INTERIM BUDGET ARUN JETLY

 1. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त भार संभाळणाऱ्या पियूष गोयल यांनी1 फेब्रुवारी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हंगामी अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, मध्यमवर्ग आणि कामगार वर्गाला प्रामुख्याने डोळयासमोर ठेवून या अर्थसंकल्पात महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.
 2. अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा खालीलप्रमाणे-
 3. करदाते: करमुक्त उत्पन्न पाच लाख रुपये.
 4. शेतकरी: छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये.
 5. असंघटित कामगार: 21 हजार रुपयांपर्यंत पगार असणार्‍यांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
 6. श्रमयोगी मानधन: 15 हजारांहून कमी उत्पन्न असणार्‍यांना कामगारांना 60 वर्षांनंतर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन.
 7. ग्रॅच्युइटी: कामगारांना मिळणार्‍या ग्रॅच्युइटीची रक्कम 10 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढविली.
 8. वित्तीय क्षेत्र: बॅँक, पोस्ट ठेवींवरील व्याजाच्या करकपातीच्या मर्यादेत वाढ.
 9. डिजिटल इंडिया: पाच वर्षांमध्ये 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती.
 10. प्रत्येकाला घर: सन 2020 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाचे असेल स्वत:चे घर.
 11. स्टँडर्ड डिडक्शनमध्ये 10 हजार रुपयांची वाढ, आता मर्यादा 50 हजारांची.
 12. दुसऱ्या घराच्या खरेदीवर कर नाही.


ZAHEER KHAN

 1. देशातील युवा प्रतिभावंत खेळाडूंसाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान स्वतंत्र क्रिकेट लीग ‘द फेरिट क्रिकेट बॅश’ची (FCB) सुरुवात करत आहे.

 2. तसेच या लीगमध्ये 15 वर्षापुढील खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी सहा महिन्याचा अवधी लागणार आहे. क्रिकेटमध्ये करिअर घडविण्याच्या दृष्टीने हे चांगले व्यासपीठ आहे, अशी माहिती FCB चे सह-संस्थापक असलेल्या झहीर खानने दिली.

 3. FCB मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या खेळाडूंचे काही संघ यासाठी तयार करण्यात येणार आहेत. स्टार खेळाडू ख्रिस गेल, मुथय्या मुरलीधरन, प्रवीण कुमार आणि अन्य खेळाडू या लीगमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

 4. झहीर खानने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘जे खेळाडू क्रिकेटमध्ये करिअर घडवू इच्छित आहेत, अशा मुलांना हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत’, असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.


DIN VISHESH

 1. 2 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळ भूमी दिन‘ म्हणून साजरा केला जातो.

 2. स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1856 मध्ये झाला होता.

 3. केंद्रीय रेल्वे मंत्रीगृह राज्यमंत्रीअर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1923 रोजी झाला होता.

 4. गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची सन 1957 मध्ये गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता झाली होती.

 5. सन 1962 मध्ये 400 वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.

 6. इराणमधील रामसर येथे सन 1971 मध्ये पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.


Top

Whoops, looks like something went wrong.