IRSDC's 50 world-class railway stations will be completed by 2022

 1. भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळाच्या (IRSDC) अंतर्गत बांधण्यात येणार्‍या 50 विश्वस्तरीय रेल्वे स्थानकांना 2022 सालापर्यंत पूर्ण केले जातील.
 2. त्यातलेच मध्यप्रदेशातील हबीबगंज येथे फेब्रुवारी 2019 मध्ये प्रथम स्मार्ट रेल्वे स्टेशन पूर्ण होणार आहे. 
 3. या स्थानकाचा सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर जर्मनीच्या हेडेलबर्ग रेल्वे स्थानकाच्या आधारावर पुनर्विकास केला जात आहे.
 4. बन्सल समूह हा प्रकल्प राबवविणार आहे आणि ते आठ वर्षासाठी स्टेशनची देखरेख व संचालन करणार आहे.
 5. 450 कोटी रुपयांपर्यंत या प्रकल्पावर खर्च केले जाणार आहे. यामधून रेल्वे स्टेशनावर सर्व प्लॅटफॉर्मवर होल्डिंग क्षेत्रे, व्यवसायिक प्रतिष्ठाने, बस टर्मिनल, ऑफिस लॉबी, स्टेशनच्या बाहेर सेवा अपार्टमेंट, हॉटेल, हॉस्पिटल, स्पा आणि एक कन्व्हेन्शन सेंटर उभारले जातील.
 6. शिवाय हबीबगंज-निजामुद्दीन भोपाळ एक्सप्रेसला देशाची पहिली ISO सर्टिफाइड ट्रेन आहे.

भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ (IRSDC) 

 1. हा रेल भूमी विकास प्राधिकरण आणि IRCON यांचा संयुक्त उपक्रम आहे.
 2. ही कंपनी कायदा-1956 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली एक स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) म्हणून एका समग्र पद्धतीने स्थानकांवर प्रवासी संबंधित सुविधा वाढवण्यासाठी आणि सुधारण्याच्या प्राथमिक उद्देशासह भारतातील रेल्वे स्थानके विकसित करण्यासाठी म्हणून कंपनी आहे.


New High Court commences in Andhra Pradesh

 1. मुख्य न्यायाधीश म्हणून सी. प्रवीण कुमार यांनी शपथ घेतली. त्यांना राज्यपाल ईसीएल नरसिंहन यांना मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिली. 
 2. विजयवाडा येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात शपथविधी पार पडला.
 3. राज्यपालांनी यावेळी १६ न्यायाधीशांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
 4. या न्यायालयाच्या निर्मीतीमुळे देशात आता उच्च न्यायालयांची संख्या २५ झाली आहे.
 5. नवीन सुरु झालेल्या या न्यायालयाचे ‘आंद्र प्रदेश उच्च न्यायालय’ असे नाव असेल.  
 6. कायदा मंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने  २६ डिसेंबर २०१८ रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली होती. 


DIPP's Clean India Grand Challenge Award

 1. 1 ते 15 नोव्हेंबर 2018 दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपी) ‘स्वच्छ भारत ग्रॅण्ड चॅलेंज’ पुरस्कारांसाठी अर्ज मागवले होते.
 2. देशातील स्टार्ट अप्सच्या नावीन्यपूर्ण उपायांना सन्मानित करण्यासाठी हे पुरस्कार असून त्यासाठी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, जल व सांडपाणी व्यवस्थापन आणि हवा व्यवस्थापन अशी चार क्षेत्रे निश्चित करण्यात आली होती.
 3. यासाठी 22 राज्यांमधल्या 70 जिल्ह्यांमधून 165 अर्ज आले.
 4. हवा व्यवस्थापन क्षेत्रात पुण्यातील ‘स्मॉल स्पार्क कन्सेप्टस टेक्नॉलॉजीज प्राइवेट लिमिटेड’ ने द्वितीय पारितोषिक पटकावले.
 5. डीआयपीपीचे सचिव रमेश अभिषेक यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 6. प्रथम पुरस्कार दोन लाख रुपयांचा असून द्वितीय पुरस्कार एक लाख रुपयांचा आहे.


Qatar quits from OPEC

 1. नैसर्गिक वायूचा (LNG) जगातला सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या कतार दि. 1 जानेवारी 2019 रोजी अधिकृतपणे ‘पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना’ (Organization of the Petroleum Exporting Countries -OPEC) या समुहामधून बाहेर पडला.
 2. डिसेंबर 2018 मध्ये कतारने 'OPEC'चे सभासदत्व सोडणार असल्याची घोषणा केली होती.
 3. कतार पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या संघटना (OPEC) मध्ये 1961 साली सहभागी झाला होता.
 4. कतारमध्ये प्रतिदिनी 6 लक्ष बॅरेल तेलाचे उत्पादन घेतले जाते आणि हा देश जगातला सर्वात मोठा LNG निर्यातदार देश आहे.

ओपेक (Organization of the Petroleum Exporting Countries):-

 1. पेट्रोलियम निर्यात करणार्‍या देशांची संघटना किंवा ओपेक हा जगातील पेट्रोलियम उत्पादने निर्यात करणार्‍या देशांचा उत्पादक संघ (कार्टेल) आहे.
 2. अल्जीरियाअँगोलाइक्वेडोरइराणइराककुवेतलिबियानायजेरियाकतारसौदी अरेबियासंयुक्त अरब अमिराती व व्हेनेझुएला हे देश ओपेकचे सदस्य आहेत.
 3. १९६५ सालापासून ओपेकचे मुख्यालय व्हियेना येथे स्थित आहे.
 4. तेल उत्पादक देशांचा वैयक्तिक व एकत्रित फायदा जपणे हे ओपेकचे ध्येय आहे.
 5. तसेच आंतरराष्ट्रीय तेल बाजारात क्रुड तेलाची किंमत नियंत्रित ठेवणे व किंमतीमध्ये अनावश्यक व हानिकारक बदल न होऊ देणे हे काम देखील ओपेक सांभाळते.
 6. १९९२ मध्ये इक्वेडोर हा देश ओपेक मधुन बाहेर पडला.त्यामुळे सध्या ओपेकचे ११ सदस्य देश आहेत.
 7. ओपेकच्या सदस्य देशाकडुन होणारे तेल उत्पादन हे जगाच्या एकुण तेल उत्पन्नाच्या ४०%येवढे आहे.त्यामध्ये सर्वात जास्त तेल उत्पादन देश सौदी अरेबिया आहे.


Top