विविध रोगांसाठी ‘जेनेक्स्पर्ट’ उपकरणाचा वापर करण्यास WHO मार्फत सूचना

 1. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्व देशांना ‘जेनेक्स्पर्ट (GeneXpert)’ नावाचे एकच उपकरण वापरण्याची शिफारस केली आहे.
 2. क्षयरोग, HIV या रोगांच्या संक्रमणाच्या निदानासाठी आणि आकड्याच्या रूपात HIV आणि हिपॅटायटीस-सी रोगांचे मापन करण्यासाठी हे त्याप्रकारचे एकमेव असे यंत्र आहे, जे मॉलीक्युलर तपासणीवर कार्य करते.
 3. जेनेक्स्पर्ट उपकरणाबाबत
 4. जेनेक्स्पर्टला एक्स्पेर्ट MTB/RIF म्हणूनही ओळखले जाते.
 5. ही एक कारट्रिज आधारित न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिफीकेशन टेस्ट (NAAT) आहे.
 6. ही मायक्रोबॅक्टेरीयम ट्यूबरकुलोसिस (MTB) DNA आणि NAAT द्वारे रिफाँम्पिसिन (RIF) चा प्रतिरोध ओळखू शकणारे स्वयंचलित निदान करण्यासाठी तपासणी आहे.
 7. पार्श्वभूमी
 8. यूनिवर्सिटी ऑफ मेडिसिन अँड डेंटिस्ट्री ऑफ न्यू जर्सी (UMDNJ) येथील प्रा. डेव्हिड ऑलँड यांनी विकसित केले.
 9. यात सेफिड इन्क. आणि फाउंडेशन फॉर इनोव्हेटिव्ह न्यू डायग्नोस्टिक्स यांचे सहकार्य तसेच यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) कडून अतिरिक्त आर्थिक सहाय्य मिळाले होते.
 10. डिसेंबर 2010 मध्ये, WHO ने क्षयरोगाने ग्रस्त देशांमध्ये हे यंत्र वापरण्यास मान्यता दिली.
 11. भारताने अलीकडेच राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमासाठी 600 जेनेक्स्पर्ट यंत्र खरेदी केले आहेत.
 12. जागतिक आरोग्य संघटना (WHO) बाबत
 13. जागतिक आरोग्य संघटना ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित युनायटेड नेशन्स ची एक विशेष एजन्सी आहे.
 14. 7 एप्रिल 1948 रोजी जिनिव्हा, स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय स्थापन करण्यात आले. WHO हे संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा एक सदस्य आहे.


UN शांती निर्माण निधीमध्ये USD 5 लक्षचे योगदान देण्याचा भारताचा निर्णय

 1. UN शांती निर्माण निधी (UN Peace building Fund) मध्ये भारताने USD 5 लक्षचे योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. डिसेंबर 2005 मध्ये स्थापन केलेल्या UN शांती निर्माण आयोगाच्या सुरुवातीपासूनच भारत आयोगाचा सदस्य आहे.
 3. तेव्हापासून आतापर्यंत भारताने यासाठी निधि म्हणून USD 5 दशलक्षचे योगदान दिले आहे.
 4. हा निधी देशांमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने कार्यकलाप, कृती, कार्यक्रम आणि संघटनांना मदत करण्यासाठी वापरला जातो.


रिलायन्स जिओ कडून नव्या आशिया-आफ्रिका-युरोप पाण्याखालील केबल प्रणालीचे अनावरण

 1. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम यांनी त्यांच्या आशिया-आफ्रिका-युरोप (AAE-1) पाण्याखालील केबल प्रणालीचे अनावरण केले आहे.
 2. ही प्रणाली आशिया आणि युरोप या खंडांमध्ये 21 केबलच्या शेवटच्या टोकांमध्ये फ्रान्समधील मार्सिलेपासून हाँगकाँगपर्यंत 25,000 कि.मी. अंतरावर पसरलेली आहे.
 3. ही 100 Gbps थेट कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करू शकते.
 4. या केबल समुहामध्ये चायना युनिकॉम, एटिसलाट, GT5L, मोबीली, ओमानटेल, रिलायन्स जिओ, दूरसंचार इजिप्त, टेलियेमेन आणि इतर अनेक कंपन्यांचा समावेश आहे.
 5. ही प्रणाली भारतात आणि इतरत्र सर्व प्रकारचे संपर्क, अनुप्रयोग आणि डिजिटल सामग्रीस समर्थन देते.


भारताचे नवे महामुखत्यार: के. के. वेणुगोपाल

 1. के. के. वेणुगोपाल यांना भारताचे 15 वे महामुखत्यार (Attorney General) म्हणून नेमण्यात आले आहे.
 2. हे मुकुल रोहतगी यांच्या कडून पदभार स्वीकारतील.
 3. वेणूगोपाल हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि संवैधानिक तज्ञ आहेत.
 4. ते पद्मभूषण, पद्म विभूषण (2015) सन्मान प्राप्त आहेत.
 5. भारतीय संविधानातील कलम 76 अन्वये महामुखत्यार पदाची नियुक्ती केली जाते.
 6. महामुखत्यार यांना भारतातल्या सर्व न्यायालयांमध्ये ऐकण्याचा अधिकार आहे तसेच संसदेच्या कार्यवाहीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे, मात्र मतदानाचा नाही.


Top