A C RAUT NEW CEO OF BANK OF MAHARASHTRA

 1. डीएसके कर्ज प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे हे अडचणीत आले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर बँकनेही त्यांचा पदभार काढून घेतला आहे. बँकेचे कार्यकारी संचालक आर.के. गुप्ता यांचेही सर्व अधिकार बँकेने काढून घेतले आहेत.
 2. ए.सी. राऊत यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार तात्पुरता सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 3. बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपुर्वी अटक केली होती.
 4. या चारही अधिकाऱ्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
 5. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता रवींद्र मराठे आणि आर.के. गुप्ता यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे.


Maharashtra state students will get free uniform by samagra shiksha abhiyan

 1. या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 36 लाख 23 हजार 881 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार आहेत. त्यासाठी 217 कोटी 43 लाख रुपये मंजूर केले आहेत. शाळा सुरू होऊन 15 दिवस झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गणवेश दिले नसल्याचे यावरून स्पष्ट होते.
 2. यंदाच्या वर्षी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या धुमधडाक्‍यात झाला. त्यावेळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके व गणवेश वाटपाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र, शाळेच्या पहिल्या दिवशी फक्त पुस्तकांचेच वाटप झाले होते.
 3. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत गणवेशाबाबत कोणताच निर्णय झाला नव्हता. शासनाने यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांना देण्याचा निर्णय खूपच उशिरा घेतला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यास उशीर होणार आहे.
 4. शासनाने मागील वर्षी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत गणवेशाचे पैसे थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला फारसे यश न मिळाल्यामुळे पुन्हा यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणवेश खरेदी शाळा व्यवस्थापन समितीला करावी लागणार आहे.
 5. विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याच्या संदर्भात मागील वर्षी अनेक तक्रारी आल्यामुळे सरकारला आपला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे.


GDP Will decrease according to world bank report

 1. जागतिक बँकेच्या अहवालानुसार हवामान बदलामुळे तापमानवाढ आणि मान्सूनवर परिणाम होऊन देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) मध्ये 2050 पर्यंत 2.8 टक्क्यांनी घटणार असून देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या जीवनमानात घट होणार आहे.
 2. जागतिक बँकेच्या ‘दक्षिण आशिया हॉटस्पॉट : तापमान आणि पर्जन्यमानातील बदलाचा जीवसृष्टीवरील परिणाम‘ या नावाने प्रकाशित अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
 3. अहवालातील वर्ल्ड बँकेचे अर्थतज्ञ संशोधन मुथुकुमारा मणी, अर्थतज्ञ सुषेणेजित बंडोपाध्याय, शून चोनबायशी, अनिल मार्कंद्या आणि संशोधक थॉमस मोसीर यांनी केले आहे.
 4. अहवालानुसार भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांना हवामानातील बदलाचा फटका बसणार आहे.
 5. मागील सहा दशकांतील सरासरी तापमान वाढीच्या आधारावर बनविण्यात आलेल्या अहवालानुसार 2050 पर्यंत देशाच्या आतील भागातील तापमानात वाढ होणार असून किनारी प्रदेशातील तापमानात घट होणार असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे.
 6. तसेच अहवालानुसार मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील राहण्यास अनुकुल परिस्थितीत 9 टक्क्यांची घट होईल. त्यापाठोपाठ राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक असेल.
 7. देशातील अतिउष्ण जिल्ह्यात विदर्भातील 7 जिल्ह्याचा समावेश असेल. यात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, राज नांदगाव, दुर्ग समावेश असेल तर उरलेले 3 जिल्हे छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मधील असतील.


need to change UGC In To higher education commision

 1. विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) कार्यकक्षा आणि कार्यपद्धतीमध्ये काळानुसार बदल करणे गरजचे होते. त्यामुळे उच्च शिक्षण आयोग नेमण्यासंदर्भात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असल्याचे मत ‘यूजीसी’चे माजी अध्यक्ष सुखदेव थोरातयांनी मांडले.
 2. उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होत असल्यामुळे गेली दहा वर्षे यूजीसीत सुधारणा करण्याची चर्चा सुरू होती. यासंदर्भात काँग्रस सरकारने नेमलेल्या यशपाल समितीने ‘उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग‘ स्थापण्याची शिफारस केली होती.
 3. त्याअंतर्गत, उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध शाखांचे व्यवस्थापन आणि नियमन करणाऱ्या वेगवेगळ्या 15 कौन्सिल (एआयसीटीई, मेडिकल कौन्सिल, शेती संशोधन वगैरे) एकत्रित आणण्याची सूचना यशपाल समितीने केली होती.
 4. उच्च शिक्षणाला असलेले महत्त्व लक्षात घेऊन वेगवेगळ्या कौन्सिल असणे योग्य ठरणार नाही. समन्वयात अडचणी येतात, हे त्यामागचे प्रमुख कारण होते. त्यादृष्टीने पडलेले हे पुढचे पाऊल असल्याचे थोरात यांनी सांगितले.


union goverment will celebrate GST day on 1 jully

 1. वस्तू आणि सेवाकर अर्थात ‘जीएसटी’ ही करप्रणाली लागू करून एक वर्ष झाल्यानं केंद्र सरकार आज जीएसटी दिन साजरा करणार आहे.
 2. तसेच जीएसटी लागू झाल्यानंतर आता वर्षभरात देशभरातील करदात्यांची संख्या 1.20 कोटी झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा आकडा 9.10 लाख आहे.
 3. तर राज्यातील करदात्यांचा वाटा 7 टक्क्यांवर आला आहे.
 4. एकीकडे देशातील जीएसटीदात्यांची संख्या 56 लाखांनी वाढली असताना राज्यातील ही वाढ फक्त 60 हजारांइतकीच आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.