MPSC chalu ghadamodi, current affairs

1. अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेत भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे. कश्यप पटेल हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांची व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (एनएससी) दहशतवादविरोधी पथकाच्या ज्येष्ठ संचालक पदी बढती करण्यात आली आहे.

2. रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इंटेलिजन्स कमिटीचे ते माजी कर्मचारी आहेत. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी त्यांनी फेब्रुवारी महिन्यात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह इंटेलिजन्सचे पद सोडले होते.

3. सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबींमध्ये समन्वय साधण्यासाठी एनएससी निर्माण करण्यात आली आहे. एनएससीचे प्रमुखपद हे अमेरिकेचे अध्यक्ष भूषवतात. सध्या एनएससीचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सल्लागार जॉन बोल्टन करीत आहेत. पटेल हे दहशतवादविरोधी विभागात वकील म्हणून कार्यरत होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. तिहेरी तलाक विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींचे यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. त्यामुळे 19 सप्टेंबर 2018 पासून हा कायदा देशभरात लागू झाला आहे.

2. लोकसभेत बहुमताने मंजूर झाल्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. राज्यसभेत एनडीएला बहुमत नसल्याने ते पारित होऊ शकेल की नाही याबाबत शंका होती. मात्र, 99 विरुद्ध 84 मतांनी हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले.

3. त्यामुळे मोदी सरकरचे हे मोठे यश मानले जात आहे. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्याने ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर आता त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. अनेकदा तिकिटांसाठी लागलेल्या लांब रांगा आपली डोकेदुखी ठरत असतात. परंतु आता रेल्वेने घेतलेला मोठा निर्णय हा प्रवाशांसाठी थोडासा दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या नव्या नियमांनुसार आपात्कालिन परिस्थितीत आता प्रवासी प्लॅटफॉर्म तिकिटावरही रेल्वेतून प्रवास करू शकणार आहेत. परंतु यासाठी रेल्वेने एक अट घातली आहे.

2. प्लॅटफॉर्म तिकिटावरून प्रवास करण्याची मुभा रेल्वे दिली असून यासाठी संबंधित प्रवाशाला गार्ड किंवा टिसीचे परवानगी पत्र घ्यावे लागणार आहे. जर यासाठीही सदर प्रवाशाकडे वेळ नसल्यास ट्रेनमध्ये जाऊन नियमित प्रक्रिया पूर्ण करत प्रवास करू शकता. रेल्वेच्या नियमानुसार हे परवानगी पत्र रेल्वेचे गार्ड, टिसी किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून घेता येऊ शकते.

3. तर ट्रेनमध्ये चढल्यानंतर प्रवाशाला याबाबत टिसीला माहिती द्यावी लागेल. त्यानंतर सदर प्रवाशाच्या इच्छित स्थळाचे त्यांच्याकडून तिकिट बनवून घेता येईल. परंतु यासाठी केवळ 250 रूपये दंडाच्या स्वरूपात द्यावे लागणार आहेत. तसेच ज्या श्रेणीतून प्रवास करायचा असेल, त्याच श्रेणीचे शुल्क भरावे लागेल. प्रवाशी ज्या रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढला ते बोर्डिंग स्टेशन मानले जाणार आहे. परंतु याद्वारे प्रवसाची मुभा मिळणार असली तरी तिकिटाचे आरक्षण मात्र देण्यात येणार आहे.

4. तसेच दरम्यान, सध्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत केवळ 10 रूपये आहे. कोणतीही व्यक्ती जाणूबुजून अथवा फसवण्याच्या बहाण्याने या तिकिटावर प्रवास करत असेल, तर त्याला तुरूंगवारीही होऊ शकते. तसेच यासाठी 1 हजार 260 रूपयांचा दंड किंवा तुरूंगवारी आणि दंड दोन्ही होऊ शकतो.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून आम आदमी पार्टीने (आप) दिल्लीकरांना एक भेट दिली आहे. जे ग्राहक 200 युनिटपर्यंत विजेचा वापर करतात त्यांचे वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय आप सरकारने घेतला आहे. गुरुवार पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

2. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिल्लीकरांना 200 युनिटपर्यंतची वीज मोफत मिळणार असून 201 ते 400 युनिटपर्यंत वापर असलेल्या ग्राहकांना वीज बिलावर 50 टक्के अनुदान मिळणार आहे.

3. मात्र हे अनुदान बिलाच्या रकमेवर नाही तर वीज वापराच्या युनिटवर मिळणार आहे. म्हणजेच एखाद्या ग्राहकाने 300 युनिट वीज वापरली तर त्याला 150 युनिटसाठीच पैसे मोजावे लागणार आहेत. विजेच्या वाढत्या बिलांमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना हा मोठा दिलासा आहे.

4. तर ग्राहकांना देण्यात आलेल्या या सवलतींमुळे सरकारला वार्षिक 1800 ते 2000 कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. ई-गव्हर्नन्स विषयी 22 वी राष्ट्रीय परिषद 8 ते 9 ऑगस्ट दरम्यान शिलाँग, मेघालय येथे आयोजित केली जाईल. ईशान्येकडील राज्यात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कॉन्फरन्सची थीम 'डिजिटल इंडिया: सक्सेस टू एक्सलन्स' आहे.

2. प्रशासकीय सुधारणा व लोक तक्रार विभाग यांच्या वतीने हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि मेघालय सरकारच्या सहकार्याने आयोजित केले गेले आहे. या कार्यक्रमात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहेत. यात 450 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

3. कार्यक्रमात पाच उप-विषयांवरही चर्चा केली जाईल. या कार्यक्रमात ई-गव्हर्नन्सच्या क्षेत्रातील भारतातील कामगिरीदेखील दिसून येतील. हॉल ऑफ फेम आणि पुरस्कारप्राप्त विजेत्यांची छायाचित्रेही असतील. ईशान्येकडील राज्यांमध्ये ई-गव्हर्नन्सशी संबंधित पुढाकारांना गती देणे हे या परिषदेचे उद्दीष्ट आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सन 1870 मध्ये जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवेची लंडन मध्ये सुरवात झाली.

2. आध्यात्मिक गुरू ‘जे.पी. वासवानी’ यांचा जन्म 2 ऑगस्ट 1918 मध्ये झाला.

3. 2 ऑगस्ट 1954 मध्ये दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.

4. सन 2001 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कारासाठी निवड.


Top