ONE FOR ALL ALL FOR ONE

  1. भारतीय सैन्य दलातील शहिदांच्या कुटुंबीयांचे अनुदान 25 लाखांवरून 50 लाख करतानाच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील शौर्य तसेच सेवापदक विजेत्यांच्या अनुदानात दुपटीने वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

  2. ‘वन फार आॅल अ‍ॅण्ड आॅल फार वन’ उपक्रमांतर्गत आयोजित ‘अ ट्रिब्युट टू इंडियन आर्मी अ‍ॅण्ड सॅल्यूट टू सोल्जर्स’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

  3. मुख्यमंत्री म्हणाले की, शौर्य गाजविणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणार्‍या शहिदांच्या कुटुंबियांच्याप्रती कृतज्ञ राहणे आपले कर्तव्यच आहे. त्यासाठी शहिदांच्या कुटुंबीयांच्या अनुदानात दुपटीने वाढ करतानाच त्याच जिल्ह्यात शेतीसाठी दोन हेक्टर जमीन देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

  4. तसेच याशिवाय शौर्यपदक आणि सेवा पदक विजेत्यांसाठी एकरकमी पुरस्कारांच्या रोख अनुदानात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मरणोत्तर शौर्य आणि सेवापदक धारण करणार्‍यांच्या कुटुंबीयांच्या मासिक अनुदानातही दुपटीने वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


Top