'Climate Change Conference - April 2018'

 1. जर्मनीच्या बॉन शहरात 30 एप्रिल 2018 पासून ‘बॉन हवामान बदल परिषद – एप्रिल 2018’ या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. ही परिषद 10 मे 2018 पर्यंत चालणार आहे.
 2. याप्रसंगी, संयुक्त राष्ट्रसंघ हवामान बदल (UN Climate Change) संघटनेनी आपला पहिला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 3. या अहवालात 2017 साली साध्य करण्यात आलेले यश आणि हवामान बदलासंदर्भात प्रक्रियेच्या भविष्याकडे दृष्टीक्षेप टाकला आहे.
 4. यात UNCC ने 2017 साली केलेल्या कामकाजाचा संपूर्ण अहवाल आहे.
 5. सोबतच यात संयुक्त राष्ट्रसंघ हवामान बदल कार्यचौकट परिषद (UNFCCC), क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरीस करार, तसेच त्यांची इतर मंडळे, संस्थात्मक व्यवस्था, विभाग आणि सचिवालय यांचा देखील अहवाला दिला गेला आहे.
 6. तथापी, अलिकडच्या काही वर्षांत, सरासरी तापमान वाढत गेले आहे आणि विविध निर्देशके हे दर्शवतात की हवामानात बदल झाला आहे.
 7. याची मुख्य निर्देशके:-
  1. उच्च तापमान - 1850 सालापासून जागतिक सरासरी तापमान सुमारे 1 अंश सेल्सियसने वाढले आहे. गेल्या तीन दशकांमधील प्रत्येक दशक मागील दशकापेक्षा जास्त उष्ण आहे आणि विसाव्या शतकात आश्चर्यकारक तापमानवाढ दिसून आली. 18 पैकी 17 वर्ष सर्वात उष्ण होते. मागील तीन वर्ष विक्रमी उष्ण होते.
  2. पर्जन्यमान - निरीक्षणे असे दर्शवतात की 20 व्या शतकाच्या सुरूवातीपासून उत्तर गोलार्धाच्या मध्य-अक्षांशांमध्ये पर्जन्यमानात वाढ झालेली आहे. विविध क्षेत्रांमध्ये मोसमात देखील बदल दिसून येत आहे. उदाहरणार्थ, ब्रिटनमध्ये उन्हाळी पर्जन्यमानाचा दर कमी होत आहे, तर हिवाळी पाऊस वाढत आहे. असेही पुरावे आहेत की अत्याधिक पावसाचे प्रमाण, विशेषत: उत्तर अमेरिकामध्ये, अधिक तीव्र झाले आहे.
  3. समुद्र पातळी - 1900 सालापासून जागतिक सरासरी समुद्राची पातळी 20 सेंटीमीटरपेक्षा जास्तने वाढली आहे. अलिकडच्या काही दशकांत समुद्राच्या पातळीचा वाढीचा दर वाढला आहे, जो 1990 च्या दशकाच्या सुरवातीपासून वार्षिक 1.7 मि.मी.पासून वार्षिक 3.3 मि.मी.वर आला आहे.
  4. हिमनद्या - आल्प्स, रॉकीज, अँडस, हिमालय, आफ्रिका आणि अलास्का या क्षेत्रामधील जगभरातील हिमनद्या हळूहळू वितळत आहेत आणि अलिकडच्या काही दशकांमध्ये त्याचा संकुचित होण्याचा दर वाढला आहे.
  5. समुद्र-बर्फ - 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून आर्क्टिक समुद्र-बर्फ कमी होत आहे, जो दर दशकाला सुमारे 4% किंवा 0.6 दशलक्ष चौरस किलोमीटर या प्रमाणात कमी होत आहे. 1979 सालापासून उन्हाळी किमान आर्क्टिक समुद्र-बर्फ हळूहळू 13.3% नी कमी झाला आहे. त्याच वेळी अंटार्क्टिक समुद्र-बर्फ अधिक स्थिर आहे, तरीही बहुतेक भाग 2016 सालच्या शरद ऋतूपासून कमी पातळीवर आला आहे.
  6. हिम-थर - ग्रीनलँड आणि अंटार्क्टिक हिम-थर, जे त्यांच्यामध्ये जगातील बहुतेक ताजे पाणी संचयित करतात, ते दोन्ही वेगाने कमी होत आहेत.

हवामान बदल​​​​​​​

 1. हवामान बदल हा अनेक दशके किंवा दीर्घकाळ (साधारणतः किमान 30 वर्षे) टिकून राहणाऱ्या वातावरणातील सांख्यिकीय गुणधर्मांमधील बदल आहे.
 2. या सांख्यिकीय गुणधर्मांमध्ये सरासरी, परिवर्तनशील आणि अत्याधिक अश्या पातळी आहेत.
 3. हवामान बदल नैसर्गिक प्रक्रियांमुळे होऊ शकतो, जसे की सूर्यापासुनच्या किरणोत्सर्गात बदल, ज्वालामुखी किंवा हवामान प्रणालीत आंतरिक परिवर्तनशीलता किंवा मानवी हस्तक्षेपामुळे जसे वातावरणात किंवा भूप्रदेशाच्या वापरामुळे घटकांमध्ये बदल करणे.
 4. सुमारे 11,000 वर्षांपूर्वी संपलेल्या शेवटच्या हिमयुगानंतर, पृथ्वीचे हवामान तुलनेने स्थिर आहे, जे सरासरी तापमान सुमारे 14 अंश सेल्सियस आहे.
 5. शेवटी महत्त्वाचे म्हणजे निसर्गातील जीवनामध्ये होणारे बदल:-
  1. मोसमातील बदल विविध प्रजातींच्या वर्तनात देखील बदल घडवून आणत आहे.
  2. उदाहरणार्थ, वर्षाच्या सुरूवातीलाच फुलपाखरे दिसून येत आहेत आणि पक्ष्यांनी त्यांच्या स्थलांतरणाच्या पध्दती बदलत आहेत.


