्रिक्‍स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने  शियामेन दौऱ्याची माहिती देण्यात आली.
 2. डोकलामवरून निर्माण झालेला भारत-चीन यांच्यातील वाद 28 ऑगस्ट रोजी सैन्य माघारीच्या निर्णयानंतर निवळलेला असताना  मोदींच्या चीन दौऱ्याची घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.
 3. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चीन अध्यक्षाच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवव्या ब्रिक्‍स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनच्या  फजियान प्रांतातील शियामेन येथे जाणार आहेत.
 4. चीन दौरा आटोपल्यानंतर मोदी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान म्यानमार देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.  म्यानमारचे अध्यक्ष यू थिन क्वा यांच्या निमंत्रणावरून मोदी जात आहेत.
 5. तसेच पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच द्विपक्षीय म्यानमार दौरा आहे. यापूर्वी 2014 मध्ये असियान शिखर संमेलनासाठी म्यानमारला गेले होते. या दौऱ्यादरम्यान मोदी  स्टेट काऊन्सिलर डॉ आंग सान सू की यांच्यामवेत चर्चा करणार आहेत.


 1. उत्तर कोरियाने राजधानी प्यांगयांगहून सोडलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र थेट जपानच्या भूमीवरून झेपावत उत्तर पॅसेफिक महासागरात जाऊन कोसळळे.अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या जपानवरूनच उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र सोडल्याने या भागात तणाव वाढण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
 2. जपानचे पंतप्रधान  शिंजो ऍबे यांनी या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रंप यांच्याशी दूरध्वनीवरून चाळीस मिनिटे चर्चा केली.अमेरिकेच्या व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने  उत्तर कोरियावर दबाव वाढविला जाणार असल्याचे ऍबे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
 3. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या क्षेपणास्त्राने  2700 किलोमीटरचा प्रवास केला.जपानच्या उत्तरेकडून होकाईदो बेटावरून पहाटे सहा वाजून दोन मिनिटांनी साधारणपणे  550 किलोमीटर उंचीवरून हे क्षेपणास्त्र झेपावले. तसेच या क्षेपणास्त्राचा वेग  ताशी बारा हजार किलोमीटर इतका अफाट होता.


 1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या परस्पर संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केनेथ जस्टर यांची नियुक्ती अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून केली आहे.
 2. व्हाइट हाऊसकडून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. भारतासोबत आर्थिक, व्यापारी आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून ते वाढविण्याची  डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे, हेच या निर्णयावरून दिसून येते आहे.केनेथ जस्टर हे सध्या अमेरिकेन पराराष्ट्र खात्याचे सल्लागार म्हणून काम करतात. 
 3. रिचर्ड वर्मा यांनी जानेवारी महिन्यातच राजीनामा दिला होता, त्यानंतर भारतातील नवे अमेरिकन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.  
  अखेर  1 सप्टेंबर रोजी केनेथ जस्टर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 62 वर्षांचे केनेथ जस्टर हे आता अमेरिकेचे भारतातील राजदूत असतील.
 4. केनेथ जस्टर यांनी जानेवारी ते जून या कालावधीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक विषयांचे उप सल्लागार म्हणूनही काम केले आहे. केनेथ जस्टर हे 2001 ते 2005 पर्यंत अंडर सेक्रेटरी ऑफ कॉमर्स होते. 1992-93 या दरम्यान  स्टेट डिपार्टमेंटमध्ये अॅक्टिंग काऊन्सिलर राहिले आहेत. 
 5. तसेच याशिवाय 1989 ते 1992 पर्यंत  डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेटमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.


Top