 Launch of Gobardhan Yojana in Karnal district of Haryana

 1. 30 एप्रिल 2018 रोजी हरियाणाच्या कर्नाळ जिल्ह्यात गोबर धन (GOBAR Dhan) योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
 2. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
 3. गोबर (GOBAR) म्हणजे ‘गॅल्व्हनाइजिंग ऑर्गेनिक बायो एग्रो रिसोर्सेस धन’.
 4. राष्ट्र पातळीवर राबविण्यात येणार्‍या ‘गोबर धन’ योजनेमार्फत घन कचरा व जनावरांच्या मलमूत्रापासून खते व बायोगॅस इंधन निर्मिती केली जाणार आहे.
गोबर धन (GOBAR Dhan)
 1. ‘गोबर धन’ योजनेंतर्गत शेणापासून बायोगॅस संयंत्रे वैयक्तिक, सामुदायिक, बचत गट किंवा गौशाळा सारख्या NGO च्या पातळीवर स्थापित केले जाऊ शकणार आहे.
 2. प्रकल्पासाठी तांत्रिक विशेषज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
 3. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासन 60:40 या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे.
 4. योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्हयात एक गावाची निवड केली जाते.
 5. यावर्षी योजनेंतर्गत 700 जिल्ह्यांना सामील करण्यात येणार आहे.


 India: The second fastest growing country in the world with the fastest growing air passenger traffic

 1. एयरपोर्ट काउंसिल इंटरनॅशनल (ACI) अनुसार, सन 2017-2040 या कालावधीत प्रवासी वाहतुकीच्या अंदाजावर आधारित हवाई प्रवासी वाहतूकीसंदर्भात भारत हा सर्वात वेगाने वाढणारा जगातला दुसर्‍या क्रमांकाचा उदयोन्मुख देश मनाला जात आहे.
 2. अहवालानुसार, व्हिएतनाम 8.5%च्या वृद्धीदराने या यादीत शीर्ष स्थानी आहे.
 3. त्यानंतर भारत 7.5% तर इराण 7.3% या दराने वाढले आहे.
 4. चीनचा वृद्धीदर 5.9% एवढा आहे.
 5. नवी दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (16 वा) हे जगातल्या शीर्ष 20 व्यस्त विमानतळांमध्ये समाविष्ट झाले आहे.
 6. 2017 साली अनुक्रमे कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई यांचा जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या विमानतळांमध्ये समावेश झाला आहे.
 7. सन 2017-2040 या कालावधीत आशिया-प्रशांत भागातील प्रवासी वाहतुकीचा वृद्धीदर 38.8% असणार, ही जगातली सर्वात वेगवान वृद्धी असेल.
 8. 2022 सालापर्यंत, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील प्रवासी वाहतूक 5.4 अब्जपर्यंत पोहचणार आहे.
 9. या संदर्भात युरोपमधील वाढ 26% तर उत्तर अमेरिकेत 8.4% होईल.


 International Labour Day: 01 May

 1. “यूनायटेड वर्कर्स फॉर सोशल अँड इकनॉमिक अॅडवांसमेंट” या विषयाखाली 1 मे 2018 ला आंतरराष्ट्रीय कामगार दिन पाळला गेला आहे.
 2. आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा ‘आंतरराष्ट्रीय श्रम दिन’ किंवा ‘मे दिन’ म्हणूनही ओळखला जातो.
 3. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे जगभरात 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस पळाला जातो.
 4. 1904 साली या दिनाची स्थापना करण्यात आली.


The 'India-South Africa Trade Council 2018' concluded in Johannesburg

 1. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये 29-30 एप्रिल 2018 रोजी ‘भारत-दक्षिण आफ्रिका व्यापार परिषद 2018’ पार पडली.
 2. परिषदेत भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वात भारताच्या शिष्टमंडळाने उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार वृद्धीला चालना देण्यासाठी विविध विषयांवर चर्चा केली.
 3. दक्षिण आफ्रिका हा आफ्रिका खंडातला विविध संस्कृती आणि भाषा बोलणाऱ्यांचा बहुवांशिक देश आहे.
 4. केप टाउन (संविधानक), प्रिटोरिया (कार्यपालिका), ब्लोमफॉन्टेन (न्यायिक) या देशाच्या राजधान्या आहेत.
 5. दक्षिण आफ्रिकन रँड हे राष्ट्रीय चलन आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.